स्त्री दाक्षिण्य म्हणजे, पुरुषांनी स्त्रियांप्रती दाखवलेली ऋजुता; सौजन्य!
हा शब्द कसा आला असावा?
माझे अनुमान-
वामा म्हणजे स्त्री. अर्धनारीनटेश्वराच्या रुपात, शंकराचे डावे अंग 'स्त्री'चे असते. 'वामांगी
रखुमाई' यात ही डावा भाग म्हणजे स्त्री हेच अधोरेखीत होते.
याचाच उतरार्ध दक्षिण म्हणजे पुरुष होय.
स्त्री दाक्षिण्य म्हणजे, दक्षिण भागाने (म्हणजे पुरुषाने) डाव्या अंगा साठी (म्हणजे स्त्रियांसाठी) दाखवलेले (सौजन्यपूर्ण) वर्तन होय!
'पुरुष दाक्षिण्य' असा शब्द अस्तित्वात नाही हे ध्यानी घ्यावे!