'वधू पाहिजे' जाहिरातींचे काही नमुने-
---***---
वर-वकील
अपेक्षा - ही नोटिस वाचणारे आणि न वाचणारे या सर्वांस मी या नोटिशीद्वारे कळवत आहे की मी एका जीवशास्त्रीय भाषेत जिला स्त्री म्हणता येईल अशा २१ ते २५ वयोगटातील लग्नेच्छू मुलीच्या शोधात आहे. आपण किंवा आपल्या माहितीतील कोणी मनुष्य प्राणी उपनिर्दिष्ट व्याख्येत बसत असल्याचे आढळल्यास तसा पुरावा घेऊन कोर्टाबाहेर भेटावे. कदाचित मामला तिथेच मिटवण्यात येईल.
---***---
वर-अंतराळवीर
अपेक्षा - माझ्या अवकाशात सामावेल अशी, परग्रहासह कुठेही मिळून-मिसळून राहील अशी.