राजेंची कहाणी सुरू झाली.
"शिबिरानंतरचं वर्ष व्यवस्थित, काही कारणानं स्टेज सुटलं, गर्द, नंतर इंजेक्शन्स, मुंबई, अंडरवर्ल्ड, घोडा, रावसाहेबांशी संबंध, व्यसनांतून बाहेर, रावसाहेबांमुळंच मंत्रालय हे ‘करियर’..." राजे. घोडा शब्दापाशी पिस्तुल, रिव्हॉल्वरची खूण.
फक्त स्वल्पविराम असलेलं हे तुटक शब्दांचं वाक्य. आधीच्या प्रत्येक स्वल्पविरामामध्ये खंत, खिन्नता, अपराधीपणा आणि शेवटच्या करियरवर एक छद्मी हास्य. वाक्य बोलून झाल्यानंतर एक दमदार झुरका.