आभाळ वाजलं धडाऽडधूम
वीज चमकतानाचे आकाशातील दृश्य विलोभनीय खरेच. वीजेचा चमचमाट, ढगांचा गडगडाट आणि पाऊस म्हणजे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटकच. ही वीज आकाशात कशी निर्माण होते, वातावरणातील वीज म्हणजे काय? वीज चमकते, पडते म्हणजे नक्की काय होते? ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरे (काहीप्रमाणात) देण्यासाठी हा लेखप्रपंच. श्री. तात्या अभ्यंकरांच्या विनंतीखातर ही चार भागांची लेखमाला मनोगतींसाठी लिहित आहे. नेहमीप्रमाणे प्रश्न, अधिक माहिती, टीका ह्यांची अपेक्षा आहेच.