"संथ वाहते क्रुष्णामाई" अशी ओळ पाठीवर वागवत त्या क्रुष्णामाई प्रमाणेच संथ चालणाऱ्या ट्रकला ओवरटेक करून मी पुढे गेलो. बाजूने पास होताना "बोले तैसा चाले" ही उक्ती आठवल्याने त्या ट्रकच्या टायरला हात लावून नमस्कार करायचा मोह मी कसाबसा टाळला. ओतप्रोत भरणे म्हणजे काय ह्याचा योग्य नमुना असलेला आणि तारीख जवळ आलेल्या गर्भवती स्त्री प्रमाणे तो चालणारा तो ट्रक नि त्याचा चालक ह्यांना मनातल्या मनातच नमस्कार केला नि ढाब्याची वाट धरली.
दुसरा चहा संपवतोय इतक्यात ती क्रुष्णामाई आमच्या ढाब्याच्या अंगणातच डुलत डुलत अवतीर्ण झाली. त्या ट्रकला पाहून मला पुन्हा एक उपमा सुचली. गवळणीच्या कमरेवर डचमळणारी घागर.
आज या विश्वात सर्वजण यशाच्या पायरीवर चढ़त आहेत पण कधीतरी यात वेळ काढून जर आपल्या विश्वाची गणना केली तर ती "कुठे हरवले ते बालपण?" यावरच येऊन थांबते. प्रत्येक मनुष्याला या जगात काहीतरी व्हावेसे वाटते. पण आईच्या कुशीतील लहान बाळ व्हावेसे वाटते ही कल्पना किती सुखद आहे ना........... पुन्हा त्या सुखद क्षणानंच आनंद रोमारोमात भरून एक निःसंग आत्म्यात निर्मल आणि व्यापक जीवन जगून बंधनाच्या कुंपणात बंदिस्त राहण्याचा तो क्षण कोळशाच्या खाणीतून मिळणाऱ्या हिऱ्याइतकाच अभिनव असेल.
अचानक झालेल्या या हल्ल्याने मास्तर गांगरले. त्या सणसणीत फटक्यांनी त्यांचा दुखरा कान वाहू लागला नि डोके भिरभिरू लागले. अवचित लाथ बसलेल्या कुत्र्याच्या पिलासारखे ते असहाय्यपणे कळवळून गेंगाटले.
मास्तरांपासून दोन हातांवर असलेल्या नंदिनीच्या लक्षात गोष्टी येईस्तोवर एवढे घडून गेले होते. अचानक तिला कानशिले गरम झाल्यासारखे जाणवले. अशी वागणूक आडिवऱ्यात कुणी गुरांना देता तरी ती खवळून उठती. इथे तर खुद्द जन्मदाता नि आयुष्यकर्ता पिता समोर होता. एडक्यासारखी मुसंडी मारून ती त्या व्हॅनमध्ये घुसली.
कानठळ्या बसवणारा भोंगा गर्जवत आणि साखळदंडांचा लोखंडी खणखणाट करत जयगडच्या बंदराला बोट लागली आणि गणेशमास्तरांनी आपली पिशवी उचलली. ऐन विशीत मॅट्रीक उतरल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली होती. नीट लिहितावाचता येते एवढ्या बळावर फिनिक्स मिलमध्ये त्यांना टाईमकीपर म्हणून नोकरी मिळाली. दोनतीन वर्षातच त्यांनी पगारकारकून होण्यापर्यंत मजल मारली. दहा वर्षात ते मुख्य सुपरवायझरचा उजवा हात होऊन गेले. दरम्यान रीतीप्रमाणे त्यांचे लग्न झाले. बायको आडिवऱ्याला आणि नवरा परळच्या लक्ष्मी कॉटेजमध्ये बाप्यांबरोबर हेही रीतीप्रमाणेच झाले. गणपती-शिमग्याला घरच्या वार्या आणि त्यांत मिळालेल्या नितकोर सहवासातही निसर्गाने चोख बजावलेले काम हेही रीतीप्रमाणेच झाले.
रीतीवेगळे झाले ते हे, की मुलीचे नाव त्यांच्या आईने सुचवल्याप्रमाणे अनुसूया किंवा मालती ठेवण्या ऐवजी मुलीच्या आईने सुचवल्याप्रमाणे नंदिनी ठेवले. दुसरी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे मुंबईत आता वेगळी खोली सहज परवडत असूनही पैसा गाठीला राहण्यासाठी त्यांनी अजूनही बायको आडिवऱ्याला आणि आपण एका खोलीतल्या चार बाप्यांपैकी एक अशीच विभागणी अजून ठेवली. तिसरी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे लक्ष्मी कॉटेजच्या त्यांच्या खोलीत त्यांनी सुरू केलेल्या विनामूल्य शिकवण्या. जेमतेम लिहिण्यावाचण्याची अक्कल असलेली माणसे कोंकणातून बिगारी म्हणून येतात आणि घरी मनीऑर्डरी करताना पोस्टातल्या लिखाण-कारकुनासमोर ओशाळगत बसतात हे त्यांना खटकले. चौथी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे दहा वर्षांत जमतील तितके पैसे नेटाने साठवून त्यांनी परत गावी येण्याचा निर्णय घेतला. घरचे उत्पन्न दोन वेळेस पुरेसे एवढे होते. साठवलेल्या पैशातून स्वतः शाळा काढण्याचा त्यांचा विचार होता.
सुमतीने साथ दिली आणि तो तडीसही गेला. पहिली दहा वर्षे तर शाळा त्यांच्याच मांगरात भरली. फी अशी नव्हतीच. पण शाळेतल्या मुलांच्या पालकांनी 'जमेल ते' या सदराखाली लाल तांदळापासून नाचणीपर्यंत आणि काजूच्या बोंडांपासून घोळाच्या पालेभाजीपर्यंत गणेशमास्तरांच्या घरात भरले. हलव्याची जोडी आणि माडीचा शिसा देऊ करणार्या भंडाऱ्यांच्या प्रकाशला मात्र नाराज करावे लागले.
सुमतीची साथ त्यांना फार काळ लाभली नाही. तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, तेव्हा रोग तिसऱ्या टप्प्यात होता. फार हाल हाल न होता ती गेली एवढेच काय ते समाधान.
नंदिनी त्याच शाळेत शिकली, थेट दहावीला बसली, जिल्ह्यात पहिली आली, बारावीला तर बोर्डात पहिली आली आणि बी ए करायला रत्नागिरीला गेली. बी ए नंतर तिने बी एड केले आणि वडिलांच्या शाळेत शिकवायला ती घरी परतली. एव्हाना ती चांगलीच उफाड्याची झाली होती. डोळे आणि रंग तिने आईकडून घेतला होते. निळेभोर डोळे आणि सोन्यासारखे झळाळणारे गोरेपण.
ऐन उमेदीत अर्धपोटी, अर्धझोपी काढलेले कष्ट आता गणेशमास्तरांना जाणवू लागले होते. पण मुलगी हाताशी येताच त्यांचा हुरूप आणखीनच वाढला. चारच वर्षांत त्या दोघांनी मिळून शाळेचा लौकिक अख्ख्या महाराष्ट्रात पसरवला. नंदिनीने तर लग्न न करता शाळेलाच वाहून घेण्याचा निर्णय घेतला. गणेशमास्तरांनी आडकाठी आणायचा प्रश्न आला नाही. कारण या एका बाबतीत नंदिनीने नेहमीची अदबशीर वागणूक सोडून दिली. आणि मास्तरांना 'विचारण्या'ऐवजी 'सांगितले'.
वयाची साठी पार करत असतानाच मास्तरांना राज्य शासनाचा विद्या महर्षी पुरस्कार जाहीर झाला. अख्खी पंचक्रोशी उत्साहाने उफाळून उठली. मास्तरांचे जागजागी सत्कार झडले. नंदिनीने त्यांच्या बरोबर मुंबईला पुरस्कार सोहळ्याला जायचे आणि तिथून बापलेकीने पुणे दौरा करायचा असे ठरले. गिरणीत कामाला असतानाही मास्तरांना पुणे घडले नव्हते. नंतर त्यांनी गेल्या तीस वर्षांत आडिवरे आणि जयगड एवढेच काय ते त्यांनी प्रवासले होते. आणि नंदिनीने तर आडिवरे, जयगड, रत्नागिरी हा त्रिकोण कधीच भेदला नव्हता.
पुरस्कार वितरण सोहळा यथातथाच होता. शिक्षणमंत्री त्यांच्या प्रथेप्रमाणे उशीरा आले. मग त्यांनी शिक्षकांना बरेच उपदेशामृत पाजले. गुरुजींनी तंबाखू खाऊ नये, चांगले संस्कार करावेत इ इ. त्यांच्या भाषणानंतर समारंभ संपणारच होता. त्याप्रमाणे निवेदकाने आभारप्रदर्शनाचे दळण दळायला घेतले. एवढ्यात गणेशमास्तर ठाम पावले टाकत माईकपाशी गेले, आणि म्हणाले, "मी या पुरस्काराबद्दल परत एकदा आभार मानतो, आणि दोन शब्द बोललो तर ऐकून घ्याल अशी आशा करतो. आज मला हा पुरस्कार मिळाला, आनंद आहे. पण या पुरस्काराचे अनेकानेक मानकरी अजूनही अंधाऱ्या कोपऱ्यांत, दुर्गम खेड्यांत विखुरलेले आहेत. शिक्षकांनी काय करावे हे शिक्षकांखेरीज प्रत्येकजण सांगत असतो. त्यातील 'मास्तरांनी व्यसने करू नयेत' हा मुद्दा अजिबात विवादास्पद नाही. पण यातून इतर सर्व लोक व्यसने करायला मोकळे हा जो अर्थ ध्वनित होतो तो निश्चितच आक्षेपार्ह आहे. शिक्षकाइतकेच महत्त्वाचे, किंबहुना, लोकशाहीमध्ये त्याहून वरचे, स्थान लोकप्रतिनिधींचे आहे. तर लोकप्रतिनिधी हा व्यसनमुक्त असावा, शुद्ध चारित्र्याचा असावा, भ्रष्टाचारी नसावा या अपेक्षा ठेवणे गैर नसावे. दुर्दैवाने प्रत्यक्षात तसे घडताना अगदी अभावानेच दिसते. अशा या लोकप्रतिनिधींचा कुठेही कार्यक्रम असला की शाळेतले विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा तासंतास उन्हातान्हात झेंडे घेऊन उभे, आणि शिक्षक त्यांच्यावर देखरेख करताहेत हे दृष्य जिथे जावे तिथे दिसते. शिक्षकांचे पगार महिनोन महिने होत नाहीत. गावकऱ्यांनी वर्गणी काढून शिक्षकाला जगवण्याची पाळी येते. या वेळेवर न मिळणाऱ्या पगारातही शाळेचा निकाल जर कमी लागला तर कपात होते. कामाला हाताशी आलेला मुलगा शाळेतून काढून घरातली उपासमार कमी करू पाहणार्या शेतकऱ्यांमुळे शिक्षकाच्या घरात उपास का पडावेत? मी इथे व्यसनांचे समर्थन करायला उभा नाहीये. मी स्वतः एकही व्यसन करीत नाही, केले नाही आणि करणारही नाही. पण शिक्षकांसारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा छोट्या-मोठ्या व्यसनांच्या आहारी जाते, तेव्हा त्या घटनेचे अति-सोपेकरण करून शिक्षकांना उठसूट झोडपू नये एवढीच विनंती. शिक्षकही याच समाजात जगतो, त्यामुळे त्यालाही समाजात बोकाळलेले दोष चिकटले तर त्यात केवळ त्याचाच दोष आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे? असो. कुणाला दुखवण्याचा हेतू अजिबात नाही. तरीही यात काही अधिक वावगे वाटले तर माफ करा".
पूर्ण सभागृह चटकन उठून श्वास रोखून थांबले. गणेशमास्तर खाली बसल्यानंतर हलक्या हाताने टाळ्या वाजल्या. त्यांच्या आवाहनाला धक्का लागू नये इतक्या हळुवारपणे.
राजकारणात येण्याआधी आपण मूळचे शिक्षकच असल्याची भलावणी जिथे तिथे करणारे शिक्षणमंत्री अंगभूत निर्लज्जपणे हसत निघून गेले.
=====
मुंबईच्या मुक्कामात मास्तरांनी नंदिनीबरोबर हिंडून जुन्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला. पण गिरणगावची झालेली अवस्था पाहून ते मनोमन हादरले. गिरणी-कामगार संपाच्या कहाण्या नि हकिकती त्यांनी वाचल्या-ऐकल्या होत्या. पण समोर दिसणारी चाळींची थडगी पाहून त्यांना भडभडून आले. हरवल्या नजरेने ते लक्ष्मी कॉटेजसमोरच्या फ्लायओव्हरखाली खूप वेळ उभे राहिले. अखेर नंदिनी त्यांना हात धरून सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी व्हीटीला घेऊन गेली.
पुण्याला पोचल्यानंतरही मास्तर गप्पगप्पच होते. प्रभात लॉजमध्ये खोली घेऊन ते समोर दिसणारा वाहनांचा अथांग सागर पाहत बसले. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन कॉलेज आणि विद्यापीठ पाहून यायचे, संध्याकाळी तुळशीबाग, बेलबाग करून मग तिसऱ्या दिवशी देहू-आळंदी करायचे असा बेत ठरला.
==============================
विजयचे डोके फिरले होते. आपली म्हणवणारी माणसे केसाने गळा कापतात हे अण्णांचे लाडके मत एवढे खरे होईल असे त्याला वाटले नव्हते. आणि ते अण्णांसमोरच खरे झाले होते ही आणखीनच नामुष्की.
अण्णा गेली तीस वर्षे आमदार होते. गेली वीस वर्षे मंत्री होते. तालुक्यातले तिन्ही साखर कारखाने त्यांच्या इशाऱ्यावर नाचत. दूध उत्पादक संघ, द्राक्ष बागायतदार संघ, कुक्कुट उत्पादक संघ या तर त्यांनीच भविष्याची चाहूल घेऊन स्थापन केलेल्या संघटना. केवळ ऊस एके ऊस न करता शेतकर्याला या ना त्या मार्गाने चार पैसे मिळावेत ही त्यांची कळकळ. असा शेतकरी मग पिढीजात त्यांचा मतदार होई यात नवल नव्हते.
अण्णांना एकच मुलगा. मुलगी नाही. पुतण्या नाही. भाचा नाही. म्हणजे विजयचा मार्ग संपूर्णतया निष्कंटक. आता एवढे सहज सुटणारे गणित समोर असताना कुणाला जरा मजा करावीशी वाटली तर त्यात गैर काय?
विजयला एफ वाय पासून शिकायला पुण्याला ठेवले होते. पहिल्या वर्षी बुलेटवर खूष असलेला तो, दुसऱ्या वर्षापासून मारुती झेनमध्ये वावरू लागला. प्रत्येक वर्ष वेळच्या वेळी पास होत गेला याचे अण्णांना कौतुक होते. परीक्षेला स्वतःऐवजी दुसऱ्यालाच बसवण्याची विजयची युक्ती त्यांना माहीत असली तर तसे त्यांनी दाखवले नाही.
हळूहळू अण्णा आपल्याबरोबर त्यालाही नेऊ लागले. 'विजय'चे विजयसिंह व्हायला वेळ लागला नाही. पुढे विजयसिंहराजे झालेच. त्यातून एक फाटा फुटून विजयसिंहजीराजे असा गेला, तर दुसरा विजयसिंहराजेसाहेब असा गेला. "येऊन येऊन येणार कोण? @@@ शिवाय आहेच कोण? " या सदाबहार घोषणेत बसवायला ही नावे फारच लांबलचक होती हे खरे आहे. पण मग तिथे "आमच्या शिवाय" अशी तोड काढण्यात आली.
तर हे विजयसिंहराजे (फाट्यावरच थांबतो) पुण्यात शिकायला असल्यापासून त्यांचा पुण्यात स्नेहबंध चांगलाच जुळलेला होता. बरोबर शिकायला असलेल्या स्थानिक मुलांनी त्याचे पुण्याच्या भूगोलाचे आणि शरीरशास्त्राचे शिक्षण चांगलेच मन लावून केले. कॉलेज संपायच्या आतच त्याचे कल्याणीबरोबर लागेबांधे निर्माण झाले.
पदवीधर झाल्याझाल्या अण्णांनी गावाकडे बोलावून घेतले म्हणून नाईलाजाने तो गेला. त्यात अण्णांना हार्ट ऍटॅक आला, आणि "पुढची निवडणूक लढवणार नाही" असे ते जाहीर करून बसले. एव्हाना टाटा सफारी जाऊन पजेरो आली होती. त्यातून तर पुणे तीन तासांत गाठता येई. पण तेवढाही वेळ मिळताना मारामार. इकडे पुण्यात कल्याणीने फारच जिवाला घोर लावला होता. वेळीअवेळी विजयच्या मोबाईलवर तिचे फोन येत. म्हणजे, 'मिस्ड कॉल' येत. उलटे फोन करण्याची जबाबदारी तोच पार पाडे. पदवीधर झाल्यानंतर कल्याणी शपथेपुरती कुठल्यातरी सामाजिक संस्थेत जाऊन बसत असे (तिने बी ए ला सोशियोलॉजी घेतले होते; विजयने घेतले होते म्हणून). पण विजयला फोन करून दिवसातले दोन-तीन तास तरी गप्पा मारणे हेच तिचे मुख्य वेळ जाण्याचे साधन होते.
विजय आपल्याशी लग्न करेल असे तिला खरेच वाटत होते का, हा संशोधनाचा विषय ठरला असता. जरी 'ती' मर्यादा तिने विजयला ओलांडू दिली असली, तरी ती ओलांडणारा विजय पहिला पुरुष थोडाच होता? अर्थात विजयला हे माहीत नव्हते. गावाकडे गेल्यावर केवळ नाईलाजाने त्याने आपल्या शारिरीक गरजांच्या मोहरा उमटवायला सुरुवात केली असली, तरी त्याच्या दृष्टीने कल्याणी पहिले प्रेम होते. आणि काही ना काही युक्ती करून आपण तिच्याशी लग्न करू अशी त्याला आशा होती.
त्याची भीती एकच होती. कल्याणी ब्राम्हण होती. आणि या विरोधी पक्षांनी आधीच अण्णांच्या समाजवादी प्रतिमेविरुद्ध काहूर माजवायला सुरुवात केलेली होती. ते सच्चे मराठा नव्हेत असा प्रचार सुरू झाला होता. त्यात या बामणाच्या मुलीशी लग्न करणे धोकादायक ठरले असते. विशेषतः सोंडूरच्या घोरपड्यांची मुलगी सांगून आलेली असताना.
पण सोंडूरच्या घोरपड्यांची ती पालीसारखी पांढरीफटक, बेळगावातल्या घरी राहून फक्त परीक्षांना कॉलेजात जाऊन पदवीधर झालेली, उठताबसता 'जी, जी' करणारी सौदामिनिराजे त्याला फ्रीजमध्ये ठेवून ताजेपणा टिकवलेल्या काकडीसारखी भासली. तिच्यात कल्याणीसारखे घायाळ करणारे आवाहन नव्हते. च्यायला, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपण ही "जी, जी" करत @$#@$#@$#@$#@$#!!
कल्याणीचा गेले दोन दिवस नवीनच सूर लागला होता. "लौकर काय ते ठरव. मला फार थांबता येणार नाही. बाबा माझं लग्न करून द्यायला निघालेत. त्यांना आत्तापर्यंत हे ना ते सांगून थांबवलं. पण आता थांबवता येणार नाही. त्यांनी तर त्यांच्या बाजूने एक मुलगा पक्कासुद्धा करून टाकलाय" असे म्हणून तिने जे नाव घेतले, ते ऐकून विजयसिंहजीराजेसाहेब संतापाने हिरवे-पिवळे झाले. त्यांच्या घराण्याचे पिढीजात दुश्मन असलेले ते घराणे. निष्ठेने विरोधी पक्षात टिकून त्यांनी पार खासदारकीपर्यंत मजल मारली होती, मग ती राज्यसभेतली का असेना. ते घराणे म्हणजे अण्णांच्या उरातला सलणारा काटा होता. आणि त्या घराण्यातल्या संग्रामसिंहराजे नावाच्या.....!
खरेतर ऐकल्या ऐकल्या सुसाट निघून यावे अशी ही बातमी. पण तो दिवस होता नेमका पंचायत समितीच्या निवडणुकांचा. तालुक्यात विजयला पुढे करण्यासाठी अण्णांनी तो मुहूर्त शोधला होता. म्हणजे थांबणे आले. आणि दुसऱ्या दिवशी निकाल. निकालाचे पेढे भरवताना अण्णांना हळूच ही कल्पना द्यावी असा विजयचा विचार होता. पण निकालाचे पेढे वाटण्याची संधी त्याला मिळाली नाही. अण्णांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवून विजयसिंहजीराजेसाहेब साफ आपटले. अगदी डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. आणि अण्णांनी त्यांच्या प्रेमयुक्त जरबेच्या सुरात निवडक ज्येष्ठ लोकांकडे विचारणा केली, तर "अण्णासाब, तुमी राजकारणात हाईसा, आनिक आमास्नी दिसरात नदरंस पडतासा. बाळराजांच्या गाडीची तीन टायरं कायमची पुन्यात आनिक येकच हितं. मग जंतेनं त्यांना तुमचा वारस म्हनून कसं वो मानायचं? आनिक झालंच तर तुमी चारित्राकडून येकदम शुद्द. बाळराजंबी असत्याल शुद्दच, पन लोकं कायबाय बोलाय लागलं, पुन्यात त्यांचं असं न्हाय तसं हाय म्हनाय लागलं, त्यानं बिथारली बगा जनता" असे सरळसोट उत्तर आले. अण्णांना जिल्ह्याच्या हॉस्पिटलात दाखल करावे लागले. आता त्या गडबडीत कल्याणीचे दहा मिस कॉल येऊन गेले, पण घेणार कसे? शेवटी डॉक्टरांनी "आता धोका नाही" असे जाहीर केल्यावर अखेर त्याने पजेरो सुसाटवली.
आतापर्यंत तिच्या सहवासात काढलेले वेगवेगळ्या लॉजमधले दिवस (रात्री ती कधीच त्याच्याबरोबर राहिली नाही), आणि तिची ती वेगवेगळी जीवघेणी तंत्रे..... छे! राजकारण गेलं @#@त! अण्णांनी पुरेसं कमवून ठेवलं आहेच.... फक्त हिच्याशी लग्न करावे आणि आयुष्यभर... विचारांनीच त्याची कानशिले तापली. पँटच्या खिशात ठेवलेला चांदीचा चपटा फ्लास्क त्याने काढला आणि त्यातील शिवास रीगलची रेशमी धार गळ्याखाली उतरवली. खरेतर कल्याणीबरोबर याची लज्जत शतगुणित होई. पण आज त्याला अगदीच राहवेना. आणि मागे बॅगेत दोन फुल पडलेल्या होत्याच. हळूहळू त्याच्या रक्तातून आसक्ती वाहू लागली.
कल्याणीच्या घरी तो आत्तापर्यंत केव्हाच गेला नव्हता. काही ना काही कारण काढून तिने ते टाळले होते. एकदा केव्हातरी पत्ता तेवढा अतीव नाइलाजाने सांगितला होता. पुण्याच्या एका प्रतिष्ठित मध्यमवर्गीय वस्तीतला तो पत्ता होता.
तिथे गेल्यावर त्याला "या नावाची मुलगी, स्त्री वा वृद्धा इथे राहत नव्हती, आणि नाही" असे सडेतोड उत्तर मिळाले. उत्तर देणारा विजयच्या तोंडाकडे रोखून बघून नाक वाकडे करायला विसरला नाही.
त्याला आपण जिवंत आहोत की नाही हेच क्षणभर विसरायला झाले. तिला फोन केला तर तिने चक्क कट केला. आणि त्यानंतर तो स्विच ऑफ असल्याचा संदेश येऊ लागला. साली @#@# गेली की काय त्या संग्रामच्या पुढ्यात पालथी पडायला? वासना आणि संताप यांच्या मिश्रणाने त्याला सरळ दिसेनासे झाले. त्याने सरळ प्रतापला फोन लावला. प्रताप हा त्याचा पुण्यातला, सर्व भानगडी निस्तरायची क्षमता असलेला विश्वासू साथीदार. तो इथेच राहून महापालिकेत जाण्याच्या तयारीत कुसाळकर पुतळ्याजवळ कार्यालय थाटून बसला होता. त्याच्याकडे कुठल्याही प्रसंगी हातपाय तडफेने हलवू शकतील अशा साथीदारांचा अखंडित पुरवठा असे.
प्रतापने एका नवीन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे काम करायला घेतले होते. शंभर ठिकाणांहून हजार परवानग्या आणता आणता त्याला फेसाटायला झाले होते. आणि एवढे सगळे होऊनही गोष्टी पहिल्या घरातून पुढे सरकल्याच नव्हत्या. कुठूनतरी एखादा दणकट बांबू लावल्याखेरीज हे बाबूलोक जागचे हालणार नव्हते, नि अशा बांबूच्या शोधात प्रताप वणवण करीत होता. आत्ता तो दिवसभराचे काम संपवून घरी जाण्याच्या बेतात होता. आज मंगळवार होता, नि बच्चूजी महाराजांनी सांगितल्यापासून प्रताप कडक मंगळवार करू लागला होता. दारू नाही, मटण नाही नि बाई नाही.
प्रतापने लगेच येण्याचे कबूल केले. गाडी अजून जरा बाजूला घेऊन विजयने काळ्या काचा वर केल्या, आणि फ्लास्कच्या तुटपुंज्या पुरवठ्यावर अवलंबून न राहता थेट मागच्या सीटवरून एक खंबाच काढला. शिवास रीगलला पाणी-सोडा-चकणा लागत नाही हे त्याचे लाडके मत होते.
=====
दिवसभराचे फिरणे झाले तरी मास्तरांना ते कमीच पडले. आडिवऱ्याला बोल बोल म्हणता मैलोन मैल तुडवायची सवय, इथे रस्ते माहीत नसल्याने सगळीकडे बसने हिंडावे लागले. आणि बसस्टॉपवर उभे राहूनच पाय जास्त दुखायला लागले. तुळशीबाग, बेलबाग करून ते परतले तेव्हा सूर्यास्त जेमतेम होत होता.
"ऐकलेस गो? जरा येऊ या काय चार पावले टाकून? दिवसभर चालणे असे झाले नाही, जरा जडसे वाटते आहे" मास्तरांनी प्रस्तावना केली. नंदिनीने अलगद हुंकार दिला. मास्तर एकभुक्तच होते. नंदिनीलाही भूक अशी नव्हती. तिने कोपऱ्यावरच्या कुठल्यातरी हाटेलात मँगो मिल्क शेक घेतला. एक तर त्यावर ठेवलेला तो चेरी नावाचा प्रकार तिला रुचला नाही. आणि एकंदर चव घेतल्यावर तिने तिचे इवलेसे नाक मुरडून घेतले. "मरीमर साय घातल्ये फेटून..... नि साखर..... कचकचतेय दातांखाली..... आणि आंबा मात्र तोतापुरी! ". पैसे दिले आहेत या शुद्ध भावनेने तिने तो मोठाला पेला संपवला आणि दोघेही निघाले.
=====
प्रतापचा एवढ्याएवढ्यात गेम होताना वाचला होता. त्यामुळे प्रताप आला तो मारुती व्हॅनमधून, आणि दणकट माणसे बाजूंना बसवून. पजेरोत शिरल्यावर त्याला अंदाज आला, की प्रकरण खूपच चिघळले आहे. वासना अनावर झाल्यावर तिची पूर्ती झाली नाही, तर पुरुष जनावराच्या पातळीवर उतरायला वेळ लागत नाही हे प्रतापला माहीत होते. तो काही नंपुसक नव्हता की आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेऊन बसला नव्हता. प्रेम वगैरे गोष्टी भरल्यापोटी चघळायला बऱ्या असतात, पण नर-मादी या पातळीवर जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा त्याला एकच सनातन उपाय असतो हे त्याला पक्के कळले होते.
त्यामुळे वासना आणि मद्य यांनी तरबत्तर झालेल्या विजयला त्याने तत्परतेने रेश्मा आणि झीनत हे दोन पर्याय सुचवले. तो स्वतः त्या दोघींकडे जात असला, तरी त्यांच्यावर मालकीहक्क स्थापित करण्याचा मूर्खपणा त्याने केला नव्हता. या बायका मालकीहक्क किमान दुहेरी स्थापन करायला बघतात, आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर आपल्या गळ्यात बांधलेल्या साखळीत होते हे त्याला उमजले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या मित्राला आपण पैशांची मदत करावी वा आपली गाडी देऊ करावी वा आपले मंत्रालयातले काँटॅक्टस देऊ करावेत वा त्याचा गेम होणार असल्याची टीप द्यावी तितक्याच निर्लेपपणे त्याने ही मदत देऊ केली.
विजय एकदमच भडकला. "ओह शिट! केवळ @#$#@ साठी कशाला आलो असतो इथे? " (कल्याणीच्या समोर थिटे पडू नये म्हणून त्याने हा आंग्लाळलेला ब्राह्मणी लहेजा जिभेत भिनवून घेतला होता). "तिकडे गावाकडे काय @#$ नाहीशा झाल्यात काय? अरे, जाऊ देत ना.... तुला नाही कळायचं ते..... अरे नुस्तं @#@#@ नव्हे, ब्राम्हणी पाणी होतं ते, ब्राम्हणी.... तुझ्यासारखा या @#@#@ बायांच्यात नाही मला @#@#@".
प्रताप शांत बसला. बाई, बाटली आणि सिगारेट याबाबतीत जरी कुणी आपल्या ब्रँडला नावे ठेवली तरी त्यावरून गरम होण्यात काही मजा नसते हे त्याला कळले होते.
अचानक विजय ढसढसा रडू लागला. "I want her, dammit, I want her", चिरडीला येऊन त्याने गर्जना केली. आणि वखवखलेल्या नजरेने तो आसपास पाहू लागला. प्रतापने त्याला शांत करायचा प्रयत्न करत विजयच्या गावकडची खबरबात घ्यायला सुरुवात केली.
=====
आडिवऱ्याला लौकरच निवासी शाळा सुरू करावी असे नंदिनीचे आग्रही मत होते. मास्तरांना तो पैशांचा अपव्यय वाटत होता असे नव्हे, पण एकंदरीतच हातरूण पाहून पाय पसरावे असे त्यांचे आग्रही मत होते. निवासी शाळेचे खटले आपल्याला निभावणार नाही असे त्यांना मनापासून वाटत होते. स्वतःचे झालेले वय हा त्यातला एक मुद्दा होताच.
नंदिनीचा 'सावध ऐका पुढल्या हाका' असा आग्रह होता. गेल्या दशकभरात झपाट्याने झालेल्या बदलांबद्दल तिने वाचले होते. त्यातले काही तिने मुंबईत पाहिले होते. पुण्यामध्ये "ओंध", "बनेर", "सिंघड", "एफ सी कॉलिज रोड" अशी भाषा बोलत हिंडणारी आणि आपण सगळे भूमंडळ विकत घेतल्याच्या थाटात वावरणारी मंडळी ती पाहत होती. या सगळ्यात माझे आडिवऱ्याच्या पाटवाड्यातले साहिल घडशी नि राहुल कांबळे कुठे बसतील असा ती विचार करू लागली होती. घरी दर सायंकाळी दारूमाडी खाऊन लास झालेला नि कवटपोळीत मीठ कमी पडले म्हणून आयशीला झोडपणारा बाप असताना त्यांनी कसा विज्ञान प्रकल्प करावा नि कशी चंद्र उगवण्याच्या वेळांची प्रत्यक्ष निरिक्षणे घेऊन त्यातले बावन्न मिनिटांचे अंतर मोजावे? त्यांच्यासाठी निवासी शाळाच हवी. नाहीतर कोकण पहिल्यासारखे रामागडी पुरवठा केंद्र एवढे आणि एवढेच राहिले असते.
बोलता बोलता तिच्या लक्षात आले की त्या गल्लीतल्या रस्त्यावरचे दिवे चालू नव्हते. आडिवऱ्याला नि रत्नागिरीला राहिल्याने तिला लोडशेडिंग नावाच्या राक्षसाची चांगलीच जानपछान झालेली होती. पण इथे वेगळेच काहीतरी दिसत होते. घराघरांत दिवे दिसत होते, फक्त रस्त्यावरचे दिवे गायब होते.
मास्तर रातांधळे असे नव्हते, पण अंधारात त्यांना जरा सामधामीच दिसे. त्यांना उगाच कुठे ठेचकळायला होईल म्हणून परत फिरण्याचा तिने विचार केला. मास्तर बोलण्याच्या तंद्रीत हात पाठीमागे गुंतवून हळूहळू चालत होते. तिचा विचार शब्दांत उतरेपर्यंत ते त्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या वाहनावर धडकलेच. त्यांच्या अस्फुट किंकाळीने त्या वाहनाचा दरवाजा सर्रकन उघडला आणि आतून "दिखता नही है का मा@@@? " अशी आरोळी गरजली.
=====
गेम होताहोता वाचल्यापासून प्रताप माणसे बरोबर ठेवून हिंडू लागला होता. त्यात किमान दोन तरी बिहारी असावेत असा त्याच्या राजकारणातल्या गुरूंनी आग्रह धरला होता. "मराठी मानसं बोलाला ठीक असतेत.... गरज पडेल तर कट्टा काडून गेम वाजवाला भिहारीच पायजेत. त्येंना फुडं काय असा इचार नस्तो. समदी भिहारीच भरली तर भासेचा प्रॉब्लेम करतेत म्हनून येकदोन मराठे ठिवून दी" असा त्यांचा शब्दशः सल्ला होता. तो पाळून प्रतापने चंडी आणि शक्ती (अनुक्रमे चंडीप्रतापसिंह आणि शक्तीप्रतापसिंह) असे दोन तिखट बिहारी पाळले होते. कुणीही आडवा जाण्याची शक्यता दिसली की आधी त्याची आयमाय काढून मगच पुढची चौकशी करण्याची त्यांची पद्धत इथे परिणामकारक ठरली होती. हिंदीत शिवीगाळ करायला घेतली की बहुतेक माणसे शेपूट घालतात हा महाराष्ट्रभर चालत आलेला पायंडा चांगलाच फळाला आला होता.
गाडीवर थेट कुणीतरी धडकल्याचा आवाज ऐकून चंडीचे डोके चटकन सरकले. त्याने व्हॅनचा दरवाजा सर्रकन उघडून "दिखता नही है का मा@@@? " अशी आरोळी गरजवली. आणि समोर दिसलेल्या देहाला उसळी मारून कवेत घेतले. तो देह एका म्हाताऱ्याचा आहे हे जाणवेपर्यंत सवयीने चंडीने त्या देहाला व्हॅनच्या आतमध्ये खेचून दोन सणसणीत कानफटात वाजवल्या.
हळूहळू पहाट-प्रकाश उजळू लागला होता. त्याच्या आणि फलाटावरच्या मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या उजेडात सर्व आसमंत केविलवाणे दिसत होते. कडाक्याच्या थंडीमुळे सर्व चिडीचूप झाले होते. जिन्याखालची म्हातारी कुडकुडत जीवन-मृत्यूच्या सीमारेषेला भोज्जासारखे शिवून परत येत होती. तिचा जिवट आणि चिवट जीव जाता जात नव्हता, आणि त्यामुळे "या शहरात थंडीमुळे कुणीही मृत झालेले नाही" हे जिल्हाधिकाऱ्यांनी दारिद्र्य-निर्मूलन मंत्रालयाला पाठवलेले उत्तर अजून तरी खरे होते. त्या म्हातारीला स्वप्नात तिला तिने बालपणी आणि तरुणपणी पांघरलेल्या-नेसलेल्या अनेकविध ऊबदार वस्त्र-प्रावरणांची माळ गुरफटून टाकत होती, आणि त्या समजुतीच्या खेळातील समजुतीची ऊब तिला या काळ्या थंडीतही टिकून रहायला जवळजवळ पुरत होती.
=====
शेवईवाद (Pastafarism किंवा Flying Spaghetti Monsterism)
मला ह्या पंथाविषयी येथे माहिती देताना आत्यंतिक आनंद होत आहे. हा आनंद शब्दबद्ध करणे खूपच अवघड आहे. ह्या पंथाचा अनुयायी बनल्यानंतर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. सर्व गोष्टींचा एकदम कायापालट झाला आहे. गेले कित्येक दिवस मला 'कोऽहम्' हा प्रश्न सतावत होता. ह्या प्रश्नाचे उत्तर मला आता हळू हळू मिळू लागले आहे. मला येणारा अनुभवदेखील शब्दबद्ध करणे अवघड आहे. पण एक छोटासा प्रयत्न म्हणून इथे ह्या पंथाविषयी थोडे लिहू इच्छितो.
मनोगत वर माझा हा पहिलाच लेख असल्याने चूकभूल द्यावी घ्यावी........
आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असूनसुद्धा आपल्याला माहीत नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पाहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहीत होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "नीळकंठेश्वर".
नमस्कार,
आपल्या सर्वांची भाषा मराठी आहे. मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून विचार करावा. आजच्या मान्यवरांना 'शुद्धलेखनाच्या नियमांचा विचार' असा रितीने करता येत नाही. संस्कृत व इंग्रजीपेक्षा, मराठी भाषा कशी व कोठे भिन्न आहे आणि आजच्या मराठीसाठी 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे दाखवून देणारे पुस्तक सर्वांना ईमेलने मोफत पाठवत आहे. ईमेलने पाठवता येणारे मराठीतील शुद्धलेखनाबाबतचे हे पहिलेच पुस्तक ठरते.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरिता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रु.द्यावे लागतील. जर कॅश ऑन डिलिवरी पाहिजे असेल आणखी २० रु. म्हणजे एकूण २९५ रु. मी विचारले 'असे तुम्ही जाहिरातीत का नाही लिहिले?' मला काही उत्तर नाही मिळाले. तिने पत्ता विचारला तेवढ्यात फोन बंद झाला. तरी दुसर्या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला तेव्हा मी ती नोंदणी नक्की केली.
आता मंगळवारी घरी तो संच पोहोचवण्यात आला. कार्यालयातून घरी आल्यावर पाहिले ते पाकीट. ह्या टाईम्स वाल्यांचे CD पाठवणे मला आवडते. चांगली बांधणी असते सामानाची. उघडून पाहिले तर दोन ऑडियो सीडी व एक व्हिडिओ सीडी प्लॅस्टिक मध्ये घालून तीन कप्प्यात लावून दिल्या आहेत. ह्म्म.. थोडा हिरमोड झाला, कारण टाईम्स वरील विश्वास पूर्ण सार्थ नाही झाला. जाऊ द्या, आज काल पैसे वाचवण्याकरिता सर्वच कंपन्या काही ना काही करत आहेत.
तर काय काय आहे ह्या संचामध्ये?
सुरुवातीला कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाणपत्र दिले आहे. पुढील पानावर कुसुमाग्रजांबद्दल गुलजार ह्यांचे शब्द, कुसुमाग्रजांना मिळालेले पद्मभूषण सन्मानपात्र आणि सर्वांत आत सीडी.
सीडी १ कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात. |
सीडी २ कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात. |
---|---|
१. प्रस्तावना २. मराठी माती ३. थेंब ४. पृथ्वीचे प्रेमगीत ५. पाऊल चिन्हे ६. जा जरा पूर्वेकडे ७. मार्ग ८. कोलंबसाचे गर्वगीत ९. नाते १०. याचक ११. नाही (काही बोलायचे आहे..) १२. तृणाचे पाते १३. स्वप्नाची समाप्ती १४. यौवन १५. अहि-नकुल १६. हा चंद्र १७. म्हातारा म्हणतोय १८. कोकिळा १९. राजहंस माझा २०. वार्ता २१. काही छोट्या कविता देणं डाव छंद यमक दुष्काळी |
१. मुलांसाठी कविता |
ट्रकवाले हा तसा जगाने वाळीत टाकलेला विषय. पण का कोण जाणे मला दिवस दिवस रस्त्यावर प्रवास करणाऱ्या ह्या लोकांविषयी कुतूहल वाटत आलंय. सुदैवाने मला ह्यांचं आयुष्य जवळून बघायची संधी मिळाली. कधी काळी माझा आणि ह्यांचा संबंध येईल आणि त्यांच्यावर मी चक्क एक लेख लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण संबंध आला आणि आता मी लेखही लिहितोय.
दारुडे, बेजबाबदार पणे सुसाट गाड्या हाकणारे, दिवसचे दिवस घरापासून दूर राहणारे, शरीराची गरज भागवण्या साठी वेश्यांकडे जाऊन पाठीशी रोग लावून घेणारे, अशिक्षित, मॅनरलेस, गलिच्छ. अशी बरीच विशेषणं त्यांच्या फार जवळ न जाता जगाने त्यांना चिकटवली आहेत.
जुन्या मुंबई पुणे महामार्गा सारखाच मुंबई - अहमदाबाद हा सुद्धा माझा अतिशय आवडता रस्ता आहे. रात्री अपरात्री, धो-धो पावसात, टळटळीत दुपारी, अशा प्रत्येक वेळी मी इथे गेलोय. आणि दर वेळी वेगवेगळ्या लोकांना भेटलोय. असंच एकदा हौस म्हणून बाइक वरून मुंबई - अहमदाबाद महामार्गावर फिरता फिरता मला विरारच्या पुढे साधारण १०-१५ किलोमीटर वर एक ढाबा दिसला. आज काल कुत्राच्या छत्र्यांप्रमाणे महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांसारखा हा 5 Star AC ढाबा नव्हता. साध्या सरळ मध्यमवर्गीय माणसा प्रमाणे संस्कृतीशी इमान राखून असणारा ढाबा होता.
समोर गाड्या पार्क करायला मोकळी जागा आणि आत मध्ये साधारण २५-३० माणसं बसू शकतील इतका हॉल, त्या पलीकडे किचन असा आटोपशीर पसारा होता. पावसाळा सोडल्यास बाकीचे दिवस बाहेर खाटाही टाकलेल्या असत. तिथे अजूनही खऱ्या तंदुरी मध्ये जेवण बनवलं जातं. विजेवर चालणाऱ्या तंदुरीत नाही. त्यामुळे पराठ्यानं शुद्ध तुपासोबतच कोळशाचा रांगडा स्वादही येतो. लस्सी अजूनही हाताने घुसळूनच बनवली जाते. अगदी ऑथेंटीक ढाबा.
मला भेटलेला पाहिला ट्रक वाला म्हणजे अर्जुन. जुलै महिन्यात एके रात्री प्रचंड पाऊस पडत असताना मी साधारण २ च्या सुमारास ढाब्यावर पोचलो. ढाब्या समोरच्या मोकळ्या जागेत पावसामुळे लहानसं तळं तयार झालं होतं. मी नेहमी प्रमाणे अगदी दरवाज्या पाशी जाऊन बाइक पार्क केली. बाजूच्या रामचंदर पान वाल्याला हात दाखवला. हा पान वाला २४ तास सुरू असतो. सकाळी भाऊ बसतो आणि रात्री हा. त्या दिवशी पाऊस जरा जास्तच जोरात पडत असल्याने ढाब्यावर बरीच गर्दी होती. आत शिरण्या इतकीही जागा नव्हती. लोकं (ट्रक वाले) वाफाळता चहा पीत पीत पाऊस कमी होण्याची वाट बघत होती. आता पर्यंत बऱ्याच वेळा तिथे गेल्याने ढाब्याचा मॅनेजर 'परी' माझ्या चांगला ओळखीचा झाला होता.
आता काय करावं ह्या विचारात असतानाच परी एका हातात छत्री नि दुसऱ्या हातात चहाचे तीन ग्लास घेऊन आला नि म्हणाला चल. कुठे, कशासाठी, वगैरे न विचारता त्याच्या मागून गेलो. तो एका ट्रक पाशी जाऊन थांबला. दार वाजवलं. दार आतून उघडल्या गेलं. ह्याने कप आत दिले, स्वतः चढला आणि मलाही आता यायची खूण केली. आत जाऊन सीट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जुन'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरुंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिलं.'
मी मनात म्हटलं असं नको म्हणू मेल्या, तू इथेच आडवा पडून राहशील. मला ३५-४० किलोमीटर बाइक हाकत जायचंय घरी.
क्या करते हो आप.
मला त्याला ऍड एजन्सी मध्ये कॉपीरायटर म्हणजे काय हे कसं समजवावं हे न सुचल्याने मी म्हणालो 'प्रायवेट कंपनी में हूं'
हं...
हं...
ये ट्रक आपका है?
ह्या वर तो हाहाहा करून हसला.
अगर मेरा ट्रक होता तो और क्या चाहिये था...
बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणे हा सुद्धा दुसऱ्या कुणाचा ट्रक चलवत होता. आणि बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणेच आपल्याही मालकीचा एखादा ट्रक असावा हे त्याचं स्वप्न होतं.
कबसे चला रहे हो ट्रक?
कुछ ६-८ साल हो गये. छोटा था तब पिताजी के साथ घुमता था. वो भी ट्रक चलाते था. बडा होने पर उन्होने अपने मालीक की ट्रांसपोर्ट कंपनी मे लगा लिया. और तबसे घर छूट गया.
आता हा पुढे ट्रक ऍक्सीडंट मध्ये वडील गेले असं सांगतो की काय असं वाटलं. पण सुदैवाने ते जिवंत होते. पण आता वयामुळे असं ट्रक चलवणं जमत नव्हतं. म्हणून त्याच्या वडिलांनी गावातून जाणाऱ्या हायवे वर ट्रकचं गॅरेज काढलं होतं. घरी आई, वडील, बायको आणि एक ३ वर्षाचा मुलगा होता. इतर ट्रक चालवणाऱ्या लोकांप्रमाणे हा सुद्धा आयुष्यावर नि गरिबीवर वैतागलेला असेल असं मला वाटलं. पण हा तर एकदम जॉली माणूस निघाला. त्याने आता रस्ता म्हणजेच आपलं घर हे सत्य स्वीकारला होतं.
तुम ऐसे हमेशा घर से बाहर रहेते हो, बिवी कुछ बोलती नहीं?
पेहले बोलती थी, मगर उसके पिताजी भी ट्रक चलाते थे. सो उसे आदत है. मुझे भी शुरुवात में बहुत याद आती थी घर की. पर अब एहसास भी कुछ धुंधलेसे हो गये है.
आप कहांसे हो?
कहांसे मतलब? यहीं से हुं. जनम बंबई मे ही हुवा है.
मुंबई
हां. अब मुंबई. मगर मेरा जनम हुवा तब वो बंबई ही थी. हा हा हा हा
मी पण हा हा हा हा
मनात विचार आला हा तर साला ओरिजीनल ट्रकवाला नाहीये. ट्रकवाला म्हटलं की उंचा पुरा मध्यमवयीन पंजाबी माणूस, छाती पर्यंत वाढलेली पिकलेली धाढी, डोक्यावर फेटा, असा अवतार डोळ्या समोर येतो.
तेवढ्यात हा बोलला 'वैसे गांव पंजाब में है. पिताजी और मां अब वहीं रेहते है.' मी जरा खुश झालो.
कभी जाते हो उनसे मिलने.
कभी कभी डिलीवरी के लिये गांवसे गुजरता हुं तब मिल लेता हुं.
अर्जुन अशिक्षित असला तरी असंस्कृत नव्हता हे मला त्याच्याशी झालेल्या पुढल्या भेटींतून उलगडत गेलं. हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानेच मला समजावला. हॉर्न (उजवीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (डावीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे उजव्या बाजूने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि डाव्या बाजूने जायचं असेल तर प्लीज जा. हॉर्न ची गरज नाही.
गप्पा मारता मारता त्यानं मला विचारलं लग्न झालंय का? मी नाही म्हणाल्यावर तो एकदम आश्चर्य चकीत झाला. त्याच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती. नि मी त्याच्यापेक्षा मोठा असून अजून एकटाच होतो. नालायक परी ने ही त्याची बाजू घेतली. माझी सुटका करून घेण्यासाठी त्याच्या लग्नाचा विषय काढला.
त्याचा प्रेम विवाह होता. पण बायको मुसलमान होती. तिचे वडील सुद्धा ह्याच्याच ट्रांसपोर्ट कंपनीत ट्रक चालवायचे. त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ह्याची तिच्याशी ओळख झाली. ह्याला ती बघता क्षणीच आवडली. हळू हळू भेटी गाठी वाढत गेल्या नि दोघे प्रेमात पडले. एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा घेऊन झाल्या. एके दिवशी अर्जुन ने घाबरत घाबरत वडिलांसमोर विषय काढला. सांगितलं मला शहीदा आवडते. शांतपणे विचार करून ते म्हणाले 'बेटा, तेरे खुशी में ही हमारी खुशी है. मगर मै रफीक को जानता हुं. वो कभी नही मानेगा.' ह्याने एकदा घरून परवानगी मिळाल्यावर तिला तिच्या वडिलांशी बोलायला सांगितलं. अपेक्षे प्रमाणेच ते भडकले. घरी येऊन हात पाय तोडायच्या धमक्या देऊन गेले.
मग महिना भर शहीदा घरात बंद होती. तिची आई मात्र नशिबाने त्यांच्या पाठीशी होती. तिला हाताशी घेऊन ह्यांनी एक प्लॅन बनवला. दोघांनी ह्याच्या गावाला पळून जाऊन लग्न करायचं. इथलं शांत होई पर्यंत त्याच्या भावाच्या घारी राहायचं. पोटा पाण्या साठी त्याच्या भावाने तिथल्या एका हॉटेल मध्ये ह्याच्या नोकरी विषयी बोलूनही ठेवले. ठरल्या प्रमाणे हे दोघे मध्य रात्री घरून निघाले. पण नशीब आडवं आलं. तिचे वडील त्या दिवशी ड्युटी संपवून लवकर घरी आले नि ह्यांना बघितलं. आरडा ओरडा करून मोहोल्ल्यामधली माणसं जमवली नि ह्याला बेदम मारलं.
पोटच्या पोराची ही अवस्था बघून ह्याच्या वडिलांचं पंजाबी खून सळसळून उठलं. रफीकच्या घरी जाऊन त्याला 'दिन दहाडे तेरी बेटी को तेरे आखोंके सामने ले जाउंगा, जो उखाडना है वो उखाडले' असं सांगून आले. नि अर्जुन बरा झाल्यावर खरंच एके दिवशी त्याच्या घरी ६ ट्रक भरून माणसं घेऊन गेले. निघण्यापूर्वी शहीदाला विचारलं 'बेटा, तुझे इस शादी से कोइ ऐतराज तो नहीं. ' ती नाही म्हणाल्यावर दोघांना घेऊन तडक रजिस्ट्रार ऑफिस गाठलं नि लग्न लावूनच परत आणलं. माणसं जमवणं, पोलिसांना पूर्व सूचना देणं, रजिस्ट्रार ऑफिस मध्ये तारीख घेणं ह्या सगळ्या तयाऱ्या त्याच्या वडिलांनी आधीच केल्या होत्या. भारी माणूस.
त्या नंतर तिच्या वडिलांनी तिच्याशी बोलणंच टाकलं. आई मधून मधून दर्ग्यात भेटायची. वडीलही मुलीच्या भेटीसाठी मनातल्या मनात झुरत होते. तिला ह्या काफिरांच्या घरी त्रास होऊ नये म्हणून अल्लाला साकडं घालायचे. पण सरळ बोलायला इगो आड येत होता. तोही एके दिवशी गळून पडला. शहीदाला ६ वा महिना चालू असताना ती एकदा दर्ग्यात गेली होती. बाहेर पडताना समोरून तिचे वडील आले. तिला तसं बघून ते क्षणभर थांबले नि मग तिला एकदम मिठी मारून मनाचा बांध फुटल्या सारखे रडायला लागले. अश्रूंसोबत मनातली जळमटंही वाहून गेली.
थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि मी घरी जायला निघालो. तर हा म्हणाला 'अब इतनी रात गये कहां घर जा रहे हो? यहीं सो जाओ ट्रक में. पिछे कंबल डाल के देता हुं. चाहो तो यहां बाकडे पे सो जाओ' मी म्हटलं 'रात का डर नही भाई. रात अपनी सहेली है. फिर मिलेंगे.'
क्रमशः