गावोवावी ... (२)

सतत बदलणे, पुढे पुढे जाणे हा तर  काळाचा नेमधर्मच आहे. या सतत पुढे जाणाऱ्या काळाच्या चालीशी जुळवून घेण्यातच शहाणपणा आहे. कारण " थांबला तो संपला".   हे सर्व खरे असले, तरी नित्यनेमाने  घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना  कधी कधी गोंधळायला  होते.   जसेजसे वय वाढत जाते, तशी आपली मते, आवडीनिवडी आणि सवयी देखिल पक्क्या होत जातात. चवींचे देखिल तसेच आहे.

गावोगावी

अगदी पहाटे पहाटे आम्ही दिल्ली मध्ये पोहोचलो होतो.  रात्रभराच्या प्रवासाचा  शीण तर होताच,  त्यातही आमची ट्रेन ठरलेल्या  वेळेपेक्षा अनेक तास उशीरा निघाली होती,  त्याचा वैताग जास्त होता.

टोमॅटोच्या फ़ोडी!

टोमॅटोच्या फोडी!

जगण्यामध्ये यमक शोधणाऱ्या लोकांची एक गंमत असते. 
कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्ट त्यांना त्यांच्या अशा मेहेफिलीत घेऊन जात असते. 
तुम्हाला दिसतो म्हणजे आम्ही,
पण क्षणभरासाठी लागलेल्या तंद्रीमध्ये आम्ही कितीही वर्षे मागे जाऊन कितीही वेळ घालवून येऊ शकतो! आणि शक्यतो कुठे आणि किती वेळ जायचे हे आमच्याही हातात नसते! 
"खाणार आहेस का ती कोथिंबीर?"
बायकोने असे विचारले आणि ताटात उरलेल्या टोमॅटोच्या २-३ फोडींकडे लक्ष्य गेलं. 

सदानंद

यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आयआयटी कॅम्पसला ऑटोने नव्हे तर सायकल रिक्शांतून जायचे ठरवले. पहिल्यांदा ऍडमिशन साठी आले होते तेव्हा सभोवतालचे दृश्य पाहून फार छान वाटले होते. पण बरोबर आई आणि माझ्या चार मोठ्या बॅगा, म्हणून टॅक्सी केली होती. त्याच वेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेव्हा स्टेशन ते कॅम्पस  सायकल रिक्शांची मजा लुटू. मी स्टेशनबाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. मी एका रिक्षेकडे वळले आणि पाठमोऱ्या असलेल्या त्याला विचारले," तुमि की आमाके आयआयटी निये आबे..?" रिक्षावाल्याने माझ्याकडे वळून पाहिले, आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदानंद!

ही का..

ही का भुई आहे अशी भेगाळलेली

वस्ती अशी का पावसाने टाळलेली

 जो रंग दिसला तो गुलाबी पाकळ्यांचा

नव्हती कधीही वाट ती रक्ताळलेली

 ज्वाळेतुनीही गंध आला परिचयाचा

पत्रे तुझी माझी इथे मी जाळलेली

 दिसले अचानक नाव एकाचे अखेरीला

होती वही गुपचूप मीही चाळलेली

कथा एअर कंडीशनिंगची

    सत्यघटनेवर आधारीत कथुली
 
     मी एका ठिकाणी माहिती केंद्रात काम करीत होतो. तेथे असलेल्या वातानुकूलन यंत्र बिघडलेले होते. थोड्या दुरुस्तीनंतर ते यंत्र पुन्हा सुरु होत असे व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. नव्या यंत्राची निकड होती. नवीन यंत्र घ्यावे किंवा केंद्राची पूर्ण खोलीच वातानुकूलित करावी असे दोन पर्याय समोर येत होते. 

अन्नं हे पूर्णब्रह्म

अचानक पाऊस कोसळायला लागला. अनंत हस्ताने वरूण राजा, पृथ्वीवर जलाभिषेक करीत होता. पावसाचा एकंदरीत नूर पाहता,   त्याचा लवकर परतण्याचा विचार काही दिसत नव्हता.   आम्ही चांगलेच अडकलो होतो.

आत्मनिर्भर व्हायचे आहे ? तर मग त्याकरता . . . .

आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळीक; संतापलेल्या भारतीयांनी चिनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हाक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्त्वाचे राहणार नाहीत.

श्रुती आणि स्मृती !......

श्रुतीआणि स्मृती !......

 आपण एखाद्या  देवकार्याचा संकल्प करत असताना  वरचे वाक्य आपल्या कानी पडते . पूर्ण संकल्प आपण नीट ऐकण्याच्या मानसिकतेत नसतो ...असो तो मुद्दा इथे नाही,आणि अधिकारही नाही . तर स्मृती म्हणजे आठवण . आठवणी इतकी विलक्षण आणि महत्त्वाची वस्तू ह्या जगात दुसरी नाही .... ती इतकी महत्त्वाची असते की तिच्यामुळे आपल्या जीवनावर अनेक परिणाम होत असतात ..आता एक बघ !, आपण जर चालणे , बोलणे विसरलो तर?, गोष्ट अगदी छोटी पण तिचा जीवनावर प्रभाव केवढा पडतो .