"वंदे मातरम"ला विरोध अज्ञानमूलक

"वंदे मातरम" हे गीत म्हणायला काहीजणांचा कडवा विरोध आहे. त्यांतील पहिल्या ओळीचा - वंदे मातरम चा - अर्थ मी मातेला वंदन करतो असा आहे. देशाच्या संदर्भांत ही माता म्हणजे भारतमाता. भारतमाता म्हंटल्यावर सर्वांच्या डोळ्यांसमोर एक देवीसरखी मूर्ति उभी राहते. त्यामुळे मूर्तिपूजेला विरोध असणाऱ्यांना या देवीसदृश भारतमातेला वंदन करणे हे धर्मबाह्य वर्तन वाटते. पण खऱ्या अर्थाने भारतमाता म्हणजे भारतीय जनता, ज्यांत तुम्हा, आम्हा, सर्वांचा समावेश होतो. ही गोष्ट पंडित नेहरूंनी आपल्या "हिंदुस्थानकी समस्याएं" या पुस्तकांत "भारत माताकी जय" असा जयजयकार करणाऱ्या जमावासमोर दिलेल्या भाषणांत स्वतः सांगितली असल्याचे नमूद केले आहे. या जनतेच्या आधाराने आपण जगतो, वाढतो व स्वतःची उन्नति करून घेतो, म्हणून तिला आपल्या आयुष्यांत मातेइतकेच महत्त्वाचे स्थान आहे. अशा मातेला वंदन करणे म्हणजे जिच्यामुळे आपले अस्तित्व आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करणे होय व हे करणे म्हणजे पाप किंवा धर्मबाह्य वर्तन आहे असे कुठलाही धर्म म्हणत असेल असे वाटत नाही.

लोण्याची पोळी

वाढणी
आवडीवर अवलन्बून

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • पारीसाठी - कणिक, चवीला मीठ, मोहन
  • सारण - एक वाटी लोणी, एक वाटी भाजलेली पीठी, तीन वाट्या पीठी साखर
  • र सारण सैल वाट्ल्यास पीठीसाखर मिसळावी.

मार्गदर्शन
कणीक मोहन व मीठ घालून पोळ्याकरिता भिजवितो त्याप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. सारणाचे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे. कणकेच्या दीडपट सारण त्यात भरावे हलक्या हाताने पोळ्या लाटाव्या. साधारण २० पोळ्या होतात. २-३ दिवस टिकतात. आधी करून ठेवता येतात. मुलांना आवडतात.

कर्ता..

दुपारचं ऊन चांगलंच तापलं होत. रस्त्यावरचा प्रत्येकजण सावली शोधत होता. गरम झळांनी सर्वांगाची काहीली होत होती व उष्णतेच्या विखारी वणव्यात सगळे भाजून निघत होते. अशा तापलेल्या भर दुपारी राचय्या व त्याचं कुटुंब रस्त्यावर 'कडकलक्ष्मी'चा खेळ करत पैसे मागत चालत होतं. राचाय्याच्या शरीरावर मारलेल्या फटक्यांचा आवाज सगळीकडे घुमत होता. त्याच्या कांबीसारख्या काटक शरीरालाही हे ऊन सहन होत न्हवत व तो घामाने निथळून गेला होता. त्याच्याबरोबर सावली सारखी असणारी नागम्मा कडेवर छोट्या भैरीला सावरत पाय ओढतं चालत होती. आठ वर्षाचा रेण्णा लोकांपुढे हात पसरून पैसे मागत होता. रस्त्यावर वाहनांची व माणसांची वर्दळ कमी झाली. भुकेने कासावीस झालेल्या राचय्याने एका झाडाखाली बस्तान ठोकलं. त्याने पायातले चाळ बाजूला काढून हातातला 'कडकलक्ष्मी'चा पिळटा खाली ठेवला. नागम्माही हाशहुश करत खाली बसली व तिने तिच्या पोतडीतनं खाण्याचं गाठोडं काढलं. खाणं बघताच भुकेलेल्या छोट्या भैरीने भोकांड पसरलं. राचय्याने तिला जवळ घेतलं व तिला तो खाऊ घालू लागला. सकाळपासून चालून चालून रेण्णा ही थकून गेला होता त्याने खाली बसकण मारली व तो आईने दिलेले खाणं चिवडत राहिला.

'मनोगत'कारांचे अभिनंदन

अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या मराठी संकेतस्थळांच्या पहिल्या खुल्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून 'मनोगत ' ह्या आमच्या संकेस्थळाने द्वितीय पारितोषिक मिळवला आहे, अशी बातमी आज दैनिक लोकसत्तात वाचली आणि एक मनोगती म्हणून अत्यंत आनंद झाला. 

अभिनंदन

जनभारती व माहिती-तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या मराठी संकेतस्थळांच्या पहिल्या खुल्या स्पर्धेत मनोगतला द्वितीय पारितोषिक मिळाले. ( संदर्भ- लोकसत्ता-दि. १८ मे २००६) प्रशासक आणि सर्व मनोगतींचे मनःपूर्वक अभिनंदन ! ! !