गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी (भाग ४)

(हे सदर म्हणजे सत्यकथा आहेत. )

गवाराच्या शेंगांची भाजी आणि तो नियतीचा खेळ

मेरा भारत महान!

मी पुण्यात एका आघाडीच्या भारतीय आय. टी. कंपनीत काम करत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. एका जगप्रसिद्ध इन्वेस्टमेंट बँकेसाठी काम करणाऱ्या खात्यात मी होतो. मी ज्या संघात काम करत होतो त्या संघाचा व्यवस्थापक एक स्कॉटिश मनुष्य होता. स्कॉटिश लोक म्हणजे आपल्या पुणेरी लोकांच्याही वरताण. फोनवरून होणाऱ्या संभाषणातही त्याचा खडूसपणा आणि नकळत टोमणे मारायची लकब लगेच समजून यायची. शिवाय जे लोक लंडनला जाऊन त्याला भेटून येत ते त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से सांगत असतच. तर असा हा मनुष्य, जॉन म्हणूया त्याला, एकदा पुण्यात आला.