वारी १६

           सुजितने अमेरिकेत बोलावले की आपल्याला जावे लागेल अशी अपेक्षा होतीच. शिवाय सेवानिवृत्तीनंतर न जाण्यासाठी काही सबब पण दाखवता येणार नव्हती. आणि तसे काही कारण पण नव्हते. पण मधल्या काळात आम्हाला एक नातू झाला आणि सगळे चित्रच बदलले. माझ्या आजोबा झालेल्या मित्रांच्या ज्या नातूप्रेमाला मी हसत होतो त्याचा आता मला उलगडा झाला म्हटले तरी चालेल. यापूर्वी माझ्या त्या मित्राचा मुलगा अमेरिकेत गेला पण जाताना तो एकटाच गेला त्याचा छोकरा आणि बायको भारतातच राहिले. पण नंतर एक वर्षाने त्यांना न्यायचा विचार त्याने जाहीर केल्यावर माझ्या मित्राने त्याला विरोध करण्याचा बराच प्रयत्न केला शेवटी त्याच्या धाकट्या भावाला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर त्यांना त्याने घेऊन जावे असे मत त्याने व्यक्त केले अर्थात शेवटी त्याला मुलाचे म्हणणे मान्य करावेच लागले.

शुभेच्छा...

आज तुझा वाढदिवस...     खुप खुप शुभेच्छा.    

खर तर आज शुभेच्छा खेरीच मी तुला काहिच देऊ शकत नाही, कारण कहिशे मैल अंतर... तुझा वाढदिवस सेलिब्रेट करावा असं खुप खुप वाटत होतं पण.... हा "पण" ना खुप खुप चालबाज आहे गं. नेहमी तो असंच खेळ करत असतो.

आमचे जाधव सर

"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते.

"सर..... बॉल प्लीज"

"इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"?

नोटापुराण

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी. " "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना. "

मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसऱ्या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी. ती नोट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्यासोबत आपल्या नावाचा कागद ठेवायचे व झाल्या चलनी नोटा वापरण्यालायक.

जागेअभावी होणारी ठळक बातम्यांची विनोदी तोड-फोड! (२)

  • सावधान! हत्तीची रात्र आहे.          
  • आज येणार हत्ती
  • तुम्ही हादराल
  • हत्ती येईल तुमच्या टि. ही. मध्ये
  • एक हत्ती रात्री ११ वाजता तुमच्या घरात येईल   (टि. व्ही. समोर बसलेले सगळे पाचई पास प्रेक्षक आहेत वाटते)
  • आज तुमच्या टि. व्ही. मधून बाहेर येईल एक हत्ती
  • तो आधी एक सोंड बाहेर काढील
  • मग तुमच्या टि. व्ही. चा आवाज वाढवील
  • आणि टि. व्ही. बंद करून टाकील
  • तुम्ही मग आमचा कार्यक्रम पाहू शकणार नाही
  • आहे ना गंम्मत?
  • विसरू नका... रात्री अकरा वाजता... टि. व्ही. ऑन करा

आणखी एक प्रकार:

आव्हान आहे अभिजातता जपण्याचं

"गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत संगीतक्षेत्र अधिक विस्तारले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रवाहदेखील अखंडित आहे. फक्त त्याची अभिजातता टिकविणे, हे मोठं आव्हान आहे. ते पेलण्याची जबाबदारी केवळ कलाकाराचीच आहे. ''
प्रख्यात शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांची मुलाखत घेण्याची योग आला. शास्त्रीय संगीताविषयी आपली मते त्यांनी ठामपणे मांडली. मुलाखतीचे स्वरूप प्रश्नोत्तरी असले, तरी प्रश्न वाचण्याचा जाच नको म्हणून उत्तरांची सुसूत्र बांधणी करून लिहिलेला लेखबंध...

शास्त्रीय संगीत हे नेहमीच मर्यादित स्वरूपाचं राहिलं आहे. यापुढेही ते मर्यादित स्वरूपाचंच राहील. कारण सवाई गंधर्वसारखे फार कमी कार्यक्रम असतात. ज्यात दहा-पंधरा हजार रसिक एकावेळी संगीताचा मजा घेऊ शकतात; परंतु मैफलीत मोजके लोक आणि कलाकार यांच्यात "इंटरॅक्शन' होते. एक भावबंध तयार होतो. मोठ्या कार्यक्रमांमधून तो तयार होईलच, असे नाही म्हणूनच शास्त्रीय संगीत मैफल स्वरूपातच राहील. त्याचं एक कारण आहे. शास्त्रीय संगीताचा बंध अध्यात्माशी आहे. बाबा (पं. जितेंद्र अभिषेकी) सांगायचे जो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, तोच शास्त्रीय संगीताची लज्जत घेऊ शकतो. सर्वसाधारण पुस्तके, कादंबऱ्या कुणीही वाचतो; पण ज्याला शेक्सपिअर किंवा कालिदास वाचायचा आहे, त्याला प्रथम आपली वैचारिक बैठक तयार करावी लागते. शास्त्रीय संगीताचंही तसंच आहे म्हणूनच या संगीताला मिळणारा प्रतिसाद ठीक आहे.
माध्यमांमुळे आता संगीतक्षेत्राला इतकं एक्स्पोजर मिळालं आहे, की संगीताच्या इतर धारांप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकांचा प्रतिसाद मिळावा, असं वाटतं. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी आवश्यक संवादी आंतरक्रियेच्या मर्यादेमुळे तसं होणार नाही. नवी पिढी शास्त्रीय संगीत आत्मसात करण्याचा-ऐकण्याचा प्रयत्न करते आहे. मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही फिरतो. त्यावरून तरी मला सध्याचे चित्र आशादायी वाटतं.
पूर्वी पं. जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशी मोजकी नावे लोकांसमोर होती. "एचएमव्ही' ही एकच कंपनी होती. त्यामुळे कलाकाराची एक रेकॉर्ड निघाली तरी त्याचं नाव देशभर व्हायचं. आज माध्यमांमुळे अनेक लोक संगीतक्षेत्राकडे वळल्याने चांगलं काय, वाईट काय - काय ऐकायचं, असा प्रश्न लोकांसमोर आहे. त्याचा परिणाम शास्त्रीय संगीताला ज्या कलाकारांनी वाहून घेतलं आहे, त्यांच्यावर होतो. प्रायोजक संस्थाही नावाजलेल्या कलाकाराचेच कार्यक्रम आयोजित करणे पसंत करतात. मग प्रश्न असा पडतो की नव्या पिढीतील जे कलाकार शास्त्रीय संगीताची सेवा करतात, त्यांना स्टेज कसं मिळायचे. साधनेसाठी त्यांनी काही वर्षे घालविली, याचा विचार कोण करणार? एखाद्या कलाकाराचे नाव झाल्यानंतरच लोक त्याला पैसे देणार का? कलाकाराला त्याच्या साधना-संघर्षाच्या काळात उत्तेजन, आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे. तुलनेने माझ्या पिढीची स्थिती बरी आहे. पंधरा वर्षांपूर्वी, आम्ही "गाणं करतो म्हटलं की म्हणजे काय' असा प्रश्न यायचा. शास्त्रीय संगीत अशी एक कला आहे, की ती प्रत्येक गावात-शहरात जाऊन पेश करावी लागते. पहिला पंधरा वर्षांचा काळ कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. त्याला साथ, मदत-आधार मिळणे आवश्यक आहे. या काळात तो झगडत-भोगत राहिला, तर पुढे त्या कलाकाराचे नाव मोठं झाल्यानंतर तो मनमानेल तसे मानधन मागेल आणि संघर्षाच्या काळात झालेल्या अत्याचाराचा सूड उगवेल. यात संगीतक्षेत्राची मोठी हानी होण्याचा धोका आहे. कलाकाराला आर्थिक सुरक्षितता मिळाली, तर संगीतक्षेत्रासाठी ते अधिक फलदायी ठरेल.
पूर्वीची गुरुकुल पद्धत खुंटल्याचा सध्या सूर उमटत आहे. ते बहुतांशी खरंही आहे. गुरुकुल पद्धतीला शास्त्रीय संगीतात पर्याय नाही. आजवर याच परंपरेतून कलाकार तयार झालेत. आजही अगदी छोट्या स्तरावर का होईना गुरूकुलाची परंपरा सुरूच ठेवली तर हिऱ्यासारखे कलाकार तयार होतील. बाबांनी सुरू केलेली गुरुकुल परंपरा मीदेखील पुढे सुरू ठेवली आहे.
सध्या लोकांचा कल मनोरंजकी कलांकडे असल्याने संगीत नाटकांची परंपरा खंडित झाली आहे. याला संगीतकारही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वी लेखक-संगीतकार आणि निर्माता यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून संगीत नाटकांची निर्मिती केली जायची. संगीत नाटकाचा परिणाम पुढे किमान दहावर्षे जनमानसावर टिकून राहावा, हा विचार त्यावेळी केला जायचा. त्याच दृष्टिकोनातून संगीतकारही मेहनत घेऊन संगीत देत असत म्हणूनच ती नाटके आज लोकांच्या स्मरणात आणि त्यातील संगीत लोकांच्या ओठात आहे. आज लेखक, संगीतकार, निर्माते आपल्या "व्यवसाया'त मग्न झाल्याने त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळेच अशाप्रकारची निर्मिती होत नाही.
नवी पिढी शास्त्रीय संगीताला प्रतिसाद देत आहे. फक्त या प्रतिसादाचा प्रवाह व्हायला हवा. हा प्रवाह निर्माण करण्याची जबाबदारी कलाकाराची आहे. बाबा, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपलं नाव चाळीस वर्षे एकाच उंचीवर ठेवलं. रसिकांच्या प्रतिसादाचा त्यांनी प्रवाह निर्माण केला. तीच जबाबदारी आता आमच्यावर आहे. नव्या पिढीनेही आपल्या मुलांमध्ये सांगीतिक गुण असतील, तर त्याला पूर्णवेळ संगीत शिकण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय संगीत थांबलय का, या प्रश्नावर मी एक दाखला देतो. बाबांच्या काळातही आता शास्त्रीय संगीत काही तरणार नाही, असे लोक म्हणत. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे गेली संगीत काही थांबलं नाही आणि थांबणारही नाही.

भेट द्या : santshali.blogspot.com

गुलमोहोर - ५

चिंचा काढून झाल्यावर समीरदादाने धापकन खाली उडी मारली. परतताना राजूच्या आईने हाक मारली. "जोगराजू (जगातल्या सगळ्या मुलांची नावे राजू असल्याने मग अशी बारशी करावी लागत), जरा येऊन जाशील जाताना". याचा अर्थ "जाताना ये" असा होतो हे मला आता कळू लागले होते. आम्ही आत गेलो. "कुठून येऊ राह्यला तुझा राजूदादा? " कोंकणातून म्हटल्यावर त्यांना काहीच उमगले नाही. त्यांच्या शाळेत भूगोल शिकवलेला नसावा बहुधा. "सटाण्याच्याबी पुढं का? " त्यांचे माहेर सटाणा असल्याने त्यांना जगात त्याहून लांब काही असते याची जाणीवच नव्हती. "चिवडा खाऊन जाशील थोडा" म्हणत त्यांनी चिवड्याच्या वाट्या आमच्या पुढ्यात सारल्या. "उज्जूनं केला नं चिवडा. यंदा बारावी पास होईल" आता हे समीरदादाला सांगायची काय गरज होती? आणि यंदा पास होईल याची काय खात्री होती? काही कळत नव्हते. तिखटामिठाची मुक्त उधळण असलेला तो चिवडा कसाबसा संपवून आम्ही परतलो.

गुलमोहोर - ४

"अरे हो आत्ते, अमृतकोकम आणलेय हो घरचे, तेच करीनास? " आता हे आईला उद्देशून जर होते, तर ज्योत्स्नाताईकडे कशाला बघायला हवे होते डोळे टरके करून? पण आईच्या ते काही लक्षात आले नाही. ती आपल्याच नादात म्हणाली, "अरे जेवायची वेळ झाली, आता नि अमृतकोकम कशास? ". शेवटी मीच पुढे होऊन म्हणालो, "अगं, ज्योत्स्नाताईला तरी दे ना" तेव्हा कुठे तिच्या ध्यानात आले की ज्योत्स्नाताईसुद्धा तिथे आहे म्हणून. "थांब हो, देत्ये तुला अमृतकोकम. जरा जिरे वाटून लावते म्हणजे बरे वाटेल या रखरखाटात".

गुलमोहोर - ३

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवल्यावर मी अडावदकरकाकांच्या घरामागच्या पडक्या गॅरेजमध्ये कोर्ट कोर्ट खेळत होतो. समीरदादा एका दिवसात येणार म्हणून मी फारच खूष झालो होतो. त्या नादात मी जज्ज म्हणून काम करताना दोनतीन वेळेला फिर्यादीचा वकील बनलेल्या संदीप जोशीच्या विरुद्ध सटासट निर्णय दिले आणि तो भडकला. तो भडकायचे आणिक एक कारण म्हणजे त्याचे वडील वकील होते, आणि या खेळाची मूळ कल्पना त्याचीच होती. त्यामुळे तो रागारागाने निघून गेला. गेला तर जाऊ देत. ढोल्या कुठचा!

गुलमोहोर - २

मी ज्योत्स्नाताईला टिपू आणि मोटवानी आजोबा यांचा किस्सा रंगवून सांगायच्या बेतात होतो, तोच आईने "ज्योत्स्ना, तू तरी अभ्यास घे बाई ह्याचा. दिवसभर नुसता उंडारत असतो वांडपणा करत" असे भलतेच बोलणे काढले. सुट्टीला वेळेवर कोंकणात न गेल्याने तिलाही फारच अस्वस्थ वाटू लागले होते बहुतेक. तिलाही सायकल शिकवावी का, असा एक विचार केला, पण आमच्याकडे लेडीज सायकल नव्हती.