कुठल्याही गाण्याच्या प्रसिद्धी नंतर लोकप्रियता मिळते ती गायक, गीतकार व संगीतकारांना, परंतु गाणं ते एक टीमवर्क आहे. ते लोकप्रिय होण्यासाठी त्याच्या संगीताला साथ केलेल्या वादकांचा त्यात सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे त्याचे श्रेय हे वादकांना देखिल तितकेच मिळाले पाहिजे. असे मनोगत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की ह्यांनी व्यक्त केले.