केव्हातरी मध्ये एकदा नातवाचे स्टडी टेबल आवरत होते. एका डब्यात हे एवढे सुगंधी रबर, स्टीकर्स, तुटकी पेन्स, स्केचपेन्स, चमचमत्या टिकल्या, गिफ्ट मिळालेल्या पण कधी न वापरलेल्या असंख्य वस्तू. आपल्या दृष्टीने नुसता कचरा साठवलाय झालं. पण विचारल तर त्यातील एकही वस्तू टाकून देणार नाही. मग मला आठवलं, आपणही आपल्या लहानपणी असंच मोरपिसं, चित्रे, काचेचे तुकडे, मणी अन असंच काहीबाही साठवत होतो.