विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व मनोगतींना हार्दिक शुभेच्छा!

भारतीयांच्या विजिगिषू वृत्ती अशीच वाढीला लागो! पुढचे दशक, शतक नव्हे सहस्त्रक देखील आमचेच आहे!

भारतीयांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून अखिल जगात वंदनीय व्हावे,   भारताने पुन्हा जगद्गुरू व्हावे आणि प्राचीन भारतीयांनी दाखवलेल्या प्रेमाच्या मार्गावर सर्व जगाने चालावे, भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, हीच आकांक्षा!

एतद्देश प्रसूत्स्य सकाशादग्रजन्मना / स्वं स्वं चरित्रं शिक्षेस्न पृथ्विव्यां सर्वमानवां: //

न आकळलेलं काही...१

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं जाण्याचं, तिनं मनात घर करण्याचं कारण कोणतं असं विचारलं तर त्याचं गणिती उत्तर शक्य नसतं. सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! काहींचा या चारही मितींमध्ये लीलया संचार होतो, ही मंडळी स्वर्गीय काही तरी घेऊन जन्माला आलेली असतात; त्यांचं जगणं बहुतेकदा पाचव्या मितीमध्ये होत असावं.

वाईन क्रीम

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • ५०० मिली व्हाइट वाइन
  • १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर
  • एका लिंबाचा रस
  • १ चिमूट मीठ
  • २ अंडी
  • २ चमचे मोंडामीन किवा आरारुट किवा स्टार्च

मार्गदर्शन

अमेरिका आणि भूक!

माणसाला खायला का लागतं? इकडे आल्यापासूनच हल्ली असा प्रश्न पडायला लागला आहे. दररोज खायला लागतं म्हणून रोज खायला बनवावं लागतं आणि मग आता आज काय करायचं स्वयंपाकाला असा प्रश्नही पडायला लागतो. कितीही याद्या करून ठेवल्या आणि मेन्यू च्या पुस्तकात पाहिलं तरीही हा प्रश्न पडतोच. निदान मला तरी! कारण आठवडाभराच्या पदार्थांची यादी केलेली असली तरीही दोन दिवस त्याप्रमाणे जेवण बनतं पण तिसऱ्या दिवशी यादीमध्ये लिहिलेलं एकतर करायचा तरी कंटाळा येतो; नाहीतर खायचा तरी. मग आता काय करायचं खायला? परत तोच प्रश्न!