हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या, माझ्या या भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्येच नव्हे, तर तात्त्विक, वैज्ञानिक, ज्योतिषी, काव्य, साहित्य, कथा इत्यादी आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये महाभारत या महाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा असाधारण मारा म्हणा किंवा संबंधित सरकारचे उदासीन धोरण म्हणा, कदाचित भारतीयांची कमी होत जाणारी रुची म्हणा, महाभारतासारख्या "यदौछिष्टम् जगत्सर्वम्" ला भारतीय माणूस नव्हे, भारतीय रक्त विसरत आहे.