सोबत

शनिवारी रोहन बिल्डिंगखालूनच नाश्ता करून आला. त्याने ऑफिसचा शर्ट काढला, घरातला घातला. कुलुप लावून वळला तर समोरच्या दारात एक मुलगी होती. रोहन कसनुसं हसला. तीही हसली.
     रोहन खाली उतरला. फिरायला चालत चालत खूप दूरवर गेला. नव्या शहरातला हा भाड्याने घेतलेला फ्लॅट उत्तम असल्याचे त्याने गेल्या आठवड्यात घरी कळवले होते. फ्लॅट ऑफिसच्या जवळच होता. आज ऑफिसमधल्या त्याने इतर काही गोष्टी सांगितल्या. कॉलनीतल्या काही गोष्टी सांगितल्या. खूप भटकून हॉटेलमध्ये जेवायला गेला.  
     एका बुधवारी त्याने घरीच सँडविचेस बनवली.

यज्ञोपवितं परमपवित्रं ।

   ( केवळ विनोद म्हणूनच या लेखाकडे पाहावे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा यात हेतू नाही )

सोनेरी फुलं आणि म्हातारा

हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच ताटव्यात सोनेरी फुलं डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हाताऱ्याला त्याची परवा नव्हती.  तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.