किती चतुर या बायका!

प्रख्यात लावणीकार राम जोशी हा उत्तर पेशवाईतील शाहिर. त्याने मराठीस अनेक लेणी दिली आहेत. येथे त्याचे अपन्हुती अलंकाराचे उदाहरण प्रस्तूत करत आहे. त्यातील अर्थ-फोड जमते का पहा!

"अंबरगत पयोधराते रगडूनी पळतो दुरी"

"कोण गे नंदाचा हरी?"

नव्हे ग, मारुत मेघोदरी"

किती चतुर या बायका,

रसिकहो, छेकापन्हुती आयका!

कोल्हे-कुई

(पोपटपंची १,२ प्रसिद्धी पावल्यानंतर पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये. )

केशवाचे कपट, काकांची कमाल

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.

पिंजारी - १

काही वर्षांपूर्वी, उन्हाळ्यात केव्हा तरी, एक फॅक्स...
"नवी गावं आपल्या कामाला जोडून घेतेय. येशील का? पेवलीपासून सुरवात. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, राहून गेलं..."