या आधीचा भाग इथे वाचा : दुवा क्र. १
-----------------------------------------------------
मी सुजाता काटकर. इ. ९ वी.
सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे. तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं.