प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे.
मी 'अर्थाचा विनोदी अनर्थ' या मालिकेत या पूर्वी तीन भागांत विविध वृत्तवाहिन्यांच्या निरर्थक बातमी देण्याच्या पद्धतींवर आधारीत एक विनोदी कथा लिहिली होती. आता पुन्हा आपल्यासमोर सादर आहे नवी कथा. हा आहे अर्थाचा विनोदी अनर्थ या मालिकेचा चौथा भाग.
न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते-
थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई).....