नमस्कार,
मराठी माणसं अशीच असतात का ?, हा प्रश्न मला पडला, जेव्हा मी अमेरिकेतील मराठी आणि इतर भारतीय भाषिक लोकांच्या संपर्कात आलो.
गुजराथी, तमिळ, तेलुगू भाषीय भारतीय माणसं एकमेकांशी कायम त्यांच्याच भाषेत बोलतात, भले त्यांच्याबरोबर आपल्यासारखा परभाषीय असो. या लोकांना त्यामुळे काहीही फरक पडत नाही.