आपल्या मराठी साहित्यात शब्दप्रभू ग. दि. माडगूळकरांचे स्थान वादातीत आहे.या माणसाच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक गीतांनी गेल्या तीन-पिढ्यांचे मराठी भावजीवन समृद्ध केले आहे.त्यांचे काव्य, विशेषतः भावगीते व चित्रपट गीते ही सहज-सुंदर,गेय आहेतच पण गदिमा काही ठीकाणी, एखादा गायक जशी गाताना एखादी खास 'जागा' घेतो,तसे एखादा शब्द असा काही लिहून जातात की त्यातून अर्थ किंवा गेयतेच्या दृष्टीने एक सौंदर्यस्थळ निर्माण होते.कधी कधी प्रथमदर्शनी अशी एखादी जागा लक्षात येत नाही किंबहुना माझ्या लक्षात आली नाही. पण नंतर जाणवलेल्या अशा काही खास 'जागा' येथे देत आहे.इतर कोणाला असे काही खास सापडले तर अवश्य उधृत करावे.