नाटाचे अभंग... भाग २६

२५. ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी ।
 राम कृष्ण नामें बरीं । हरि हरी दोष सकळ ॥१॥
 जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना ।
 महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥धृ॥
 चक्रपाणि गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा ।
 सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥३॥
 मदनमूर्ति मनमोहना । गोपाळगोपिकारमणा ।
 नटनाट्यकौशल्यकान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥४॥
 गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी सर्वजाणा ।
 करोनि अकर्ता आपणा । नेदि अभिमाना आतळों ॥५॥

सिगार केसची चोरी

ब्रेट हार्ट ह्यांच्या 'कन्डेन्स्ड नॉवेल्स: सेकन्ड सिरिज' (१९०२) ह्या पुस्तकातील 'द स्टोलन सिगार केस' ह्या शरलॉक होम्सकथांच्या विडंबनाचा स्वैर अनुवाद. एलरी क्वीन संपादित 'द मिसऍडवेंचर्स ऑफ शरलॉक होम्स' (१९४४) ह्या विविध लेखकांनी लिहिलेल्या होम्सकथांच्या विडंबनांच्या संग्रहात मार्क ट्वेन, अगाथा क्रीस्टी, ओ.