गुलमोहोर - १

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. आणि तोही जेमतेम साडेदहा वाजताच. मी नुकताच सायकल शिकलो होतो आणि त्या कलेचा सराव करण्यासाठी आमच्या घरासमोरच्या सिंधी कॉलनी नावाच्या अतिगलिच्छ वस्तीतल्या रस्त्यावर चकरा मारत होतो. एकाहून एक गलेलठ्ठ बायका सलवार कमीज मध्ये त्यांची गुळाच्या ढेपीसारखी शरीरे कोंबून हातामध्ये स्टीलचे कडीवाले डबे हिंदकळवत इकडून तिकडे लगबगत होत्या. त्या डब्यांत बहुधा त्यांची ती तुपात थबथबलेली बटाट्याची भाजी असावी. आमच्या घरासमोरच्या हर्दवानी काकूंनी एकदा कुठल्याशा कारणाने ती भाजी आमच्याकडे पाठवली होती. ती संपवताना तर नाकी नऊ आलेच, शिवाय तो डबा धुताना त्याला चिकटलेले जे तूप होते, त्यात आमचा एकावेळेचा शिरा झाला असता असे आईने स्वच्छ सांगून टाकले. हे ऐकायला दुसरे कोणीच नसल्याने मी ते ऐकले आणि लक्षात ठेवले.

२ मिनिटे शांतता......

              परवा कार्यालयात, एच आर ची "सॅड डिमाईस" ची मेल आली. ' कंपनीतल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा हृदयविकाराने अकाली मृत्यू, पाठीमागे आई, पत्नी आणि ३ वर्षांचा मुलगा. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून सर्वांनी २ मिनिटे शांतता पाळण्याचे आवाहन'.

किस बाबा किस!

----------
बोंबला!
साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा. लग्न न झालेली नणंद, संसारातच पाय अडकलेली सासू वगैरे), घरातलं राहणीमान (वॉशिंग मशीन, फ्लॅट्रॉन टीव्ही, चारचाकी वगैरे), राहण्याचे ठिकाण (शक्यतो कोथरूड ः बिबवेवाडी, कॅंप "चालेल') आदी निकष लावून (सूचना ः निकष प्राधान्यक्रमानुसार असतीलच, असे नाही. ) नवऱ्याची निवड करतात, असा आमचा आतापर्यंत समज होता. त्यासाठी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन केसांचे सेटिंग, (पुरुष मसाजरकडून) फेस मसाज, डिझायनर कपडे वगैरे अप-टु-डेट राहण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. पण हाय रे कर्मा! "हेची फळ काय मम तपाला' असे म्हणण्याची वेळ आमच्यावर अमेरिकेतल्या एका संशोधनाने आणली आहे.
सोबत या संशोधनाचा "महाराष्ट्र टाइम्स'मधील धागा जोडला आहे. या धाग्याने आमच्या भावी संसाराच्या सुखी स्वप्नांना टराटरा फाडले आहे. (अगदी हिमेश रेशमिया स्वरांन फाडतो, तसे! ) म्हणजे, विवाहेच्छू तरुणांकडे असलेली "उत्तमरीत्या चुंबन घेण्याची कला' ही तरुणींना सर्वाधिक आकर्षित करते तर?
आम्हाला ही माहिती अगदीच नवी होती. एकतर हल्लीच्या मुली एवढ्या सुधारल्या आहेत, याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात मुली अगदी पायाने जमीन उकरत नसल्या, तरी अगदीच नाकाने कांदे सोलत नाहीत, असा आमचा आपला एक समज होता. पण पहिल्याच कार्यक्रमात एका आधुनिक उपवर तरुणीने आम्हाला पोह्यांच्या बशीसह तोंडघशी पाडले! चक्क "एचआयव्ही टेस्ट' केली आहे काय, हे विचारून! नशीब, तिने रिपोर्टची झेरॉक्स आणून द्यायला सांगितली नाही!
तेव्हापासूनच मुलींच्या आधुनिकतेचा अंदाज यायला लागला होता. पण हा म्हणजे कहर झाला. उत्तम चुंबनकला, हीच मुलींवर प्रभाव टाकण्याची एकमेव कला आहे, हे तेव्हा कळले असते, तर पहिल्याच मुलीला भेटल्यावर आमचा ऑफिसातला हुद्दा सांगण्याआधी उत्तम चुंबनाचे प्रात्यक्षिकच आम्ही दाखवले असते!
अर्थात, चुंबनातले आम्ही कुणी जाणकार तज्ज्ञ नव्हे. पण वर्षानुवर्षं चुंबनाची जी प्रात्यक्षिकं आम्ही रुपेरी पडद्यावर पाहत आलो आहोत, त्यांचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची ही नामी संधी होती. बाकी, चुंबनकला अवगत नाही, म्हणून आमची प्रेयसी आम्हाला टाकून दुसऱ्यावर प्रभावित होण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, मुदलात, त्यासाठी आधी कुणी आमच्यावर भाळणं आवश्यक होतं! त्यामुळं चुंबनकलेत तरबेज होण्यासाठी चहापोह्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरं माध्यम नव्हतं.
"तुमच्या मुलीबरोबर थोडं एकांतात मोकळेपणानं बोलायचं आहे, ' असं म्हटलं, तरी अनेक भावी वधुपित्यांची साधारणपणे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्यांची झाली होती, तशी द्विधा मनःस्थिती व्हायची. कुणीकुणी तर दारामागे टपून राहायचे. आता आम्ही काय त्यांच्याच घरात तिचा विनयभंग करणार होतो का? पण छे! विश्वास म्हणून नाही.
पण ही बातमी वाचून आमच्यापुढे साक्षात तो ऐतिहासिक प्रसंग उभा राहतो. ""तुमच्या मुलीचं चुंबन घेऊन मला तिला "इंप्रेस' करायचं आहे, '' असं आम्ही या वधुपित्यांना सुचवत आहोत. मग भर मांडवातून मुलगी पळून गेल्यानंतर आनंदानं नाचणाऱ्या "दिल है के मानता नहीं'मधल्या अनुपम खेरसारखे हे वधुपिते आम्हाला डोक्यावर घेऊन नाचताहेत.
""घे, घे. मस्त चुंबन घे. इंप्रेस कर तिला! '' असं म्हणून प्रोत्साहन देत आहेत. ती मुलगी लाजून चूर होत आहे. आपला चेहरा उंचावून डोळे मिटून आमच्या बाहुपाशात विलीन होण्यासाठी आतुर होत आहे... मग ती आमच्या चुंबनकलेवरून आम्ही तिच्या बाळांचे सुयोग्य जन्मदाते ठरू शकतो का, याची पारख करून निवड करणार आहे....!
... आणि अचानक आमची तंद्री खाडकन भंग होते.
""अहो, बटाटे किसून देणार आहात ना? किस करायचाय ना? उठा! लोळत बसू नका! एकादशी आणि दुप्पट खाशी तुमचीच असते. उठा आता!! नाहीतर किस-बिस काही मिळणार नाही!! '' आमच्या सौभाग्यवतींची मृदू साद कानी पडते आणि जीव पुन्हा घाबराघुबरा होतो...
---------------
- कुमार आशावादी
------------------

नायलॉन कापड

मला ३-४ मी. रिपस्टॉप नायलॉन हे कापड पाहिजे आहे. पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे मिळू शकेल?

त्यातल्या त्यात हलके कापड पाहिजे (२१०d)

आपल्या इथे कोर्डुरा हे कापड कुठे मिळेल?

मला हे कापड बॅग शिवण्यासाठी पाहिजे आहे.

जगलेले अनुभव - १

    बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!
    हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले. ढगाळ वातावरण असूनसुद्धा जवळच कुठेतरी पायी चक्कर मारायला निघण्याचा मनसुबा मनात डोके वर काढत होताच, पण आपण बाहेर निघा अन् लगेच वीजूताईने वाकुल्या दाखवत परत या हे होऊ द्यायची माझी अजिबात ईच्छा नव्हती! पण काही-काही वेळाच अशा असतात की त्या आपला पुरेपूर अंत पाहतात!! आता जगात डास हा प्राणी(?) कशाला अस्तित्वात आला असावा हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्याचे मला पुन्हा मनापासून स्मरण व्हायलाच हवे, असे त्यास नेमके तेव्हाच का वाटावे?? शेवटी मुकाट उठलो जागचा, बाहेर चक्कर मारण्यासाठी!!
    ढगाळ वातावरण अन् १०-१०.३० ची रात्रीची वेळ यामुळे तशी रस्त्यावर बऱ्यापैकी सामसूम होती. बेटे रस्त्यावरचे दिवे मात्र चांगले उजेड पाडत होतेत अन् तिकडे आमच्या कॉलोनीत अंधाराचे साम्राज्य! (लगेहाथ इलेक्ट्रीसिटी बोर्डावरही वैताग काढून झाला!) नाही म्हणायला रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून लोक अभ्यास कसा करत असतील, असा आगंतुक प्रश्नही मनात डोकावून गेला. पण मी त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसलोय अन् पुस्तक वाचतोय, असे काहिसे न पचणारे वाचनप्रिय(!) विचार मनात आल्याबरोबर मूळ विचार एकदम रद्द करून टाकला! मुख्य रस्त्यावर एव्हाना कुत्र्यांची वर्दळ चालू झालेली दिसू लागली! बाकी आपल्यासारख्या वैतागणाऱ्या माणसांच्या रात्रीच्या झोपेचे खोबरे करण्यासाठीच ही भटकी कुत्री निर्माण केल्या गेलेली आहेत, अशी शंका गेले काही दिवस मला येऊ लागलेली. 
    रस्त्याच्या कडेने जात असताना दिसले, एका दिव्याच्या खाली थोड्या बाजुला एक म्हातारी भिकारीण तिच्या रात्रीच्या बिछान्याची तयारी करत होती. एक मरतुकडे कुत्रे तिच्या आसपास रेंगाळत उभे होते. त्या दिव्याच्या भोवती किड्यांनी कोंडाळे केल्यामुळे त्याचा प्रकाशही अंधुकसा होत होता. ठिगळं लावलेल्या दोन फाटक्या पिशव्या हीच तिची काय ती संपत्ती असावी. अंगावरल्या चादरीने(?) फुटपाथवरची थोडी जागा साफसूफ करण्याच्या प्रयत्नात ती होती. तेवढ्यात परत वीज जोराने कडाडली. त्याचबरोबर ते जागजागी फाटलेले तिचे कपडे अन् चादर बघून वास्तवातील प्रखरतेच्या त्या क्षणमात्र जाणिवेने मात्र, माझा वैताग धाडकन जमिनीवर येऊन आदळला. रात्री केव्हाही पाऊस पडेल असे वातावरण होते. त्यापरिस्थितीत पाऊस पडल्यावर ती काय करणार अन् कसा स्वतःचा बचाव करणार या विचाराने मन गलबलून आले. तिला वैताग होत नसेल का? तिची चिडचिड होत नसेल का? असे एक ना दोन अनेक प्रश्नांचं काहूर मनात दाटून आलं. म्हटलं ४ दिवस माझा वैताग होतोय तर माझी चिडचिड मला स्वतःला जाणवण्याइतपत वाढलेलीये.. अन् इथे तिला तर वैताग म्हणजे दररोजचा साथ-संगत करणारा मित्र होता.
    सुन्न मनस्थितीत माझी पावले केव्हा घराच्या दिशेने वळलीत हे देखिल मला कळले नाही. घरी पोचलो तर वीज अपेक्षेप्रमाणे आली होती. पण आता ती वाकुल्या दाखवत नव्हती! निदान आजतरी पुस्तक वाचण्याची गरज राहिली नव्हती. क्षणमात्र का होईना, पण एक जिवंत बाड मी अनुभवून आलेलो होतो.

मुमुक्षू

"रिऍलिटी'तील वास्तव स्वीकारा

एका बंगाली दूरचित्रवाहिनीवरील नृत्यस्पर्धेत शिंजीनी नामक स्पर्धक मुलीला अपयशामुळे नैराश्याचा झटका आला. या स्पर्धेतील एक प्रसंग तिच्या जिवावर बेतला. यासंबंधीच्या बातम्या दूरचित्रवाहिनी आणि दैनिकांत झळकल्या आणि अशाप्रकारच्या सर्वच कार्यक्रमांना, निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. वस्तुतः ते चूक आहे. खरे तर या घटनेला शिंजीनीच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवायला हवे. आपल्या अपत्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण किती धीर देतो, यावर मुलांची मानसिकता घडत असते. केवळ अतोनात लाड करून त्यांना हवे ते, हवे तेव्हा देऊन हट्टी बनविणे किंवा अपयश काय आहे, हेच त्यांना कळू देणार नसाल, तर अशा मुलांच्या वाट्याला शिंजीनीसारखीच अवस्था येणार. पालकांनी अशा मुलांना "रिऍलिटी शो'मध्ये ढकलू नये.

एकच वाक्य

राजा चक्रमादित्याला तो स्वतः महंमद तुघलकाचा जत्रेत हरवलेला भाऊ असल्याची खात्री होती. आणि तीच खात्री इतरांनाही व्हावी याबाबत तो हरप्रकारे यत्न करीत असे. मग त्यापायी कायद्याचा चोळामोळा झाला तरीही त्याची हरकत नसे.

एकदा राजकोषागारातील संपत्ती चोरून देशाबाहेर नेणाऱ्या खजिनदाराला कर्तव्यकठोर न्यायाधीशांनी देहांत प्रायश्चित्त सुनावले. अशा प्रकारचे धाडस कुणीही परत करू नये म्हणून ते गरजेचे होते असे न्यायाधीशांचे मत होते. पण चक्रमादित्याला मध्येच त्याचे (अंमळ फताडे) नाक खुपसण्याची लहर आली.

एक कोडे.... उत्तर द्यावे..

एक पुरुष आणि एक स्त्री बीचवर फिरत असतात. तेव्हा एक माणुस त्याना विचारतो की, तुम्ही दोघे इथे रोज फिरत असता, तुमच्या दोघांचे नाते कोणते? तर ती स्त्री त्या पुरुषाकडे बोट दाखवून म्हणते, याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो, तर आमच्या दोघांचे नाते तुच ओळख.

डॅडी

कुठे वाचली ते आठवत नाही पण.. ह्र्दयस्पर्षी वाटली.

गेल्याच आठवड्यात खरेदी केलेली नवी कोरी गाडी धुवून पुसून लख्ख करण्यात मग्न असलेल्या बापाचे आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलाकडे लक्ष गेले. मुलगा दुसऱ्या बाजुला गाडीवर दगडाने रेघोट्या मारण्यात गुंतला होता. राग अनावर झालेल्या बापाने त्याचा हात खेचून दगड काढून घेतला आणि बोटे जोरातच दाबली. इवल्या जीवाला ते सहन झाले नाही. ते मुल कळवळले. त्याच्या रडण्याने भानावर आलेल्या बापाला वास्तवाची जाणिव झाली. ताबडतोब त्याने मुलाला दवाखान्यात दाखल केले. कोवळ्या बोटातील हाडात मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते. 

पुतळा

तो पुतळा होता एका राष्ट्रपुरुषाचा…ज्याने समाजाला अनेक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला अशा महान विचारवंताचा.   शहरातल्या भर गर्दीच्या चौकात अगदी मध्यभागी उभा असलेला…त्याच्या भोवती एक छोटेसे रिंगण. वाहतुकीचे नियंत्रण सोपे जावे म्हणून बांधलेले. लोकांना त्या महापुरूषाच्या विचारांची,   त्याने दिलेल्या शांतीच्या शिकवणुकीची सदैव आठवण राहावी ह्या सदहेतूने बांधलेला तो पुतळा..