सामोसा

वाढणी
४-५ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
120

जिन्नस

  • मटारचे दाणे अर्धा किलो
  • १ मोठा बटाटा, १ छोटा कांदा, ७-८ मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या,
  • प्लॉवर ची फुले ३-४, लिंबू अर्धे छोटे, चिरलेली कोथिंबीर १ वाटी, तीळ ३-४ चमचे
  • धने-जिरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, हळद, हिंग थोडे, मीठ, साखर.
  • मैदा २ वाट्या
  • तळणीसाठी तेल

मार्गदर्शन

कूकरमधे मटारचे दाणे व बटाटा शिजवणे. शिजलेले मटार रोवळीमधे पाणी निथळण्यासाठी काढून ठेवणे.

यडा मका अर्थात क़ेझी कॉर्न

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • अमेरिकन गोड मका (कोवळे कणसाचे दाणे- बाजारात मिळणारे)-३ वाट्या
  • अमुल बटर- १ टेबलस्पुन
  • चाट मसाला- १ टिस्पुन
  • मिरेपुड -१/२ टिस्पुन

मार्गदर्शन

थोडे पाणी ( मक्याचे दाणे बुडतील ईतकेच) घालुन मका शिजत ठेवावा. ५ मिनीटानी त्यात अमुल बटर, चाट मसाला, मिरेपुड या इतर वस्तु घालाव्यात. अजून ५-७ मिनीटे शिजवावे. नन्तर गरम गरम खावे. हा अतिशय सोपा आणि चवदार पदार्थ आहे.

विशेष सूचनाः

फोडणी

वाढणी
गैरलागू

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • तेल, साजुक तूप आणि/किंवा वनस्पति तूप
  • मोहरी
  • हिंग
  • जिरे
  • हळद

मार्गदर्शन

फोडणी हा वरवर साधा वाटणारा विषय पाककलेमध्ये खूप महत्वाचा आहे म्हणून मी त्याबद्दलच लिहायचे ठरवले.

फोडणी हा प्रकार भारतीय जेवणात लज्जत आणण्यासाठी जन्माला आला आहे.  यालाच हिंदीमध्ये तडका असे म्हणतात. गुजराथीमध्ये "वगराळी म्हणतात असे अंधुक आठवते.  इतर भाषेत काय म्हणतात ते समजून घ्यायला मजा येईल.

दही पालक

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १-पालक जुडी
  • २ वाट्या दही
  • फोडणीचे साहित्य, लाल मिरच्या, मेथी

मार्गदर्शन

पालक धुवून चिरून घ्यावा.
पातेल्यात पाणी न घालता पाचकपात्रात मऊ शिजवून घ्यावा.
शिजलेला पालक गार झाल्यावर त्यात दही आणि चवीला मीठ घालवे आणि चमच्याने सारखे करून घ्यावे.
त्यावर थोड्या तेलाची (तुपाची आवडत असली तर तुपाची) फोडणी करून घालावी.  फोडणीत लाल मिरच्या आणि मेथी घातल्याने चव आणि स्वाद छान येतो.

मदत

मदत हवी आहे.. मदत.

      मी सध्या m.b.b.s. च्या तिसऱ्या वर्षात असून ... माझी पदवीपूर्ण परीक्षा डिसेंबर २००७ मध्ये संपेल... म्हणजे internship संपून मला पदवी मिळेल...
      मला  (non clinical)  वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करावयाचे आहे.. या पदवी नंतर मला काय करावे लागेल ज्यामुळे मला संशोधनाच्या वाटा मोकळ्या होतील?   याबद्दल कोणी मला मदत करू शकेल काय? 
      संशोधन परदेशात करण्याचा सध्यातरी माझा मानस आहे?

ताकातला पालक

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • पालकाची मध्यम जुडी १
  • १ मिरची, अर्धा चमचा लाल तिखट,
  • साखर अर्धा चमचा, मीठ, तेल
  • १-२ चमचे डाळीचे पीठ
  • २-४ चमचे दाण्याचे कूट
  • आंबट आणि दाट ताक १ वाटी

मार्गदर्शन

सार्वजनिक क्षेत्रात अभियांत्रिकी

आपल्या माहितीत कोणी योग्य उमेदवार असल्यास त्यांना जरूर कळवावे.
कोची रिफायनरीस् शेवटची तारीख २५ नव्हेंबर २००५
पॉवरग्रिड कॉ. शेवटची तारीख ५ डिसेंबर २००५
भारत पेट्रोलियम कॉ.  शेवटची तारीख ५ डिसेंबर २००५