प्रभाकर मॅट्रिक झाल्यावर तो ही नोकरीच्या शोधात मुंबईस आला. अण्णाकडेच आम्ही राहत होतो. त्या दोन खोल्यांत अण्णा, वहिनी, तीन मुले राहत असल्याने माझ्याबरोबरच प्रभाकरही गॅलरीत अथवा गच्चीत झोपू लागला. पुढे पावसाळा आला तरी प्रभाकराच्या नोकरीचे काही जमेना. कोंकणात शेतीची कामे अडली होती आणि इकडे ग्यालरीत पावसामुळे झोपायची पंचाईतच होत असे. त्यामुळे त्यास कोंकणात परत पाठवून दिले आणि नोकरीचे काही जमले की त्याने परत येण्याचे ठरले. इकडे बाळही मॅट्रिक झालेला होता. त्यामुळे राजापुरातले कानेटकर मास्तर काही दिवसांनी त्यास घेऊन मुंबईत आले. आले ते अण्णाकडेच. प्रभाकराऐवजी आता बाळ आणि मी राहू लागलो.
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी.
अशी जाहीरात करत ३ एप्रिलला नवा चित्रपट प्रदर्शित होतोय.
पुर्वी मुंबईत डायनासोरसारखा दिसणार मराठी माणुस आज चिलटासारखा झालाय ? मराठी / घाटी म्हणून घ्यायची लाज वाटते ? ......... इथून "गर्व आहे, मी महाराष्ट्रीय असल्याचा" पर्यंत.
गोरेगावात नाना जेथे राहत होता त्याच्या शेजारीच अण्णा बिवलकर आणि विद्वांसदादा यांचा कोळशाचा कारखाना होता. सुटीच्या दिवशी मी बरेचदा नानाकडे जात असे. तेथे अण्णा व दादांशी ओळख झाली. पुढे नानाजवळ बिवलकरांनी "हा मुलगा कोण? काय करतो? शिक्षण किती? " अशी चौकशी केली आणि एक दिवस नानाकरवी मला आपल्याकडे बोलावून घेतले. वरळीच्या वसंतविजय मिलमध्ये काम करशील काय? अशी विचारणा त्यांनी केली. रात्रपाळी, तसेच कोणतेही काम करावे लागेल हे सांगितले. मी दुसऱ्या चांगल्या नोकरीच्या शोधात होतोच. रोजंदारीवरच्या प्लॅस्टिक कं पेक्षा ही मिल बरी.. असे म्हणून बिवलकरांबरोबर मिलमध्ये गेलो.
तुन्ही म्हणाल की आम्हाला १४ फेब्रुवारीची उत्सुकता आहे १६ ची नाही. काय करू? लिहूच शकलो नाही १४ ला. पण रागवू नका. मी तुम्हाला १४ ला काय झालं तेच सांगणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.