पार्लेश्वर नेहमीप्रमाणे आजही गजबजलेलं होतं. त्यातल्या त्यात मंगळवारी सायंकाळी सातची वेळ म्हणजे निव्वळ लगबगीची वेळ. ही गर्दी पार्लेकरांनाच काय, कोणत्याही जाणकार मुंबईकराला नवीन नाही. गुरूवारी साईमंदिरात व मंगळवारी पार्लेश्वरात.. अशी वार लावून देवदर्शन घेणाऱ्यांची कमतरता नाही. पण त्यात त्यांचाही काय दोष म्हणा. या धावपळीच्या जगात जिथे स्वतःसाठी वेळ नसतो, तिथे देवासाठी आवर्जून वेळ काढायचा म्हणजे थोडं कठीणच!