टिचकीसरशी शब्दकोडे २४

टिचकीसरशी शब्दकोडे २४

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
हा वृक्ष ज्याच्याजवळी सदैव

एक तितली मातकट तपकिरी

एक तितली मातकट तपकिरी

नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या.
संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे.
घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत,
बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे.

बाप

एका रात्री अचानक तिचा बाप गेला. बातमी कळताक्षणी ती तडक निघाली. नवराही होताच बरोबर. तोच रस्ता तिच्याघरापासून ते तिच्या बापाच्या घरापर्यंतचा. त्यावरून तिने कितीतरी वेळा जा ये केली असेल. पण त्या दिवशी तिला तो वेगळाच वाटला. काय वेगळं होतं त्या दिवशी? फक्त एक जाणीव. आपला बाप गेला आहे ह्याची. आता तो परत कधीही भेटणार नाही ह्याची. एक भयंकर अस्वस्थ करून टाकणारी जाणीव. सैरभैर अवस्थेत ती बापाच्या घरी पोचली. समोर ठेवलेल्या बापाच्या निश्चेतन देहाकडे बघून तिला भयंकर कसंतरी झालं. आपल्यातली सगळी शक्ती निघून गेली आहे असं वाटलं. इतका वेळ धीराने अडवलेले अश्रू बाहेर आले.

भिकारडं पोर

"अरे प्रथम कुठे चाललाएस रे"?

     राज यांचं भाषण ऐकून माझं तरुण रक्त खवळलं होतं, मराठी माणसांवर आणि पर्यायाने मराठी जनांवर होणाऱ्या अन्यायाचा मला साक्षात्कार झाला होता अन त्या तिरमिरीतच मी घरातून बाहेर पडत होतो.

      आता आईला कसं सांगू काय चालू आहे ते माझ्या संवेदनशील मनात? तिला तर हेही नाही समजत की मी मराठी नेत्यांना का मानतो.

वारी १५

              अमेरिकेतील अनुभव  पहिली वारी झाल्यावर जवळ जवळ सहा वर्षांनंतर लिहीत असल्याने आणि त्यावेळी मागास वाटणारा आपला भारत ( मेरा भारत महान! ) अतिशय वेगाने प्रगती करत असल्यामुळे आता अमेरिकाच मागास देश वाटायला लागलाय. आता हेच पहाना मी मारे ऐटीत चतुर्मिती चित्रपटाविषयी लिहिले तर आपल्याकडे आता षण्मिती चित्रपट निघालेही. आता सहा मिती कशाला म्हणायचे याविषयी जरा मनोगतींमध्ये चर्चेला पुरेसा वाव आहे( आणि तसा तो घेतला गेलाही) ही गोष्ट वेगळी! मी मॉलविषयी लिहिले न लिहिले तो त्याच्याहून आकाराने जास्त मोठे नसले तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक गर्दी असणारे मॉल आता आपल्याकडेही निघालेले पाहतोय  आणि तेथे बिल चुकते करायला त्याच्याहूनही जास्त वेळ लागण्याचा अनुभवही घेऊन झाला! येऊन जाऊन गाडी (बैलगाडी नव्हे ) घेऊन न गेल्यामुळे गाडी पार्क कुठे करायची याविषयी काही अडचण मात्र आली नाही(तशी ती आपल्याकडे कोठेही उभी केली तरी चालते म्हणा) पण नंतर घरी येताना अनेक रिक्षावाल्यांची मनधरणी केल्यावर मीटरपेक्षा दहा रुपये जास्त देत असाल तर नेतो या प्रेमळ आग्रहाला  मान्यता द्यावी लागली. तरी बर पुण्यातच आहे बंगलोरला नाही नाहीतर मीटरच्या दुपटी तिपटीने पैसे मोजावे लागले असते. ( पाहा रिक्षा की शिक्षा) अर्थात  याबाबतीत तर भारत अगोदरच फार पुढारलेला देश आहे. पण आता मला हे सांगा  तुम्ही अमेरिकेत टॅक्सीत बसल्यावर उतरताना एक दोन डॉलर  गुपचुप टिप म्हणून देताच ना मग तेच या रिक्षाचालकांनी हक्काने आणि प्रेमळपणे मागून घेतले तर कुठे बिघडले. आपली दृष्टीच अशी पूर्वग्रहदूषित.
                   त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळेच अमेरिकेत जाईपर्यंत तो विकसित - पुढारलेला आणि आपण मात्र विकसनशील म्हणजे मागास असे वर्गीकरण आपण नव्हे तर इतर जगाने केले आहे तेच आपण खरे मानून चालतो. पण अमेरिकेत गेल्यावर अमेरिकेलाच मागास देश म्हणावे लागेल असे वाटू लागते. ज्या क्षेत्रात आपण पुढारलेले अर्थात विकसित आहोत त्यात त्या देशाला विकसनशील तरी म्हणता येईल की नाही शंकाच आहे कारण त्या क्षेत्रात विकास करण्याची मूळ इच्छा तरी हवी ना! आता हेच पाहा व्यापारी म्हणून एके काळी ब्रिटिश लोक प्रसिद्ध होते आणि त्यातीलच काही अमेरिकेत गेल्यामुळे त्या क्षेत्रात तेच आघाडीवर असायला हवेत की नाही? पण नाही. कोंणत्याही गोष्टीचा ( वस्तूचाच नव्हे) व्यापार करण्यात आपण त्यांना केहांच मागे टाकले आहे. व्यापार करण्यासाठी आपल्याला कोणतीही गोष्ट चालते. मग त्यात शिक्षण असो, पदव्या असोत किंवा परीक्षेच्या प्रश्न पत्रिका असोत.
              अमेरिकेत पर्यटक यावेत म्हणून प्रत्येक स्थळ सुशोभित करून प्रेक्षणीय करण्यात उगीचच पैशाचा अपव्यय करताना दिसतात. त्याऐवजी त्या स्थळातील वस्तूंचाच व्यापार केला तर? म्हणजे सुंदर सुंदर  दुर्मिळ पेंटिंग्स किंवा शिल्पे उगीच संग्रहालयात सडत पडण्यापेक्षा त्यांचाच व्यापार करण्याची कल्पना नाही त्यांना सुचत! आपल्याकडे सगळ्याच वस्तू एवढेच काय माणसेही विकाऊ असतात. अमेरिकेत रिपब्लिकन सेनेटर डेमोक्रेट झालाय किंवा उलटे झालेय असे कधी ऐकू आले नाही. कदाचित या बाबतीत फारच कमी पर्याय असण्याचा हा फायदा( की तोटा?) !आपल्याकडे कसे दररोज राजकीय व्यक्ती वेगळ्याच पक्षात असतात. एवढेच काय पण नवीन पक्षही काढतात. या व्यापारात किती फायदा असतो याची यांना कल्पनाच नसावी.
             सफारीसारखी अनेक अभयारण्ये ठेऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणात पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा त्यांची शिकार आपणच करून त्यांच्या कातडीचा किंवा शिंगांचा वा सुळ्यांचा व्यापार करण्याची शक्कल  त्यांना सुचवण्यासाठी आपल्या वनमंत्र्यांनाच तिकडे पाठवायला हव.
            राम गणेश गडकऱ्यानी बाळकराम या नावाने लिहिलेल्या विनोदी लेखात ( परिशिष्ट पाहा) स्वयंपाकघरातील काही नव्या कृतींचा परिचय करून दिला आहे. (बघा गडकऱ्यांनाही या विषयाचे महत्व किती पूर्वी कळले होते. अगदी कमलाताई ओगले यांच्या पुस्तकापूर्वी आणि आपल्या दूरदर्शन वाहिन्यावर संजीव कपूरचा खानाखजाना सुरू होण्यापूर्वी. ) तर ते असो. बाळकरामांच्या या लेखात त्यानी खाद्यपदार्थांच्या नावांने प्रचलित  वाक्प्रचारांचा गमतीशीर वापर करून तो लेख लिहिला आहे. त्यात गुळाचा गणपती, चापटपोळ्या, धम्मकलाडू इ. पदार्थाबरोबरच बर्फीची चटणी हा पदार्थ दिला आहे. त्या खाद्यपदार्थ कृतीच्या शेवटी त्यांनी "माझ्या मते आपल्या आवडत्या कोणत्याही पदार्थाची चटणी सहज करता येते, " असा विनोदी शेरा मारला आहे. गडकरी आज हयात असते तर त्यांनी त्यात भूखंडाचे श्रीखंड, शि़क्षणाचे शिक्रण, पदव्यांची खिरापत अशा नावाच्या पदार्थांची भर घालून " आमच्या मते भारतात कोणत्याही गोष्टीचे खाद्यपदार्थात  रूपांतर करून त्याची सहज चटणी करता येते. "असा शेरा मारला असता. खाते वाटपाबाबत मंत्रिमंडळातील घटकपक्षांत उगीच नाहीत वाद होत. खाद्यसंस्कृतीत नाहीतरी आपण पहिल्यापासूनच आघाडीवर आहोत अशी आघाडी घेणे अमेरिकनांना थोडेच जमणार आहे? तरी आपण मात्र मागासपणाचेच तुणतुणे वाजवत बसणार का? बुश, राइल्स भारतीयांच्या खाण्यावर टीका करतात त्यातील गर्भितार्थ खरा तर हाच आहे नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात  ते यांच्याबाबतीत अगदी खरे ठरते.
            आम्ही दुसऱ्या वेळी गेलो तेव्हां अध्यक्षीय निवडणुकांचे दिवस होते पण आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांनाच काय पण अमेरिकेतील लोकांना तरी ते समजत होते की नाही कुणास ठाउक. कुठे काही आवाज नाही, पताका नाही माळा नाहीत तोरणे नाहीत, कमानी नाहीत रस्त्यावर पोस्टर्स नाहीत. ढोल नाहीत ताशे नाहीत  कशी या देशाची प्रगती होणार? येथील छापखान्यांना, चित्रकारांना, घोषणा रचणाऱ्याना आणि देणाऱ्यांना कसे काम मिळणार? आमच्याकडे साधा गल्लीतील पुढाऱ्याचा वाढदिवस असला की त्या भागातील सगळ्या रस्तांवर कटऔटस, पोस्टर्स यांचा खच पडतो आणि इकडे एक साधी पोस्टर्स नाहीत की जाहिरात नाही. फक्त येऊन जाऊन दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांवर  त्यांच त्या मिळमिळीत चर्चा. त्यामुळे नंतर त्या वाहिन्यांच्या ऑफीसवर हल्ले नाहीत. त्यात ना कसला आवेश ना दंगा धोपा ना रस्ते बंद असे सगळे शांत आणि म्हणे हे जगाचे नैतृत्व करणार. अरेरे यांना प्रशिक्षणासाठी आपल्याकडेच बोलवायला हवे असे वाटून गेले. थोडक्यात काय आमची वृत्ती म्हणजे अगदी " घरकी मुर्गी दाल बराबर".   
        अमेरिकेत गेल्यावर कित्येक दिवस आपली वस्तूच्या डॉलरमधील किमतीची रुपयात रूपांतर करण्याची संवय काही केल्या सुटत नाही. त्यामुळे कटिंग करायला पंधरा डॉलर म्हटल्यावर लगेच त्याचे रूपांतर त्या वेळी जवळ जवळ साडेसातशे रुपये होत असल्याने येवढ्या रुपयात भारतात दोनतीन तरी वर्षाचे कटिंग होईल हा विचार करून मी तो विचारच टाळला, शिवाय त्याच वेळी डॉ.ए. पी. जे. अब्दुलकलाम राष्ट्रपती झाल्यामुळे मी त्यांचा आदर्श समोर ठेवल्याचा टेंभाही मिरवला.
         माझ्या मित्राचा मुलगा जो सुजितचा मित्रही आहे तो  कनेक्टिकटला राहत होता त्याच्याकडे गेलो होतो त्याच्या मुलीचा फ्ल्यूटचा कॉन्सर्ट त्यादिवशी त्याच्याकडेच होता. येथील त्याच्या मुलीच्या शाळेत विद्यार्थ्याना कुठले तरी एक वाद्य शिकावे लागते. रश्मी ( त्याची मुलगी)ज्या शाळेत शिकत होती तिथे ज्या वाद्यांचा शिक्षणक्रमात समावेश होता त्यातील फ्ल्यूट हे वाद्य तिच्या बापाने निवडले. आणखी ड्रम ,कीबोर्ड अशी पण वाद्ये शिकवली जात होती म्हणे !  त्या शाळेच्या संचालकानी ते वाद्य म्हणजे फ्ल्यूट तो विकत घेणार की भाड्याने घेणार असा प्रश्न विचारल्यावर भाड्याने घेण्याच्या कल्पनेचा विचारही त्याच्या मनात आला नाही कारण भारतात त्यावेळी पंचवीस तीस किंवा जास्तीत जास्त पन्नास- शंभर रुपयापर्यंत मिळणारा फ्ल्यूट अमेरिकेत फारफार तर दहा पंध्रा डोलरला मिळेल या कल्पनेने त्याने विकत घेणार असे ठामपणे  सांगितले आणि तो विकत घ्यायला गेल्यावर मात्र त्या फ्ल्यूटची किंमत ७९९ डॉलर्स आहे हे ऐकल्यावर त्याचे डोळे पांढरे झाले. अर्थात त्याने मग तो विकत घेण्याचा विचार रद्द केला. हा फ्ल्यूट आपल्या बासरीसारखा अगदी साधा नसतो, तर क्लॅरोनेट या वाद्यासारखा तो धातूचा असून त्याला बरीच छिद्रे असतात आणि त्यातील काही वाजवताना बंद करावी लागतात तर काही उघडावी लागतात हे तो पाहिल्यावर कळले. फ्ल्यूट भाड्याने ( महिन्याला १० डोलर्स) घेऊनच तिने मग सराव सुरू केला. तो सराव कसा चालला आहे हे सर्वांसमोर दाखवण्याच्या या कार्यक्रमाला कॉन्सर्ट म्हणजे आपण ज्याला बैठक म्हणतो तसा हा प्रकार. मुला/लीला छंद जोपासण्यासाठी एक प्रकारचे उत्तेजन म्हणाना! त्यासाठी शेजारी मित्रमडळींना त्याने प्रेक्षक म्हणून बोलावले होते.   
         पुढे तेथील शाळेत माझाच नातू जायला लागल्यावर त्या शाळा पाहण्याचा योग आला इथे आपल्याप्रमाणेच प्रीस्कूल, ज्यूनियर के. जी., सिनियर के. जी. अशी तीन वर्षे झाल्यावर मूल प्राथमिक शाळेत जायला लागते. या तीन वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी पालकाची असते आणि त्या काळात हवी ती शाळा ते निवडू शकतात. या तीन वर्षाचे शिक्षण बरेच महागडे असते पण वेगवेगळ्या शाळांतं शिक्षणशुल्कात फारसा फरक नसतो. शाळेत जाण्यासाठीची व्यवस्थाही पालकानाच करावी लागते. तरीही शाळेत पालक सोडू शकत नसेल तर शाळेची मान्यताप्राप्त व्यक्तीच ते काम करू शकते.
              पहिल्या इयत्तेपासून पुढील शिक्षणाची जबाबदारी मात्र शासनाची असते. पण त्यातही पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल असे दोन प्रकार असतात आणि प्रायव्हेट स्कूल्सना बरीच फी असते उलट पब्लिक स्कूलमध्ये मात्र शिक्षण पूर्णपणे मोफत असते. शिवाय तरीही तेथे शाळेत शिकवले पण जाते त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यास वेगळ्या क्लासला जावे लागत नाही. अशाने क्लासचा उद्योग कसा चालणार?म्हणजे याही बाबतीत आपणच अधिक पुढारलेले आहोत. आपल्याकडे शाळेत शिक्षक नेमतांना त्यांना पगार देण्या ऐवजी त्यांच्याकडूनच घसघशीत देणगी शाळेसाठी घेण्यात येते आणि मग ती रक्कम कशी वसूल करायची हे त्या शिक्षकावरच सोपवले जाते. इथे मात्र शिक्षकाने शाळेत शिकवायला पाहिजे असा नियम आहे आणि ते तो कसोशीने पाळतात. तुम्ही ज्या भागात राहता त्याच प्रभागातील शाळेत तुमच्या पाल्याला प्रवेश घ्यावा लागतो आणि कोणत्याही धावपळीशिवाय तो मिळतो. आपल्याकडे रिझर्वेशनशिवाय बस, रेल्वेसारखेच शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणे कठीण असल्यामुळे प्रवेश मिळाला की एव्हरेस्टच्या शिखरावर पोचल्याचा भास आणि आनंद जो होतो त्याला येथील पालक मुकतात.
                        येथील शाळां पाहून त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटायला लागला. या शाळांच्या इमारती आपल्याकडील कोठल्याही महाविद्यालयापेक्षा भव्य असतात. तरी या शाळा त्या त्या शहरांच्या महापालिकांसारख्या स्थानिक संस्थानीच चालवलेल्या होत्या. शाळेत जाण्यासाठी जी बस असे तिच्यासाठी मात्र काही रक्कम द्यावी लागते. बाकी सर्व शैक्षणिक साहित्य शाळेतच मिळते. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे घोकंपट्टीचा पूर्ण अभाव. दुसरीपर्यंत तर स्पेलिंगसुद्धा बरोबर लिहिण्याचा कटाक्ष नसतो.अर्थात आपण याही बाबतीत आघाडीवर आहोत आणि दहावीपर्यंतही स्पेलिंग शुद्धलेखन यांचा मुळीच आग्रह आपण धरत नाही. इतकेच काय दहावीपर्यंत आपल्याकडे मुलांना कॉपी करण्यासाठी आवश्यक तेवढेच वाचता आणि लिहिता आले तरी भागते. इथे मात्र तिसरीपासून स्पेलिंगच्या चुका दाखवल्या जातात. त्याचा आग्रह पहिल्यापासूनच धरावा असे पालकांचे मत ! मुलांनी स्वतःच या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा  करण्यात येते. इतर वाचन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी त्यांना उत्तेजन देण्यात येते. माझ्या नातवाने त्यामुळे वाचनात इतके प्रावीण्य संपादन केले की एडिसन शहरातील वाचनालयातील जास्त पुस्तके वाचल्याबद्दलची पारितोषिके त्याने दोनतीनदा पटकावली
                 दुसरी तिसरी पर्यंत तर पुस्तकेही नसतात. किंवा असली तर ती फक्त शिक्षकच वापरतात. आणि विद्यार्थ्यांना शाळेत वापरायला देतात, त्यामुळे पुस्तके पहायला न मिळाल्यामुळे त्यात चुका असतात की नाही हे कळू शकले नाही. दररोजचा पाठ वर्गातच शिकवला जातो आणि त्यावरील गृहपाठ मुद्रित स्चरूपात प्रत्येक विद्यार्थ्याला घरी मिळतो आणि त्याच कागदावर राखून ठेवलेल्या मोकळ्या जागा भरून  तो पाठ पूर्ण करून दुसऱ्या दिवशी दाखवायचा असतो. तो पुढे शिक्षकांकडून पाहिला जातो आणि त्याचे गुण वर्षाच्या सरासरीत धरले जातात. त्यामुळे दप्तराचे ओझे असे फारसे नसते. डबा घरून नेला तर तो खाण्यासाठी स्वतंत्र जागा असून त्या जागेच्या स्वच्छतेची फार काळजी घेण्यात येते, ज्या शाळेत माझा नातू जात होता त्याच्या वर्गात २०-२२ मुले आणि त्यांना दोन शिक्षिका होत्या. त्यामुळे व्यक्तिगत लक्ष फारच राहते.
              प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचा वाढदिवस शाळेत साजरा होतो त्यावेळी शिक्षिका त्यांना शुभेच्छापत्रे तयार करून देतात. आणि बाकीचे त्याचे मित्रमैत्रिणीही! शाळेतील वातावरण अतिशय खेळीमेळीचे असते. हॅलोवीन या सणाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांची हॅलोवीन परेड या नावाने शाळेच्या आवारात शोभायात्रा निघते त्याला जाण्याचा योग आला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने मजेदार मुखवटे आणि पोषाक परिधान केले होते. आमच्या नातवाने स्पायडरमॆनचा वेष   डोक्यापासून पायापर्यंत परिधान केल्यामुळे आमच्या शेजारून जाताना त्याने हात उंचावून दाखवला म्हणूनच आम्हाला तो जात आहे हे कळले. तरी त्याच्या पायातील बुटाकडे पाहून आमच्या सौभाग्यवतीने त्याला अगोदरच ओळखले होते म्हणे हे ऐकून मला सीतेच्या पायातील पैंजणावरून तिला ओळखणाऱ्या लक्ष्मणाचीच आठवण झाली.(आठवा हीच राघवा हीच पैंजणे) असे वेष अर्थातच विद्यार्थ्याच्या पालकानीच खरेदी करून आपल्या पाल्याला द्यायचे असतात, त्यात भुताखेताचे जास्त प्रस्थ असते. विशेष म्हणजे शिक्षिकांनीही या यात्रेत भाग घेतला होता. फक्त अशा विशेष दिनासाठी शिक्षिकांना भेट म्हणून काही देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येते
                 माझ्या मुलास त्याच्या कंपनीने दुसऱ्या प्रकल्पावर पाठवल्यामुळे जेव्हा त्याला वर्ष संपण्यापूर्वीच नव्या ठिकाणी जावे लागले त्यावेळी आपल्याकडील पद्धतीप्रमाणे बदली झाल्यावर कुटुंबास त्याच गावी ठेऊन कर्ता पुरुषच फक्त कामावर रुजू होतो त्याऐवजी तेथील प्रथेनुसार त्याने कुटुंबकबिल्यासह प्रस्थान केले त्यामुळे नातवाला शाळा बदलावी लागली पण आश्चर्य म्हणजे त्यासाठी कुठल्याही कटकटी कराव्या न लागता पहिल्या शाळेने दुसऱ्या ठिकाणच्या शाळेला नुसते कळवले की त्याचा प्रवेश पक्का. पहिली शाळा सोडताना नातवाला जो निरोप देण्यात आला तो अगदी आपल्या ‘ऑफीसमधील एकादी व्यक्ती दुसरीकडे  बदलून जाताना द्यावा अशा थाटाचा होता. म्हणजे त्याच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने आणि शिक्षिकांनी तर त्याला शुभेच्छापत्रे तर दिलीच पण तो किती चांगला विद्यार्थी होता आणि त्याच्या जाण्यामुळे आम्हाला किती वाईट वाटते हे प्रत्येक शिक्षिकेने बोलून दाखवले. आणि हे अगदी वरवरचे आहे असे निदान भासू तरी दिले नाही.
          

नेमेंचि येतो मग पावसाळा...

          अहाहा! सालाबादप्रमाणे पावसाने (आगमनाऐवजी) एंट्री मारलेली आहे. हवेत एक प्रकारचा ( धुंद आणि कुंद ऐवजी) कुबट ओलसरपणा आला आहे. (नवयौवना ऐवजी) जख्ख म्हाताऱ्या धरतीने (त्याच त्या शालू आणि सोकॉल्ड गालिच्या ऐवजी) हिरवी शर्ट पँट घातली आहे. अहाहा! पावसाळा येऊन महिना होत आला तरी, जीवांची तल्खली शमवणारा आणि तृषार्त धरतीला न्हाऊमाखू घालणारा हे शब्दप्रयोग अजून उगवलेले नाहीत.

सहज आठवलं म्हणून...

"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? "
मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल !
"ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. "
"हां हां.. " करत मी हापिसातून बाहेर सटकले आणि पळत जाऊन सीप्झच्या बाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानासमोर असलेल्या गर्दीत मिसळले.
"भैया, ये डॉक्युमेंटस जल्दीसे फोटोकॉपी करके दो। २ सेट बनाना। ठीक है? "
"मॅडम, १५ मिनिट थांबावे लागेल. " दुकानदार मराठीत सुरू झाला.
"१५ मिनिट???!!!! मौम जीव खाईल माझा.. तसेही तिला नॉनव्हेजच लागते जेवायला. प्लिज.. जरा पटकन करा ना हो.. "
मी अगदीच आटापिटा करतेय म्हणता तो माझ्याकडे पाहून हसायला लागला. तेवढ्यात त्याचे लक्ष माझ्या कंपनीच्या मंगळसूत्राकडे गेले. ( मंगळसूत्र म्हणजे लग्नवाले नाही.. नोकरीवाले ! कोणी कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा म्हणतात तर कोणी मंगळसूत्र.. असो. ) त्याने लगेच एक दुसरे मंगळसूत्र ( जे आमच्याच कंपनीतल्या कोणाचेतरी दिसत होते ) काढले आणि विचारले, "तुम्ही यांना ओळखता का? "
मी हातात घेऊन पाहिले तर काय आश्चर्य.. ते मुफिजचे मंगळसूत्र होते. मुफिजनेच मला या नोकरीच्या मुलाखतीला बोलावले होते आणि मग तिथून ऑफर लेटर देण्याचे सत्कार्य करण्यापर्यंत तीच होती माझ्याशी वाटाघाटींमध्ये. एकदम जिंदादील आणि त्यामुळेच माझी दोस्त झालेली.
"हो.. अगदीच छान ओळखते की पण हे तुमच्याकडे कसे काय आले? "
"त्या माणसाने आणून दिले. त्याला सीप्झ गेटबाहेर मिळाले म्हणाला. त्याला आत जायची परवानगी नसल्याने त्याने माझ्याकडे आणून दिले."
दुकानदाराने बोट दाखवले तिकडे पाहिले तर एक अगदी खंगलेला, म्हातारपणाकडे झुकलेला अगदीच गरीब माणूस दिसला. आम्हा दोघांचे बोलणे ऐकून तो माझ्याकडे आला. माझ्या पोटात धस्स झाले. सामान्यपणे अशी मौलिक ( मौलिकच म्हणायला हवी की... नवीन मंगळसूत्र घ्यायचे म्हणजे खूप झोलदार, लांबलचक काम आणि महागडेही ) वस्तू परत देताना देणाऱ्याच्या आर्थिक अपेक्षा चांगल्याच भारी असतात. त्यात आणिक तो माणूस असा फाटका म्हटला म्हणजे....
"म्याडम.. " इतकेच म्हणून त्याने माझ्यासमोर हात जोडले.
सीप्झच्या गेटबाहेरील दृश्य कोणाला बघून माहिती असेल तर माझी स्थिती किती चमत्कारीक झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकाल. सगळे लोकं आम्हां दोघांकडे बघायला लागले होते. असं कोणी उगाचच मला सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असल्यासारखं केलं की मला अगदी अवघडल्यासारखं होऊन जातं. एकदम गायब होऊ शकलो तर किती बरे होईल असे वाटते. माझ्याकडे फक्त फोटोकॉपीला लागतील इतकेच पैसे होते पण तरीही मुफिजचे मंगळसूत्र म्हणजे...
"हे बघा, हात वगैरे काही जोडू नका. हात खरेतर मी जोडायला हवेत तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाबद्दल." एक आवंढा गिळून मी, "किती पैसे हवे तुम्हाला?"
ते होते त्याहून जास्त व्यथित दिसायला लागले.
"माफ करा पण असे कोणाचे स्वाईप कार्ड हरवण्याचा आणि ते परत देणाऱ्याला बक्षिसी देऊ करण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे मला मार्केट रेट माहिती नाही. तुम्ही जितके सांगाल तितके देईन मी. " हुश्श.. एव्हाना लोकांच्या नजरांनी मला अगदी दडपल्यागत झालं होतं. माझे फोटोकॉपीचे कागदही माझ्या हातात आले होते. दुकानदाराचे पैसेही देऊन झाले होते.
"म्याडम, मुझे आपसे पैसे नहीं चाहिये। मुझे अगर दिला सकते हो तो बस्स एक नौकरी दिला दो। मेरे बच्चे भुखे नहीं देखे जाते अब मुझसे। कोईभी काम करूंगा मैं। मुझे बस्स नौकरी दिला दो। "
ओह नो ! मी खूपच खजील झाले. मी किती चुकीचं समजले होते त्यांना. आता या मागणीला मी काय करू? कोणाला रेफर करणे किंवा कोणाकडून स्वतःला रेफर करवून घेणे हे तसे माझ्या तत्त्वात बसत नाही, त्यामुळे मी ते कधीच करत नाही. आता हा पेच कसा सोडवावा. तो माणूस तसे म्हटले तर काहीच अवाजवी मागत नव्हता मला. का माहिती नाही पण कोरडी तत्त्वे बाजुला ठेवून या माणसाला मदत करायचे मनाने घेतले.
"आपका नाम क्या है? " तो माणूस हिंदी आहे कळताच माझा गाडा परत हिंदीकडे.
"जी, शिवप्रसाद। सब लोग मुझे शिवा बुलाते है।"
"अच्छा शिवाजी, आप क्या क्या काम कर सकते है? " असं रस्त्यावर उभं राहून असे प्रश्न विचारायचे म्हणजे जरा अवघडच वाटत होते पण इलाज नव्हता. अनाहूतपणे शिवाचा शिवाजी केल्याबद्दल बोलून गेल्यावर विचारात पडणाऱ्या मला मौज वाटली.
"साफसफाईका काम कर सकता हूं। या फिर हापिसमे अगर दूसरा कुछ काम है तो वो भी मैं जल्दी सीख जाउंगा। मुझे बस्स महिने की २-३हजार तनखा मिले ऐसा काम चाहिए।"
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला.
"अच्छा. आप चिंता मत करो। मैं देखती हू की आपको जल्दीही नौकरी मिल जाए। लेकीन आपका पुरा नाम, पता और फोन नंबर मुझे दीजिए।" काय बोलावे ते खरेतर सुचत नव्हतेच मला पण तरीही..
"म्याडम, मेरा नाम शिवप्रसाद है। पता ऐसे तो कुछ नहीं है अभीतक और फोन भी नहीं है।"
हे राम ! आता काय करणार मी?
"लेकीन फिर आपको कैसे काँटॅक्ट करेंगे? मेरा मतलब है आपको बुलाना हो तो.."
"जी.. आप इस दुकानपे मेरेलिए बुलावा रख दिजिएगा। वो मुझे बता देगा।"
!!!!!!!
"जी। ठीक है। मैं देखती हूं मैं क्या कर सकती हूं।" असे म्हणून मी गेटकडे वळायला लागले. तेवढ्यात तो माणूस चक्क माझ्या पाया पडला.
"जरूर दिलवाइएगा नौकरी, म्याडमजी।"
आता मात्र हद्द झाली होती. सगळे लोकं माझ्याकडे पाहून हसत होते.
"आप ऐसे मत किजिए प्लिज। मैने बोला ना मैं देखती हूं.. " असे म्हणून मी ऑफिसकडे धूम ठोकली.

~~~

"हॅलो.. "
"हॅलो मुफिज, तू तर साफ विसरलीस ना मला?"
"नाही रे वेदा, असं होऊ शकते का? पण मी तुला नंतर फोन करते कारण आत्ता मी जरा टेन्शनमध्ये आहे. ओके?"
"नाही. मला तुला आत्ताच भेटायचं आहे. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी."
"अब्बे मेरा स्वाईप कार्ड गुम हो गया है !!! तू अभी मेरा दिमाग मत खा.. प्लिज।"
"तू जास्त खिटपिट करू नकोस. मी इथे रिसेप्शनच्या तिथे आहे.. तू लगेच ये."
ती मुकाट्याने आली आणि माझे सरप्राईज म्हणजे तिचे स्वाईप कार्ड असेल याची सुतराम शक्यता तिला वाटलेली नसल्याने तसे ते असल्याचे कळल्यावर हरखून गेली ती एकदम.
"थँक्स, वेदा. यू आर ब्युटीफूल ! " तिची ही नेहमीचीच पद्धत थँक्स म्हणण्याची.
"ब्युटीफूल-फ्युटीफूल राहू दे बाजुला पण तुझ्या या मंगळसूत्राच्या बदल्यात मी एक प्रॉमिस करून आले आहे ते परत देणाराला. ते पूर्ण करण्यात तुला माझी मदत करता येईल का सांग. " खरेतर मी फक्त एक पोस्टमन होते एकूण व्यवहारात पण का कोण जाणे आता मला माझी जबाबदारी त्याहून अधिक वाटायला लागली होती.
"बोल ना.. काय प्रॉमिस केले आहेस?"
"नोकरी मिळवून देईन म्हणून ! "
"हॅ ! इतकेच ना? किती वर्षाचा एक्स्पिरियन्स आहे? बीई आहे की एमसीए की बिएस्सी? रिझ्युमे फॉर्वर्ड कर आणि काम झालं समज. तू आजवर एकालाही सजेस्ट केलेले नाहीस, त्यामुळे हे करायला मला खूपच आनंद होईल."
"मुफी, ही इज नॉट लिटरेट. "
"हाय दैया !!! मग कशी काय देणार नोकरी? तू पण ना वेडीच आहेस.. पैसे द्यायचेस आणि काम तमाम करायचेस मग. उगीच प्रॉमिसबिमिस करत बसतेस.. "
"मला तुझे उत्तर मिळाले, मुफी. थँक्स." असे म्हणून मी उतरल्या चेहऱ्याने वळायला लागले.
"अब्बे रुक तो। अशी काय जातेस मध्येच निघून? तो क्लिनिंगचे काम करू शकेल का? क्लिनिंग स्टाफमध्ये? "
माझा चेहरा उजळला. "हो. चालेल. "
"ह्म्म.. क्लिनिंग स्टाफची जबाबदारी आपल्याकडे नाही. ती एका एजन्सीकडे आहे. मला त्या माणसाचे डिटेल्स दे, मी पाठवते त्या एजन्सीवाल्यांना. बघुया काय करता येतं ते. ओके? "
मी माझ्या एका फोटोकॉपीतला एक कागद फाडून त्यावर शिवप्रसाद असे लिहून केअर ऑफ म्हणून झेऱोक्सवाल्याचा पत्ता आणि फोन नंबर लिहून तिला दिला. ते पाहून ती माझ्याकडे पाहतच राहिली.
"मुफी, तू हे करू शकत नसशील तर तसे सांग क्लिअरकट.. मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का पाहीन. बाय हुक ऑर कुक हे मला करायचेच आहे."
"तू कशाला मध्ये पडतेयस? माझ्या स्वाईपकार्डसाठीचं रिपेमेंट मीच करायला हवेय. आय विल गेट इट डन. डोंट यू वरी. "
"थॅंक्स, मुफी ! यू आर रिअली ब्यूटीफुल.. " आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्या हसण्यातला अर्थ इतर कोणालाही समजता येणार नव्हता. तेवढ्यात मौमचा ५व्यांदा फोन आला. तिने आता माझीही ऑर्डर देऊन ठेवली होती आणि डायरेक्ट कँटीनमध्ये पधारायचा हुकुम जारी केला होता.

~~~

"वेदू, तूने ऐसी क्या जादूकी छडी घुमाई है की तेरे डेस्ककी सफाईके लिए एक स्पेशल बंदा आने लगा है? "
मौमचा हा प्रश्न ऐकून मी बुचकळ्यात पडले. वाशीहून येत असल्याने बस नेहमीच उशिरा आणायची माझी मला हापिसापर्यंत त्यामुळे हा शोध मला लागणे शक्यच नव्हते.
"स्पेशल बंदा? "
"हां.. क्या तो शिवा नाम बताया उसने. "
मौमच्या या उत्तराने मला इत्तका आनंद झाला की मी अगदी चेकाळून गेले. आता सगळे जगच माझ्यासाठी ब्यूटीफुल झाल्यासारखे वाटले मला. हापिसातल्या कोणालाच मी कधी एसेमेस पाठवत नाही पण त्यादिवशी मात्र आवर्जून पाठवला मुफीला..
हम सोचते थे की सिर्फ हम मानते है आपको
लेकीन आपको माननेवालोंका काफिला निकला
दिलने कहा की शिकायत कर खुदासे
मगर वोभी आपको माननेवालोमेसे निकला !

~~~

कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. ते असेच काही असावे का?

नुकतेच वाचनात आलेले २ 'मु. रा. वि. '

'मुद्राराक्षसाचे विनोद' मनोगतींकरता वाचण्यास देत आहे. हे 'मुरावि' कदाचित यापूर्वी वाचले असल्यास, पुनश्च आनंद घ्यावा. त्याचबरोबर जमल्यास मुरलेल्या 'मुरावि' ची भरही घालावी.

१. द. मा. मिरासदारांचा किस्सा.

हा किस्सा द. मा. नी काही वर्षापूर्वी डोंबिवली येथे एका भाषणात सांगितला होता.

श्‍वानशक्तीचा विजय असो!

श्वानशक्तीचा विजय असो!

चला, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. माणूस नावाच्या "गाढवां'ना कुत्र्यांचा प्रामाणिकपणा तरी पटला. आजची "सकाळ'मधली बातमी वाचलीत? पुण्यात कुत्र्यांची मागणी दुपटीने वाढल्याची! आमच्या प्रामाणिकपणाला आत्ता कुठे भाव आलाय. बरं वाटलं.

बरेच दिवस याच विचारानं अस्वस्थ होतो. डायरी सुद्धा लिहावीशी वाटत नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला जात होता. "ही कुत्तरडी करायची काय? ' असले भोचक आणि अवमानास्पद प्रश्न विचारले जात होते. कुणीकुणी उपटसुंभ तर जंगलातून वस्तीत येणाऱ्या बिबट्यांसाठी खाद्य म्हणून सगळी कुत्तरडी जंगलात फेका, अशी भाषा करत होते. मुन्सिपाल्टीच्या लोकांपुढे तर कित्येक भाईबंदांनी हौतात्म्य पत्करलं. पण आम्ही त्यांच्या बाजूनं ठाम उभे राहिलो. म्हटलं, होताहेत क्रांतिकारक तर होऊ द्यात! हे बलिदान व्यर्थ जाणार नाही! काहींना बंदिवासात टाकण्यात आलं. त्यांच्यासाठीही लढा दिला. निदर्शनं केली. तुरुंगांच्या दरवाजांवर, अधिकाऱ्यांच्या घरांच्या भिंतींवर, दंडेलशाही करणाऱ्यांच्या चकचकीत गाड्यांवर जाहीरपणे तंगडं वर केली. तरीही काही फायदा झाला नाही.

आमचा प्रामाणिकपणा, आमची उपयुक्तता पटायला चोरांनी घरं लुटायला हवी होती. मुडदे पडायला हवे होते. भरदिवसा अपहरणं व्हायला हवी होती....!

असो, उशीरा का होईना, माणसांना शहाणपण सुचलं, हे महत्त्वाचं. त्या "व्होडाफोन'वाल्यांच्या सात पिढ्यांवर तंगडं वर करावं, असं जाहिरात बघून वाटलं होतं. कारण त्यांनी आमच्या एका परदेशी भाईबंदाला जाहिरातीसाठी कुठल्यातरी गाडीच्या मागे तंगडतोड करत पळायला लावलं होतं. पण त्यांनीच आमची "इमेज' सुधारली. कुठल्याही मदतीला तयार, अशी आमची ओळख लोकांवर ठसवली. आता त्या जाहिरातीतल्या कुत्र्याच्या तोंडावरची माशीही हलत नाही, ही गोष्ट अलाहिदा. पण आपल्या एका भाईबंदाचं कौतुक होतंय आणि आपला मान वाढतोय, हा आनंद मोठा होता. बरं, त्याच्या जातीतल्या इतर पंटर्सचीही किंमत वाढली ना त्याच्यामुळं!

मलाही कुण्या केळकरानं विकत घेतलाय. माजी लष्करी अधिकारी आहे म्हणे. आता त्याच्या शिस्तीत राहावं लागणार. आयला, गोचीच आहे! पण आता संधी मिळालेय. आता जिवाचं रान करून मालकाचं घर राखायचं. फक्त एकच प्रॉब्लेम होईल. स्वीटीला सारखं सारखं भेटता येणार नाही. सध्या ती तरी कुणाच्या घरची शोभा झालेय, कुणास ठाऊक! बाकी, ती काही घराच्या रक्षणाबिक्षणाच्या कामाची नाही म्हणा! ती पडली पामेरिअन! आमच्यापेक्षा वरच्या जातीतली. ती कुणातरी धनिकाच्या घरातच पडली असणार. कुणीतरी फटाकडी नको तेव्हा घरी येणाऱ्या बॉयफ्रेंडपासून संरक्षणासाठीच तिचा उपयोग करत असणार.

असो. हेही नसे थोडके!

अप्पा

एस. टी. मधून सचिन उतरला तेव्हा रात्रीचे ११:३० होत आले होते. एस. टी. चे धक्के खाऊन त्याचा जीव आंबलेला होता, त्यात गाडी बिघडल्याने विनाकारण गाडीने २ तास उशीर लावला. पावसाचीपण रिमझीम सुरू होती. एकंदर वातावरण कुंदच होतं. त्याला पुढच्या गावाला जायचं होतं, ते गाव सुमारे १५ किमी. लांब होतं.

त्याने गाडीची चौकशी करायला सुरुवात केली. काही रिकाम्या गाड्या उभ्या होत्या, पण त्या तिकडे जायला तयार होत नव्हत्या. त्याची अडचण लक्षात घेऊन शेवटी त्यांच्यातला एक जण म्हणाला.