माझी जात, माझा धर्म, माझी भाषा, माझा देश

खालील दोन उदाहरणे पाहाः


१. मी आज खानावळीत गेले. तेथे अनायासे वांगीभाताचा बेत होता. माझ्या पानात वाढलेल्या वांगीभाताचा मला अभिमान वाटतो.


२. स्थानकावर गाडी येताच मी गर्दीबरोबर गाडीच्या तिसऱ्या डब्यात लोटली गेले. आता त्या गाडीच्या त्या तिसऱ्या डब्याबद्दल मला अभिमान वाटतो.

हे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)

हुळहुळा
हेलकरी
क्षमाशील
क्षौर
हूड
हैदोस
क्षितिज

हूल
हैराण
क्षिती (ति)

हृदय
हैवान
क्षिप्रा
ज्ञापित
हृदयंगम

भारतभेट

भारतात जायचा दिवस ठरल्यापासूनच मन तिकडे केंव्हाच जाऊन पोहोचलं होतं. अखेर जायचा दिवस उजाडला. लंडन-मुंबई असा थेट ९ तासाचा प्रवास करून श्री छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो तेंव्हा मुंबईतले दुपारचे १२ वाजले होते. विमान उतरायच्या आधी खिडकीतून बघताना असंख्य इमारतींची गर्दी, समुद्र दिसायला लागल्यावर छातीत आनंदाने धडधडायला लागलं.

हे शब्द असे लिहा (स्वी - हु)

स्वीय
हमाली
हळूहळू
हिरण्मय
स्वेच्छाचार
हमी
हाणामारी
हिरवळ
स्वेच्छानिर्णय
हमीदार
हातउचल
हिरकणी
स्वेदबिंदू (दु)
हरहुन्नरी

यादी

ही आठवण सुनील जोशी यांचा मुलगी पाहताना हा लेख वाचताना झाली. या लेखातील सर्व घटना खऱ्या असून काही पात्रांची नावे मात्र बदलली आहेत.


"साते, लग्गेच कँटिनमध्ये ये मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे." अतिदक्षता विभागातील ड्यूटी संपता-संपता मँडीचा फोन आला.

गदिमाः काही खास 'जागा' (२)

गेल्या लेखात 'गदिमां'च्या काव्यातील काही खास 'जागां'चा शोध घेतला होता व तो 'मनोगतीं'ना आवडला आणि या विषयावर आणखी लिखाणासाठी बराच आग्रह झाला.सर्वश्री नंदन,नरेन्द्र,संजोप,कुमार यांनी त्यांना भावलेल्या 'जाग़ा'बद्दल लिहीले.माझ्याही हाती आणखी काही 'धन' लागले आहे ते इथे देत आहे.

१.गदिमांच्या 'अंगणी गुलमोहर फुलला' ह्या गीतातील पहिल्याच २ ओळी पहा.

  'अंगणी गुलमोहर फुलला' 
   लाल फुलांच्या लिपीतला हा लेख मला कळला.."

  दुसऱ्या ओळीतली कल्पनारम्यता केवळ विलक्षण आहे. एकतर 'लाल फुलांची 
  लीपी' ही कल्पनाच थक्क करणारी आहे वर 'गदिमा' फुलांनी लडबडलेल्या 
  गुलमोहराच्या झाडाला 'या' लीपीतील 'कविता' म्हणत नाहीत,'लेख' म्हणतात.
  कारण कवितेत शब्दांची संख्या तुलनेने कमी असते आणि इथे तर इतकी 
  फुले फुलली आहेत की अण्णांच्या लेखी  हा 'लेख' तयार झाला आहे!
  या दोन ओळीतील काव्यबहराबरोबरच 'ल' च्या अनुप्रासाने 'गदिमा'च्या ह्या 
  काव्यपंक्ती 'सालंकृत' झाल्या आहेत.

२.'रामा रघुनंदना' ह्या शबरीचा श्रीरामाबद्दलचा भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या    
   गीतातही एक सहजसुंदर 'जागा' आहे.शबरी ही साधी आदिवासी स्त्री! या 
   गीतात ती स्वतःला 'दीन रानटी वेडी शबरी' असे म्हणते.या संदर्भात शेवटचे 
   कडवे पाहा.

   ' पतितपावना श्री रघुनाथा'
     एकदाच ये जाता जाता
     पाहीन, पूजिन,टेकीन माथा
     तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
     पुरेपणा जीवना ॥

'गदिमा' नी हा 'पुरेपणा' शब्द सकारण वापरला आहे.ते 'पूर्णत्व, सार्थकता किंवा मोक्ष' यापैकी काहीही लिहू शकले असते. पण शबरीसमान साध्या आदिवासी स्त्रीच्या तोंडी  या काहीश्या जड शब्दांपेक्षा 'पुरेपणा' सारखा साधा तरी सुद्धा नेमकी भावना व्यक्त करणारा शब्द माडगूळकर घालतात.साध्या शबरीसाठी ते तेवढीच सोपी भाषा किंवा सोपे शब्द  (योजनापूर्वक पण सहज वाटणारे) लिहितात.
आशा भोसले ह्यानी हे गीत फार हळुवारपणे,स्निग्ध स्वरात व एक वेगळ्याच आवाजात सादर करून शबरीचा साधा भोळा भक्तिभाव सुंदर प्रकट केला आहे.

पु. ल कुमारगंधर्वाबद्दल लिहिताना म्हणाले आहेत की 'त्यांच्या पुढ्यात स्वर हात जोडून 'हमारे लायक कुछ सेवा' म्हणत उभे असायचे'! 'गदिमां'च्या बाबतीत हेच वाक्य 'स्वर' ऐवजी 'शब्द' एवढा बदल करून तंतोतंत लागू पडते.
हा महाकवी 'मराठी' होता हे आपल्या सर्वांचेच भाग्य!


(जयन्ता५२)
 

मोडेन, पण वाकणार नाही

महावीरसिंह. जन्म १६ सप्टेंबर १९०४, शाहपूर टहला, जिल्हा एटा, उत्तर प्रदेश.
हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेचा एक खंदा योद्धा. आझाद व भगतसिंह यांचा निःसीम भक्त. साँडर्स वधाच्या वेळी भगतसिंह, राजगुरु इत्यादींना त्यानेच सारथ्य करून दूरवर नेऊन सोडले होते.

नाशिक भागात अतिरेकी

नुकतेच नाशिक मालेगाव मनमाड भागात अनेक अतिरेकी मोठ्या शस्त्रसाठ्यासकट सापडले. अर्थातच सगळे मुस्लिम बांधव होते. महाराष्ट्रात मुस्लिम अतिरेकी जास्त फ़ोफावत आहेत हे भीतीदायक वाटते.


 हे दारिद्र्यामुळे होते, शिक्षणाच्या अभावाने होते असे म्हणण्याची फ्याशन आहे.  या प्रकरणात पकडलेले लोक सुशिक्षित अगदी डॉक्टरही आहेत त्यामुळे हे कारण इथे लागू पडते असे वाटत नाही.