थ्या रोजी धुयमाती झाली. या होयीले मी भल्लाच खुश होतो. मायी हे पयलीच होयी होती. मांगच्या साली लगीन ठरलं होतं. होयीच्या आठ दिस पयले "शालमुंदी" झालती. पण शालमुंदीमधं मामा (बायकोचा बाप) खडुस अन रागिट हाये हे सोतच्या डोळ्यानं पायलं व्हतं. अन माया एक साया पैलवान होता. म्हणुनशान मांगच्या साली सासरी जायची हिंमत झाली नव्हती. पन यावर्षी म्या चानस सोडला नायी. सासऱ्यान खुप फडफड केली पण म्या बी त्याले सिदंसिदं सांगितलं. मीनं म्हतलं,
"पैली होयी हाये, आमच्या घरी सुनेचं कवतिक केल्या जाते, तिले साडी चोळी द्याचे परंपरा हाये... " आता ही आमच्या घराची "कष्टम" आहे म्हनल्यावर बुडा काय बोलनार ?