शेती हा माझा मूळ व्यवसाय असल्यानं तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे रोजच्या वर्तमानपत्रात शेतीविषयी जे काही येते ते मी आवर्जून वाचतो. असेच एकदा वर्तमानपत्रात झाडांच्या कलमांविषयी माहिती आलेली होती. त्यात पाचर कलम, गुटी कलम, भेट कलम इ. प्रकारांची माहिती होती, त्यापैकी भेट कलमाची माहिती विशेष वाटली. थोडक्यात ती अशी. दोन वेगवेगळ्या पिशव्यांत दोन वेगवेगळी रोपं वाढवली जातात.