मी आतापर्यंत कधीही कसलेही लिखाण केलेले नाही. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी आपण यांवर जरूर प्रतिक्रिया / प्रतिसाद द्यावेत,म्हणजे मला थोडासा धीर येईल. ('कोणीतरी वाचणारे आहे आणि कान पकडणारे पण आहे' असे वाटेल. !! )
जेफरी आर्चर (Jefferey Archer) यांच्या "Clean sweep Ignatius " या कथेचे रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे.सध्या देशात स्विस बॅंकेतील पैसा परत आणण्याविषयी मोठी चर्चा चालू आहे.त्यामुळे या कथेची निवड केलेली आहे.मूळ कथेत नायजेरिया असा देशाचा उल्लेख आहे.रूपांतर म्हणण्याचे कारण मूळ कथेत काही बदल (व नामांतरे) केलेले आहेत.
माझ्या एका मित्राला आपल्याला आलेले अनुभव अगदी छानपैकी रंगवून सांगण्याची कला अवगत आहे व हौसही आहे. याउलट माझा स्वभाव ! म्हणजे आलेले अनुभव अगोदर माझ्या लक्षात थोडेच रहातात आणि ते रंगवून सांगण्याची हातोटी तर मुळीच नाही.माझ्या बहिणींना ती हातोटी होती,म्हणजे त्या आता नाहीत त्यामुळे ती कलाही त्यांच्याबरोबरच लयास गेली, त्यांच्या रंगवून सांगितलेल्या गोष्टी ऐकून खूष होणारी माझी मायमाउली पण आता नाही.
खरेतर आपण सर्वांनी मिळून देशाला विकासाकडे नेत आहोत परंतु अद्यापही आपण विकासात मागेच आहो तेव्हा आपला सर्वांचा सहभाग हा या कामी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले तेव्हा आपण एक म्हणजे ज्या सुट्या घेतो त्या ऐवजी पगारी रजेत वाढवून घेऊ म्हणजे ज्याला त्या सणाला घरी राहायला नको असेल तो कामावर येईल व जर रजा राहिला तरी पगाराचे नुकसान व्हायचे नाही या दृष्टीने झाला तर फायदाच होईल. आपल्या देशाला विकसित करण्यासाठी त्याचा फायदाच व्हावा असे वाटते. त्यामुळे आपली बँक वगैरे सरकारी कामे पण लवकर व्हावीत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.