माझ्या यापूर्वीच्या अशा प्रकारच्या विनोदांना सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा हा मुद्राराक्षस परतलाय, माझ्या मनातून मनोगतवर....
रिटर्न ऑफ मुद्राराक्षस...!!!
* दगडी चाळीत नवरा उत्सव सुरू ( नवरात्रोत्सव )
* पुण्यात पडली धडाक्याची थंडी ( कडाक्याची )
* खिशात मोबाईल ठेवून बोलणे पातक! ( घातक )
* हिमाचल प्रदेशात बस दरीत मिसळली ( कोसळली )
* फिल्मफेअर आवड समिती ची यादी जाहिर झाली. ( निवड )
* सहा दोषींना काशीची रिक्षा ( फाशीची शिक्षा )
* वाहनतळ परिसरात जुगार अड्डे सोकावले ( फोफावले )