येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहापाशी पंकजा पोचली तेव्हा आजूबाजूच्या रहदारीत रविवार सकाळचा संथपणा होता. तिने फाटकातून आत नजर टाकली तर तिथेही सामसूम होती. फक्त एक सशस्त्र रखवालदार खुर्चीवर बसला होता. फाटकालगतच्या चौकीत दोन बायका काही कागदपत्रे चाळत बसल्या होत्या. त्यातली एक कारागृह अधीक्षक असावी.
सालाबादप्रमाणे ऒस्कर नॉमिनेशन्स डिक्लेअर झाले आणि स्लमडॉग मुळे इथे चर्चेला वेगळेच उधाण आले. नेहमीप्रमाणे स्पर्धेतले इतर चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यामुळे "द क्युरियस केस ऒफ बेंजामिन बटन" नावाचा चित्रपट इंटरनेटवरून डाउनलोड करून बघितला. चित्रपटाची कल्पनाच भन्नाट होती. एखाद्या व्यक्तीला आपले आयुष्य बालपण ते म्हातारपण असे न जगता उलटे जगायला मिळाले तर काय गंमत होईल अशी ती कल्पना.
'स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कधीही व्यर्थ नराची"
अनेक सुभाषिते आपण सतत ऐकत असातो. सारीच काही अनुकरणीय असतील असे नव्हे. वरील सुभाषित असेच अननुकरणीय! यातील पुर्वार्धासंदर्भात - परामेश्वराची करण्याबाबत - मी बोलत नाही आहे. माझा प्रश्न ''नरा''ची स्तुती करण्यासंबंधी आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.