"बरे सत्य बोला, बरे सत्य चाला /
बहु मानती लोक येणे तुम्हाला/" संत रामदास
रामदास असोत की तुकाराम, साऱ्याच संतानी एकमुखाने सत्याची महती गायली आहे. एवढेच नव्हे तर, सर्वच धर्मात सत्याचे गोडवे गायलेले दिसतील. अधुनिक जगातील सर्वच विधी आणि न्याय व्यवस्था, आज सुद्धा नागरिकांकडून सत्य वर्तनाचीच अपेक्षा ठेवतात.
पण सत्य म्हणजे काय?
'सत्य' हा शब्द सत् पासून बनला आहे. सत् म्हणजे चांगले. सदाचरण या शब्दात सत् + आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन आहे.
पण सत्य शब्दाचा मला वाटणारा अर्थ थोडा वेगळा आहे- पहा पटतो का?