लाखमोलाची माणसं !

            फोनची रिंग वाजू लागली आणि तो कोणाचा असेल याची जवळ जवळ खात्रीच असल्यामुळे आम्ही दोघेही तो घेण्यासाठी धावलो. आमच्या अंदाजाप्रमाणे तो सुजितचा म्हणजे आमच्या अमेरिकेतील मुलाचा होता. "काय चाललेय" त्याने नेहमीप्रमाणे  विचारले पण त्यानंतर त्याने विचारलेल्या प्रश्नाने आम्ही एकदम चकितच झालो. कारण तो प्रश्न होता  " काय भूमकरांकडे चोरी झाली म्हणे" "अरे ही काय इंटरनॅशनल न्यूज आहे की काय? म्हणजे भूमकर औरंगाबादला, आम्ही पुण्याला आणि त्यांच्याकडे चोरी झाल्याची बातमी  आम्हाला कळण्याअगोदर अमेरिकेत तुला  कशी काय कळली? " मी आश्चर्याने विचारले. या विचारण्यामागे  आमच्याअगोदर ही बातमी अमेरिकेतल्या माझ्या मुलाला कळावी या आश्चर्यापेक्षाही भूमकरांकडे चोरी व्हावी याचेच जास्त आश्चर्य होते.

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलू तेलुगू युनिव्हर्सिटीच्या एन. टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली. वेळोवेळी हशा आणि टाळ्या यांच्या गजराने प्रेक्षकांनी त्यांची पसंती जाहीर केली.

बजाचा बाजार

बोचरेवाडीचा बजा बुधवारच्या बाजाराला निघाला. त्याच्या शेतातला आंबेमोहोर अप्रतिम होता. तो खरेदी करायला भारंभार पैसे मोजायला लोक तयार असत. पण बजाचे डोके नेहमीच तिरके (खरे तर उलटे) चालत असे. "तांदूळ विकायचाच नाही" इथपासून "तांदळाच्या एका दाण्याला पाऊण पैसा पडेल. दाणे मोजा नि त्याप्रमाणे पैसे देऊन चालू लागा" इथपर्यंत काहीही तो सहज भकत असे.

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.
रक्तातच राजकारण असल्यानं तो हणमंतरावांचा अगदी आवडीचा विषय. आणखी एक अत्यंत प्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्यांच्या बापजाद्यांपैकी कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता, पण हणमंतरावांना क्रिकेटचा भलताच नाद. क्रिकेटच्या विरोधात कुणी बोलायला लागलं, की हणमंतरावांचं टाळकंच सटकायचं. त्यावरून तिसरं महायुद्ध झालंच तर पाण्यावरून नव्हे, तर क्रिकेटवरूनच होईल, असं कुणालाही वाटावं.
कुस्ती हाही एक आवडता छंद होता. गावात कुस्तीचे दोन-तीन आखाडे होते. तसं ते पाच-सहाशे उंबऱ्यांचं गाव. पण खेळाच्या बाबतीत पुढे होतं. कुस्ती हा गावातला पारंपरिक आवडीचा खेळ. सरपंचपदावर पंधरा-वीस वर्षं असलेल्या हणमंतरावांच्या हट्टामुळे काही मुलं आपली क्रिकेट खेळायची, एवढंच.
अख्ख्या गावात फक्त हणमंतरावांकडेच टीव्ही. सध्याच्या "आयपीएल' स्पर्धेतल्या "चिअरगर्ल्स'नि त्यांना वेड लावलं होतं. कुठलीही नवी कल्पना आली की ती आपल्या गावात राबवायची, ही तर हणमंतरावांची खासीयत. आसपासच्या पंचक्रोशीत कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता. हणमंतरावांचे चमचेच तेवढे त्यांच्या घरी टीव्हीवर मॅच चालू असताना बघायला यायचे तेवढेच. त्यामुळं "चिअरगर्ल्स' वगैरे प्रकरण गावाला नवीनच होतं. हणमंतरावांच्या मनानं घेतलं, की यंदाच्या जत्रेत गावातल्या कुस्त्यांच्या आखाड्यात या चिअरगर्ल्स उतरवायच्या. कुस्ती लढायला नव्हे, तर मल्लांना प्रोत्साहन द्यायला. लगेच हणमंतरावांनी कल्पना ग्रामपंचायतीसमोर मांडली. गावातली कुठली तरी विकास योजनाच आहे, असं वाटून सदस्यांनीही माना डोलावल्या. बाकी, हणमंतरावांचा शब्द म्हणजे तिथं काळ्या दगडावरची रेघ होती. हणमंतरावांच्या कधी अन् काय मनात येईल, याचा नेम नव्हता. गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.
"चिअरगर्ल्स' म्हणजे नेमकं काय? कुणाला वाटलं, कुस्तीच्या आखाड्याची डागडुजी वगैरे करायला या बाया आणणार आहेत. वाशी-पनवेल करून आलेला कुणी "या डान्स बारमधल्या मुली आहेत आणि सगळ्यांना दारू वाटणार, ' अशी अक्कल पाजळून गेला. कुणाला वाटलं, मल्लांना मालिशबिलिश करायला या बाया आहेत.
चिअरगर्ल्स गावात येण्याचा दिवस उजाडला. हणमंतरावांनी सगळं गावच सजवून टाकलं होतं. दोन बैलगाड्यांतून मिरवणूक काढायचं ठरलं होतं. हणमंतरावांनी खिल्लारी बैलांच्या जोड्या मागवल्या होत्या. ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.
कुस्त्यांचं मैदान चांगलंच सजलं होतं. नेहमीच्या मल्लांबरोबर आज चिअरगर्ल्सचंही आकर्षण होतं ना! गावकऱ्यांची जागा मिळवण्यासाठी एकमेकांशी लठ्ठालठ्ठी सुरू होती. मिरवणूक मैदानापर्यंत आल्यानंतर सगळ्यांनी एकच गलका केला. सगळ्या चिअर गर्ल्स खाली उतरल्या. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. हणमंतरावांनी मोजल्या - एक दोन.... नऊ!
""आँ? दहा बाया बोलावल्या होत्या. नऊच कशा काय? ''
मग शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यात मिरवणुकीच्या मागून एक कुणीतरी बाई धडपडत, पाय ओढत येताना दिसली. अंगाला सगळा चिखल, शेण लागलं होतं. ती गावातली दिसत नव्हती. कुणाला ओळखेना. मग कुणाची तरी ट्यूब पेटली - अरे, हीच ती एक हरवलेली चिअरगर्ल! बैल उधळले, तेव्हा ती गाडीतून खाली पडली होती आणि कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. औषधपाण्यासाठी तिची रवानगी करून मंडळी पुढे मैदानाकडे मार्गस्थ झाली.
कुस्त्यांच्या मैदानात जोश भरला होता. पहिलीच कुस्ती चुरशीची होती. बोंबलेवाडीचा परशा लोखंडे आणि खानपाटोळीचा दगडू आडदांड झुंजणार होते. चिअरगर्ल्सनी "पोझिशन' घेतली. हातातल्या झिरमाळ्या फडकावत त्या नाचू लागल्या. गावकरी मल्लांकडे बघण्याऐवजी त्यांच्याकडेच बघायला लागले. कुठल्याही मल्लानं एखादा डाव टाकला, की चिअरगर्ल्स नाचायला लागायच्या. अधेमध्ये त्यांच्या हातातल्या झिरमाळ्या कुणाच्या डोळ्यात जाऊ लागल्या. त्या नाचत असल्यानं पलीकडचे मल्ल दिसेना झाले. मध्येच वैतागवाडीच्या शिरप्यानं चिअरगर्ल्सवर पैसेच फेकले. त्यानं कुठंतरी डान्सबारमध्ये हे बघितलं होतं. नाचामुळं उडालेली धूळही लोकांच्या डोळ्यांत जाऊ लागली.
मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. गावात आणलेल्या या दहा चिअरगर्ल्स दोन वेगवेगळ्या गटांतल्या आहेत, हे कुणालाच माहीत नव्हतं. या दोघी भांडताना बघून त्यांच्या सख्याही एकेकीची बाजू घ्यायला धावल्या. मग त्यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू झाली. कुणी कुणाची तंगडी ओढतेय, कुणी केस उपटतेय, कुणी हात धरून ओढतेय, असला प्रकार सुरू झाला.
मूळची कुस्ती थांबली आणि ही नवीच कुस्ती सुरू झाली. बरं, बायामाणसंच असल्यानं कुणी त्यांना अडवायलाही पुढे येईना. लोकांना मूळ कुस्तीपेक्षा ही नवी अनपेक्षित कुस्तीच जास्त रंगतदार वाटू लागली. अगदी मूळ क्रिकेटपेक्षा "आयपीएल'सारखी करमणूक मजेदार वाटावी ना, तशीच!
पार धुळीत लोळून एकमेकींना जेरीस आणेपर्यंत ही कुस्ती रंगली. सगळे लोकही त्यांना आणखी चेव चढवत होते. शेवटी दोघीतिघींचे दात पडल्यावर आणि हातपाय मुरगळल्यावरची ही अघोषित कुस्ती थांबली. एव्हाना मघाशी गाडीतून पडलेली ती दहावी चिअरगर्ल आखाड्यात आली होती. तिच्यापेक्षा वाईट अवस्था आता या नऊ जणींची झाली होती. तिलाही त्या ओळखू येईनात. कसंबसं तिनं सगळ्यांना आवरलं. या झटापटीत तिचं अंग पुन्हा धुळीनं माखलंच.
""कुठायंत ते हणमंतराव? खेटरानंच पूजा करायला हवीय त्यांची! '' कुणीतरी कडाडलं.
मग सगळ्यांनी हणमंतरावांचा शोध घेतला. तर स्टेजच्या बाजूला हणमंतराव कलंडलेले दिसले. या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती.
""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.

मंगळगड ( कांगोरी )

शनिवारी संध्याकाळी साडेसातला लक्षात आलं, की आज शनिवार, मग दोन चार फोन करून आयत्या वेळेला कळवले तरी यायला तयार असणारे नेहेमीचे साथीदार जमवले, अशातला केसू परदेशात त्यामुळे मी, कूल, आरती, सचिन असे चारच जण रविवारी, २२ जूनला सकाळी साडेसहाला निघालो.

पावसाने चांगलीच दडी मारलेली आहे, त्यामुळे भर उन्हात ट्रेक करावा लागतो की काय असे वाटायला लागले आणि मागच्या वर्षी राजमाचीच्या पावसाळी भटकंतीत कसे उन्हात खरपूस भाजून निघालो ते आठवले.

रिक्षा की... शिक्षा?

पुण्यातल्या रिक्षा आणि त्यांचे ’थोर’ चालक ह्याविषयी खूप बोलून किंवा लिहून झाले आहे. अगदी माझ्या लहानपणापासून पुणेकर जनता ज्या भक्तीभावाने पालख्यांचे स्वागत करते अगदी तेवढ्याच भक्तीभावाने रिक्षावाल्यांना जोडे आणि ’जोडीने’ ( कोटी अपेक्षित स्मित ) शालजोडीतले मारत आली आहे. राजकारण, क्रिकेट आणि खड्डे ह्यांच्याएवढा रिक्षावाला हा आवडीचा विषय नसला तरी पण तो बऱ्यापेकी टीआरपी कायमच बाळगून आहे.

संस्कृती म्हणजे काय? आणि ती वाचवायची आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे?

बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये बरेच दिवसांत संस्कृती, संस्कृतिरक्षक,  संस्कृतिभक्षक आणि तत्सम शब्द पाहायला मिळाले नाहीयेत. पण जेव्हा असे शब्द माझ्या पाहण्यात येतात तेव्हा मला प्रश्न पडतो की ही संस्कृती संस्कृती म्हणतात ती नक्की काय आहे. जाणकारांनी आपापली मते मांडावीत ही अपेक्षा. ह्या चर्चेद्वारे कोणालाही दुखवायचा हेतू नाहीये आणि कोणताही पूर्वग्रह न बाळगता विचार मांडायचा मी प्रयत्न केलाय. ह्या चर्चेतून कदाचित काहीच निष्पन्न होणार नाही. (प्रत्येक चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालंच पाहिजे असा कुठे नियम आहे काय? आणि खरं सांगायचं झालं तर ज्या चर्चेतून काहीतरी निष्पत्ती झाली ती चर्चाच काय? असो... ) पण माझ्या (आणि कदाचित इतर मनोगतींच्याही) मनात पडलेल्या प्रश्नांना वाट मिळेल आणि झालंच तर थोड्याफार प्रश्नांची उत्तरे पण मिळतील अशी अपेक्षा आहे.

सैतानाची बाळे

स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम.
एका भव्य, गोलाकार, सुसज्ज, बंदिस्त जागेमध्ये सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने, चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स' वा तत्सम नांवाचे गेम्स खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते. दर वर्षी 'देश' बदलून मिळतो. तशी सगळ्याच खेळांत मजा येते. पण 'भारत' हा देश कधी हातांत येईल याची सगळे आतुरतेने वाट पाहतात. कारण तिथल्या 'लोड' केलेल्या खेळांत जे वैविध्य आहे ते इतर कुठेच नाही यावर सर्व बाळांचे एकमत आहे. काम चालू असताना हळू आवाजांत एकमेकांशी बोलण्याची मुभा आहे. तिथे चाललेले हे कांही 'संवाद'!

उगीच !

             "पाच रुपड्यांची गोष्ट " हा माझा अनुभव वाचल्यावर काही मनोगतींनी " उगीच" कथा वाचण्याची इच्छा प्रकट केली.इतकी जुनी कथा परत मनोगतवर लिहू की नको अशी शंका मनात असतानाही केवळ मी माझ्या अनुभवात "उगीच" च  उल्लेख  केला असे वाटू नये म्हणून ती १९६५ साली प्रकाशित झालेली कथा त्यांच्यासाठी येथे सादर करीत आहे.  

गंमतीदार शीर्षकं

                                गंमतीदार शीर्षकं                           

          पुस्तकाचा वाचक किंवा चित्रपटाचा प्रेक्षकही शीर्षक वाचूनच आत काय दडलेलं असेल याचा
अंदाज बांधत असतो.
     ग्रंथपालाला मात्र शीर्षक वाचून सोडून देता येत नाही. पुस्तकांच्या नोंदी करण्याच्या प्रक्रियेत
पुस्तक नुसतं हाताळावं लागत नाही तर चाळावंही लागतं. प्रस्तावना, अनुक्रमणिका वाचाव्या
लागतात. मलपृष्ठावरची माहितीही पाहावी लागते.   आजकाल वेबसाईटही नजरेखालून घालावी लागते.
हे असं सगळं पाहात असताना काही गंमतीदार, विचार करायला लावणारी, अगदी दिशाभूलही
करणारी शीर्षकं हाताखालून जातात.
        'बंगलोर टायगर' हे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक. शीर्षक वाचून एखाद्याला वाटेल,
बंगळूर परिसरातल्या वाघांबदल काही उपयुक्त माहिती असावी. तसं वाटलं तर तो फसलाच म्हणून
समजायचं. भारतीय कंपन्यांना स्पर्धेत राहण्यासाठी यापुढे काय काय करावं लागेल, याचं सविस्तर विवेचन
या पुस्तकात 'विप्रो' या कंपनीचं उदाहरण देऊन केलं आहे. बंगलोर ही भारताची सिलिकॉन
व्हॅली समजली जाते. 'विप्रो' हे तिथलं आघाडीचं नाव. सॉफ्टवेअर कंपन्यांमधला वाघच तो जणू! वाघ अरण्यात
आपलं साम्राज्य वाढवायला जसं वागतो, तसंच काहीसं 'विप्रो' वागली, असा तो शीर्षकाशी संबंध आहे. सिंह
अरण्याचा राजा खराच; पण आकर्षण आणि भय वाघाचं जास्त असतं.  
     'हू सेड एलिफंटस कांट  डान्स? ' हे असंच  एक शीर्षक. आयबीएम कंपनीच्या माजी 'सीईओ'ने
पुस्तक लिहिलं असून कंपनी यशस्वी होण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यात आहे.
व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांच्या योग्य अंमलबजावणीकरीता हे पुस्तक जरूर वाचावं, असं सांगतात.
स्वतःच्या तुंदिलतनूमुळे जराशी हालचाल झाली तरी ती स्वागतार्ह, अशी हत्तीची अवस्था असते.
तो नाचायला लागला तर पाहण्यासारखा कार्यक्रमच होईल. ‘आयबीएम’ ने धोरणात केलेल्या बदलांमुळे
हत्तीसारखं संथ, मरगळलेलं, रेंगाळलेलं रूप जाऊन तिला एक चैतन्य प्राप्त झालं आणि ती जागतिक स्पर्धेत
सफाईदारपणे वावरू लागली... लेखकाने शीर्षकात विचारलेला प्रश्न समर्पक नाही, असं कोण म्हणेल?
     'जैनिझम अँड इकॉलॉजी', 'हिंदूइझम अँड इकॉलॉजी', 'बुद्धिझम अँड इकॉलॉजी' ही काही
पुस्तकं आहेत. 'जैनिझम आणि बुद्धिझम', 'जैनिझम आणि हिंदूइझम' अशी शीर्षकं असली तर
थोडीफार संगती लावता येते. दोन विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास, असा तर्क सामान्य वाचकही
करू शकतो. पण 'इकॉलॉजी सारखा शब्द धर्मावरच्या पुस्तकात येऊ शकतो का', या प्रश्नाचं उत्तर
'होय'  असंच आहे. इकॉलॉजीचा आणि या धर्मांचा संबंध या पुस्तकांमधून उलगडून
दाखवला आहे. पर्यावरणाशी हे धर्म आपापल्या परीने काय नातं सांगतात, याचा उहापोह ही पुस्तकं
करतात. धर्म-पंथांच्या अभ्यासकांना हा नवा दृष्टिकोन या पुस्तकांमुळे मिळू शकतो.   
     ‘लेट अस सी’ हे नाव जे संदर्भाविनाच ऐकतील, त्यांना ते एखाद्या डॉक्टरने डोळ्यांच्या आरोग्यावर
किंवा फोटोग्राफरने फोटोग्राफीवर लिहिलेलं पुस्तक वाटल्यास नवल नाही. संगणकविश्वातल्या बहुतेकांनी
'लेट अस सी' ची पारायणं केलेली असतात. त्यातला 'सी' पाहत नाही, तर संगणकीय भाषा सुचवतो!
‘लायनक्स बायबल २००७’ हे अलीकडचं पुस्तक. बायबलला ख्रिश्चन धर्मात महत्त्व आहे. हे पुस्तक
संगणकविश्वातल्या लोकांसाठी, विशेषतः ‘लायनक्स’ ही प्रणाली वापरणा-यांसाठी अगदी बायबलच आहे,
असं सुचवणारं हे चतुर व्यावहारीक शीर्षक आहे.
     'हीट' या शीर्षकाचं पुस्तक भोतिकशास्त्रावर नसूही शकतं. माईक ल्युपिका या लेखकाचं  गेल्या वर्षी
प्रकाशित झालेलं हे पुस्तक बेसबॉल खेळणा-या भावांवर आहे. ‘एक्लिप्स’ या पुस्तकाचा ग्रहणाशी संबंध नाही.
हेही गेल्याच वर्षीचंच पु्स्तक आणि त्याचा वाचकवर्ग आहे आहे पोगंडावस्थेतली मुलं!
    ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस’ हे पुस्तक इंग्रजी वाचणा यांमध्ये फार लोकप्रिय
आहे. विशेषतः तरूण वर्गामध्ये! पुरूष आणि स्त्रीच्या मूलभूत स्वभावविशेषांवर अचूक बोलणारी अशी ही
छोटीशी कलाकृती आहे. दांपत्याने एकमेकांचे नैसर्गिक स्वभाव ध्यानात घेऊन कसं वागावं, हे खुसखुशीत
शैलीत लेखक विशद करतो. शीर्षकात शनी, गुरू, बुध ही नावं का नाहीत? मंगळ व शुक्र याच ग्रहांची
नावं असण्यामागे एक ज्योतिषशास्त्रीय आधार आहे. मंगळ स्वभावाने कठोर तर तर शुक्र रसिकतेशी संबंधित
ग्रह आहे, असे सांगितले गेले आहे. कठोरता आणि रसिकता जेव्हा एकमेकांशी बोलू लागतात तेव्हा काय होतं,
ते वाचल्याशिवाय समजणार नाही.
    मराठीत 'ही श्रींची इच्छा' हे एक गाजत असलेलं पुस्तक आहे. एखाद्या ऐतिहासिक नाटकासारखं
वाटणारं शीर्षक प्रत्यक्षात वेगळंच जीवननाट्य दर्शवतं. श्रीनिवास ठाणेदार या यशस्वी मराठी उद्योजकाने
अनंत कौटुंबिक व इतर अडचणींना सोसून अमेरिकेत उभारलेल्या उद्योगाची ती कहाणी आहे. ठाणेदार यांनी
ती स्वतःच चितारली आहे. ते म्हणतात, ‘मनाची जिद्द असेल आणि झेप घेण्याची इच्छा असेल तर
परिस्थितीच्या बेड्या तुम्हाला अडकवू शकणार नाहीत’. शीर्षकातला ‘श्री’ शब्द सूचक आहे, हे सूज्ञास सांगणे
न लगे!
    ... पुस्तकांच्या अंगणातली ही काही टपली मारणारी मुलं! एकदा त्या दुनियेत शिरलं की अशी अनेक
मुलं भेटतात. पुस्तक चाळून काम होतं पण कधी कधी चाळणंही विचार करायला लावतं;   पुस्तक वाचायलाच
लावतं आणि मग त्या शीर्षकांमागची लेखकाची मानसिकता उलगडते. आपल्यालाही ती मनोमन पटतात.
      काही नावं निरनिराळे अंदाज बांधायला खूप वाव देतात. 'डान्सिंग विथ द सॅक्रेडः इव्हॉल्यूशन, इकॉलॉजी
अँड गॉड'! 'सोशल कन्स्टक्शन ऑफ द पास्टः रिप्रेझेंटशन अज पॉवर'! पण अंदाज बांधल्यावर पुस्तक
वाचायला विसरायचं नाही, कारण अंदरकी बात कुछ ओर असते.
     लांबची नावं नको असतील तर आपल्या मराठीतली 'क' किंवा ‘ब्र’ ही शीर्षकं घ्या ना!
                                                                 - केदार पाटणकर