आसवांची देणगी



अश्रु
अश्रु निर्माण करताना निसर्गाला तरी समजले असेल का?
किती महत्त्वाची भेट देतोय तो मानवाला!!
अश्रु--एक अनमोल भेट.
काय सांगत नाहीत हे अश्रु?
किती रुपं, किती प्रसंग आणि किती अर्थ!

साश्रु नयंनापासुन तर कोसळणाऱ्या बांधापर्यंत
अश्रुच खरे सोबती असतात
काही एकट्या.... अगदी एकट्या समयी
गर्दी असते अवती भवती माणसांचीपण...
सोबती नसतो कुणीच
अशावेळी अश्रु सोबत करतात
अलगद तरळुन डोळ्यात किंवा ओघळतात अबोलपणे गालांवरुन
आणि सांगतात-आम्ही आहोत ना!!
ऐकुन घेतात शांतपणेआपली सारी व्यथा आणि पोकळ समजुतींच्या शब्दांचा मुलामा द्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
देतात फक्त सोबत तीच तर हवे असते नाहीतरी त्या क्षणी सर्वांत जास्त!
मनात दाटलेल सारं मळभ दुर करतात
गच्च आभाळासारखं मन, रितं करतात
हलकं करतात आपल्याला.
होतात आपले दुत कधी, आपली भावना पोहचवायला.
शब्द फुटतच नाही तोंडातुन
किंवा बोलु शकत नसतो आपण..
काही कारणाने.

असाच तरळलेला एक अश्रु डोळ्यातला
सांगतो आपल्या माणसाला आणि तेही फक्त आपल्याच माणसाला
आपल्या मनीचे भाव.

रुतलेला एखादा वाग्बाण किंवा खोचक बोलणी
कधी मुक क्रुतज्ञता तर कधी अपार आनंद, ओथंबलेलं प्रेम
किती भावनांची पोच देतो आपला एकच अश्रु!
ओघळतो अचानक कधीतरी नको असताना सुद्धा..
पण......तीही गरजचं असते, त्या क्षणी.

काही करणाने मिटुन गेलेली व्यक्ती जेंव्हा दुरावते अश्रुंना,
प्रयत्न करतो आपण, अश्रु यावेत म्हणुन
त्या व्यक्तीला मोकळं करण्यासाठी साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी.
अश्रु हे सोबती!
अश्रु ही देणगी!

मनोगतींच्या आवडीची १०१ पुस्तके

पुस्तके साहित्यिक
व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे
शहेनशहा ना. सं.

हापूस आंब्याचा साखरांबा

वाढणी
१०-१५ वेळा

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ हापूस आंबे
  • पाव किलो साखर
  • ५-६ वेलदोडे (इलायची)

मार्गदर्शन

हापूस आंब्याच्या साल काढून लहान-लहान फ़ोडी कराव्यात.

साखरेचा कच्चा पाक करावा. (जास्त कडक पाक नको.)

पाकात फ़ोडी घालून, पाक घट्ट होइपर्यंत हलवावे.

नंतर वेलदोड्याची पूड करुन त्यात घालावी.

गार झाल्यावर काचेच्या बातलीत भरावा. 

टीपा

गरम गरम पोळी आणि तूपाबरोबर खूप छान लागतो.

आणि बरेच दिवस टिकतो.

 

एक (अ) प्रकट मुलाखत (भूत कथा )

(या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. ती खरी असल्याचा दावा केल्यास ते सिद्ध करण्याची जवाबदारी दावा करणाऱ्याची असेल, लेखकाची नाही. )


महान लोकांचा सहवास कुणाचा उद्धार करीत नाही ? कमळाच्या पानावरील थेंबही मोत्याप्रमाणे भासतो (अर्थातच एक संस्कृत सुभाषित, नाही तर माझ्या मनात कुठले यायला एव्हढे महान विचार !) माणसांच्या लहान-सहान वर्तनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. सूर्यकिरणांची एक तिरीपही सूर्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन देते.महान लोकांच्या चरित्राचा, त्यांच्या जडण-घडणीचा अभ्यास करताना माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या वाचकाला दरवेळी काही तरी नवे गवसतेच. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी एका ठिकाणी म्हंटल्या प्रमाणे शेणाचा गोळा उचलताना तो थोडी तरी माती घेऊनच निघतो. असो, आजपर्यंत आपण अनेक थोर 'माणसांचे' विचार ऐकले असतील आज जरा 'इतरांचेही' विचार ऐकू या.

सूर्यनमस्कार

क्रीडाभारती ही उत्तम आरोग्यासाठी कार्यरत असणारी संस्था आहे.


क्रीडाभारतीच्या कार्याची तसेच सूर्यनमस्कार या विषयाची सर्वांग माहिती देणारी "क्रीडाभारती - सूर्यनमस्कार" ही त्यांची चित्रफित नुकतीच मिळाली. आपल्या आणि आपल्या जीवलगांच्या सोयीसाठी येथे त्याची माहिती दिलेली आहे.