असं होतं का तुमच्या बाबतीत?
म्हंजे कसं माहीताय... सकाळी उठल्यावर स्वतःची तयारी, मुलाची तयारी, किचनमधून येणारे विनंतीवजा हुकूम, मध्येच वाजणारा मोबाईल, टाकीत पाणी चढवण्याचा कार्यक्रम, लोडशेडींगची अवचित येणारी हाक, मुलाला शाळेत पोहोचवणे वगैरे.. वगैरे यातून रस्त्यावरील नाना अडचणींना तोंड देत, पार्कींगमध्ये गाडी ढकलून वेळेवर आलेली गाडी गाठायची. दम लागला...