उत्तराखंड पुनर्निर्माण कार्याबद्दल चर्चा

सर्व वाचक व लेखकांना मन:पूर्वक नमस्कार!

उत्तराखंड पुनर्निमाण कार्यामध्ये थोडा सहभाग घेता आला. त्याबद्दल माहिती शेअर करू इच्छितो. हिंदीमध्ये ब्लॉगद्वारे अनौपचारिक लेखन केले आहे. मराठीत लिहिले नसल्यामुळे इथे थेट प्रकाशित करू शकत नाही, ह्याबद्दल सर्वांची माफी मागतो. सर्वांच्या अनुमतीने ब्लॉगची लिंक इथे शेअर करतो.

चेतावनी प्रकृति की १ (प्रारंभिक भाग)

९ / ९ / ६९ चे दोन महापूर

कादवा व गोदावरी या दोन नद्यांच्यामध्ये कादवेच्या कुशीत टेकडीवर वसलेलं माझं जुनं जळगांव फार तर ७०-८० घरांचं असेल, मला ते फारसं आठवतही नाही. कारण माझा जन्मच मुळी आम्ही रानात वस्तीवर राहायला गेल्यावर झाला. गावाशी माझा फारसा संबंध आलाच नाही. जो काही संबंध आला तो शाळेत जाण्यापुरताच, तोही दोनच वर्ष. इतरवेळी फक्त सणासुदीला, कारु-नारुंकडे कामापुरते जाण्याच्या निमित्ताने आला तोही थोडकाच.

      आमचं मळ्यात गुऱ्हाळ होतं. त्यामुळे सीझनमध्ये राहण्यासाठी मळ्यात शेड बांधलेलं होतं. जस जसा शेतीचा पसारा वाढला तसं गावात राहून शेती करणं अवघड झाल्यानं मळ्यातच मोठं घर बांधलं.