क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळून पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपून जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रू किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात. अशा सामान्यातल्या असामन्य क्रांतिकारकांपैकी एक नाव म्हणजे मास्टरदा उर्फ सूर्य सेन ज्याने फक्त एका ध्वजारोहणासाठी आपले आयुष्य भिरकावून दिले!