वादळभूमी ४. ०

      ओरिसातलं कोणार्कचं सूर्य मंदिर पाहून झाल्यावर पाहण्यासारखं उरलं होतं ते चिल्का सरोवर. चिल्का सरोवर आणि कोणार्क ही दोन्ही ठिकाणं पुरीपासून साधारणतः सारख्याच अंतरावर आहेत त्यामुळे पुरीचा मुक्काम बराच सोयीचा पडतो. कोणार्कचं मंदिर तर पाहून झालं होतं त्यामुळे चिल्का सरोवर पाहून ओरिसाचा निरोप घेण्याचा मनोदय (किंवा मानस) होता. तत्पूर्वी जगन्नाथ पुरीच्या मंदिराला आम्ही भेट दिली आणि मला जरी एवढं आवडलं नसलं तरी जनहितार्थ ( ) थोडी माहिती देणे आवश्यक आहे.
         पुरीच्या सुदर्शन पटनाईक यांच्या वाळूच्या शिल्पांचे फोटो पेपरात बऱ्याच जणांनी पाहिले असतील शिवाय जगन्नाथ पुरीची यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. हे देवस्थान संस्थानी मालमत्तेत तिरुपती पेक्षाही श्रीमंत आहे बहुधा! या मंदिराचं अध्यात्मिक महात्म्य असलं तरी पाहण्यासारखं काही खास तेथे काहीच नाही त्यामुळे ते बघायला आमच्यातलं कुणी फारसं उत्सुक नव्हतं, तरी बरोबरच्या दोन आजीबाईंचे चेहरे मात्र खास उजळले होते . आख्ख्या भारतवर्षातलं एक पॉवरबाज तीर्थक्षेत्र पाहायला त्या खूपच उत्सुक होत्या.
               एवढं महात्म्य असूनही काटेकोर सुरक्षा भारतातल्या मंदिरांना का लागते हा एक अगम्य प्रश्न आहे. पुरीचं देखील तसंच आहे. मंदिर परिसरात वाहनं बिलकूल चालत नाहीत आणि साहजिकच वाहनतळ खूप लांब आहे. त्यामुळे सायकल-रिक्षा वाल्यांच्या पोटापाण्याची योग्य सोय झाली आहे. (जिवंत अनुभव काय असतो ते त्यादिवशीच कळलं.) कॅमेरा, मोबाईल बिबाईल मंदिरात नेण्यास परवानगी नाही आणि मग चपला वगैरे काढून आपण गर्दीत घुसतो. आत गेल्यावर दिसणारं दृश्य बुचकळ्यात (किंवा दुग्ध्यात) पाडणारं असलं तरी प्रेक्षणीय आहे. दोन्ही बाजूला बरेच भटजी लोक बसलेले दिसतात आणि त्यांच्या पुढ्यात बरीच मडकी असतात. काही मडक्यांमध्ये भात आणि काही मडक्यात घट्ट शिजवलेली डाळ दिसते आणि ह्यातली डाळ त्याच्यात, त्यातला भात याच्यात असा उद्योग सुरु असतो. नुसत्या हाताने घासून ओरपून मडकी रिकामी करणे आणि भक्तगणांना नैवेद्य (म्हणजे देवाला दाखवण्यासाठी! बाकी भक्तगणांना नैवैद्य द्यायला कोण बसलंय?) विकण्याचा व्यापार उदीम सुरु असतो. आपण मात्र त्याकडे लक्ष न देता पुढे जावे हेच उत्तम. पुढे गेल्यावर दारात दुसरे भटजीबुवा उभे असतात आणि आपण आत जाऊ लागताच नाठाळच्या माथी हाणल्यासारखी काठी डोक्यात हाणतात. आपलं पूर्वीचं पाप धुतलं जाऊन पापपुण्याच्या नव्या कोऱ्या वहीसह आपण देवदर्शनाला जावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. इथे काही भक्तगण मग त्यांच्या हातात काही धातू वा कागदाचे तुकडे ठेवताना दिसतात पण आपण तसे करु नये. त्यामुळे भटजीबुवा थोडे डोळे वटारुन बघतात पण थोडा निगरगट्टपणा दाखवावा.
            खरंतर इथपर्यंतच मला लिहता येईल कारण इथून पुढे मी गेलोच नाही. गर्दी बरीच होती आणि मला स्वतःला घुसमट होणाऱ्या, कोंदट हवेच्या जागा बिलकूल आवडत नाहीत. मात्र आतल्या कृष्ण, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती  दोन्ही आजींना पाहायच्याच असल्याने बाकीचे लोक पुढे गेले. थोड्याच वेळात लोकांचे एकदम  हा हू वगैरे आवाज ऐकू यायला लागले. तेव्हा मधूनच देवाच्या गाभाऱ्याची दारं बंद करतात आणि मग परत उघडताना भक्तगण अत्यानंदाने असे आवाज करतात हे नंतर विश्चसनीय सूत्रांकडून समजलं.
         शेवटी मग मडकेबाजाराजवळ परत आलो. आमची हरवलेली, विसरलेली माणसं गोळा करून निघालो तर एक भटजीबुवा एक भक्ताशी हुज्जत घालत होते. पुरीला पितरांची शांती करवाओ, भोग चढाओ वगैरे बरेच प्रकार चालतात आणि त्यामुळेच काहीतरी पैशांवरुन भांडण पेटले होते. बाकी ओरिसातले भटजी हे देशभरातल्या भटजींसारखेच असले तरी भरभक्कम पोटाचे, मुखरसाचा तोबरा सांभाळणारे आणि मंदिरात उदबत्त्यांबरोबरच विड्यांचा धूर पैदा करणारे या तीन प्रकारात सर्व जण बसायला हरकत नसावी.
         थोडक्यात काय तर पुरीचं मंदीर बघून लवकरच बाहेर आलो आणि क्षुधाशांती करायला हॉटेल गाठून पुरीभाजीची ऑर्डर दिली. राहता राहिलं चिल्का सरोवर! ते दुसऱ्या दिवसावर ढकलण्याबाबत एकमत झाले आणि हॉटेलची वाट पकडली.

 
     
          दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर चिल्काला निघालो तेव्हा भलतंच उत्साही वाटत होतं. अर्थात थंड हिरव्यागार रस्त्याचा हा परिणाम होता का, गाडीवानाने आग्रहाखातर लावलेल्या उडीया गाण्यांचा होता हे सांगणे अवघड आहे. चिल्काकडे जाणाऱ्या रस्त्याला आपल्यासारखीच शेतं दिसतात मात्र ती पाण्याने भरलेली असतात आणि त्यात धनधान्याऐवजी माशांचे भरघोस पीक येत असावे. याचं कारण अगदी उघड होतं कारण पाण्यातूनच गेलेल्या विजेच्या तारांवर ( म्हणजे पाण्यात खांब आणि त्यावरून तारा असे वाचावे.) किंगफिशर घोळक्याने बसले होते आणि पाण्यातल्या मत्स्यावतारांचे निरीक्षण आणि भक्षण, आलटूनपालटून चालू होतं.


     
        हा प्रवास माझ्या विशेष लक्षात राहिला आहे कारण मध्येच एखाददुसरं कमळांचं शेत अवतीर्ण होत असे आणि थांबा थांबा अशा आरोळ्या होत. त्या अर्थातच ड्रायव्हरला कळत नसल्याने गाडी तोवर पुढे आलेली असे. या गोंधळातच अजून एक शेत दिसू लागे, मग रोको!रोको! अशा आरोळ्या झाल्याने  ड्रायव्हरला गाडी थांबवावी लागत असे. ओरिसातल्या भरघोस मंदिरांमुळे बक्कळ कमळं  लागत असावीत. पुढे बराच वेळ कंटाळा येईस्तोवर रस्त्याच्या दुतर्फा ही शेतं दिसत होती. मात्र पांढऱ्या, निळ्या, गुलाबी कमळांचे भरगच्च तलाव आणि त्यातच अंघोळ करत असलेले काटक अंगाचे उडीया तरूण, हे दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.


       
                 अशाप्रकारे ही निसर्गशोभा बघत , निसर्गाची अनुभूती घेत, त्याच्याशी तादात्म्य पावत सकाळी आठ वाजता आम्ही चिल्का सरोवराला पोहोचलो. ही बाब विशेष नमूद करण्यासारखी आहे, कारण सगळ्यांचे आवरुन, पुरीवरुन निघून, तिथे आठ वाजता पोहोचण्यास बरेच कष्ट पडले. गेलो तर आम्हीच लकी 'कष्ट''मर' नं.१ असल्याचं लक्षात आलं. सातशे रुपये भरुन दहा लोकांची बोट ठरवली, बोहनी केली आणि चिल्कात उतरलो.


        
                   चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि पक्षीगणांसाठी प्रसिद्ध आहे हे बहुतांनी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं वाक्य खरं आहे. पाणी तर खारट होतं पण पक्ष्यांमधलं मात्र मला ओ की ठो कळत नाही. ( शहरी जीवनात पारव्यांनी बाकीच्या पक्ष्यांना अल्पसंख्यांक करुन टाकलं आहे आणि का कोण जाणे, पारवा दिसताच त्याचा गळा दाबावा असं मला नेहमी वाटतं.) त्यामुळे जलविहाराचाच आनंद अधिक होता.
  

             सरोवराचं किंचीत हिरवी छटा असलेलं निळंशार पाणी मात्र डोळ्यांनीच अनुभवायला हवं. तबियत एकदम खूष होऊन जाते. सरोवरात डॉल्फिन देखील आहेत पण श्वास घ्यायला वर येतात न येतात तोच ते पाण्यात नाहीसे होतात आणि बऱ्याचदा आपण बावळटासारखे पाण्यावरचे तरंग बघत बसतो. (इथे थोडी अजून जनहितार्थ माहिती दिली पाहिजे कारण परदेशातले डॉल्फिन शो बघितलेल्यांची प्रचंड निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोटीत बसण्याआधीच जवळच्या फलकावरचे चित्र नीट पाहून घ्यावे आणि सहलीवरुन आल्यावर पिडणाऱ्यांसाठी छायाचित्र घेऊन ठेवावं.)


         
            असा एक दीड तासाचा प्रवास केला आणि  चिल्का सरोवर जिथं समुद्राला मिळतं तिथे जाऊन उतरलो. येथे एक विस्तीर्ण किनारा आहे आणि चारपाच झावळ्यांची (म्हणजे झावळ्यांनी बांधलेली) दुकाने आहेत. पिणाऱ्यांसाठी फेसाळते द्राव आणि खाणाऱ्यांसाठी ताज्या माशांचे 'मसालेवाईक' नमुने मिळण्याची सोय आहे. नारळाचं पाणी आहे तसेच तुमच्यासमोर उघडलेल्या कालवातले मोती विकत घेण्याची सोय आहे (प्रत्येकी पंचवीस रुपये). (नंतर परतल्यावर एका दुकानात हेच मोती पाच रुपयाला एक या हिशोबाने मिळत होते तोपर्यंत बराच उशीर झाला होता, त्यामुळे आधी मिळालेलेच ताजे आहेत यावर दुसऱ्यांदा एकमत झाले.


                
                असा त्या किनाऱ्यावर दोनएक तास वेळ काढला, थोडं भटकून घेतलं. लवकरच निघायची वेळ झाली. नाखव्याने दोरी ओढली, इंजिन धडाडलं आणि सरोवरात लोटलेलं आमचं डिझेल तारु माघारी निघालं. आमची एकच काय ती बोट परतत होती आणि नव्याने आलेले पर्यटक एखाद्या मोर्च्यासारखे आम्हाला सामोरे येत होते. रणरणत्या उन्हात सगळे डॉल्फिन गायब झाले होते आणि आम्हाला दिसलेली त्यांची काळी कुळकुळीत नाकंसुद्धा या लोकांच्या नशिबी नसल्याने मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होतं.

दोन (अस्सल) अजब-विनोद !!

 (हे सर्व विनोद मी स्वतः लिहीले म्हणजेच अस्सल आहेत. म्हणजे कुठेही वाचलेले किंवा कुणीही सांगितलेले नाहीत. स्वतः विनोद बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न, कसा वाटला ते सांगा!!)

(१) एक सरदार काही कामासाठी बँकेत जातो. फॉर्म भरता भरता त्याला बँकेत एक सूचना लिहीलेली दिसते, " आपली तक्रार या पेटीत टाका." अचानक ते वाचून स्वतःचे काम अर्धवट टाकून तो बाजूच्या दुकानातून एक कोरी वही विकत आणतो आणि त्याच्या एका पानावर लिहीतो, " मला या बँकेविषयी काहीही तक्रार नाही." आणि त्या तक्रार पेटीत टाकतो.

शेवईपंथ: एक वैज्ञानिक दृष्टिक्षेप (उ.शे.रा. आणि मानव: अपवर्तन)

उडणारा शेवईराक्षस आणि मानव: अपवर्तन (Refraction)

या जगातील सर्व गोष्टी या 'उ.शे.रा.'च्याच कृपेने आणि इच्छेने होतात. किंबहुना या ना त्या प्रकारे 'तो'च सर्व गोष्टी करत असतो. तरीही अनेकदा आपल्याला असे दिसते (खरे म्हणजे भासते) की हे सर्व मानव स्वतःच करीत आहे. भौतिकशास्त्राच्या आधारे ह्या सगळ्याचे स्पष्टीकरण करणे सोपे जाते.
अपवर्तनामध्ये प्रकाशकिरण जरी एका दिशेने येत असले तरी ते दुसरीकडूनच येत आहेत असा आभास होतो. तद्वतच ह्या विश्वातील सर्व घडामोडी जरी 'तो'च करीत असला तरी आपल्याला दिसताना दिसते की ह्या सर्व गोष्टी मानव स्वतःच करीत आहे.

वारी १३

वारीच्या बाराव्या भागानंतर बरेच दिवस पुढचा भाग मनोगतवर न दिसल्यामुळे मनोगतीना चुकल्याचुकल्यासारखे वाटत असेल.

वारीचे १० भाग झाल्यावरच बंद करायचे असे मी ठरवले होते, कारण आपल्याकडे दशमान पद्धत आहे ना, पण  अमेरिकेत बारा या संख्येला  एक डझन  म्हणून महत्त्व आहे. या अमेरिकनांच सगळ विचित्रच! जगात इतरत्र जी पद्धत असेल त्याहून काहीतरी वेगळच करायच. बघाना जगात बहुतेक देशात वाहने डाव्या बाजूने चालवतात ( आपल्या देशात ती कोणत्याही बाजूने चालवतात ही गोष्ट वेगळी) तर हे उजवीकडून चालवणार. सगळीकडे मेट्रिक पद्धत सोयिस्कर म्हणून वापरात आली पण यांच मात्र अजून गॅलन, पौंड, ओंसच चालू आहे. सुदैवाने यांच्या डॉलरचे १०० सेंटच होतात त्याला यांचा नाइलाज आहे तरीही गॅस(पक्षी पेट्रोल)ची किंमत लिहिताना एका गॅलनला २ डॉलर ९५ ९/१० सेंटस असे लिहिण्यात यांना काय शहाणपण वाटते कुणास ठाउक. त्यामुळे डझनालाही इथ अजून महत्त्व आहेच अगदी शाळेतल्या मुलांचे पाढेदेखील १२ पर्यंत म्हणजे बे दाही (२x १०) वर न थांबता बे बारे (२ x १२)पर्यंत लिहिण्याची पद्धत मी पाहिली. अर्थात ते पाठ करण्याची पद्धत असेल असे वाटत नाही.
              त्यावेळी अमेरिकेत राहत असल्याने लेखांचा एक डझन झाल्यावर थांबायचे असे ठरवले. दहा भागानंतर थांबलोही असतो. पुढचे दोन भाग कसेबसे ओढून काढले त्यामुळे काही मनोगतींनाही फोडणी कंमी पडली असे वाटू लागले. पण तरीही मनोगतवर लिहायची चटक लागली की ती सुटता सुटत नाही. त्यातही आमची अवस्था पुण्यप्रभावातल्या धुंडिराजासारखी झालेली कुणी ऐकून घेवो न घेवो आपण आपले सांगत सुटायचे.
        प्रस्तावना बरीच लांबली. पण प्रस्तावना लांबवण्याच्या दोषातून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सुटले नाहीत तिथ आमच्यासारख्यांची काय कथा. (बघा मधेमध्ये ज्ञानेश्वरांना घेतले की कसा लेख भारदस्त झाल्यासारखा वाटतो. ) ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वर प्रास्ताविकात आपण कसे  गुरुंच्या हातचे बाहुले आहोत याविषयी  सांगत असताना गुरुच त्यांना
तंव श्रीगुरू म्हणती राही । हे तुज बोलावे न लगे काही ।
आता ग्रंथा चित्त देइ । झडकरी वेगे ॥१. ८३॥
 असे दटावतात तर कधीकधी ज्ञानेश्वरांनाच आपण पाल्हाळ लावतोय याची जाणीव होऊन ते स्वतः च स्वतः स बजावतात
हा असो अतिप्रसंगू । न संडी बा कथालागू ।
होईल श्लोकसंगती भंगू । म्हणोनिया ॥५. ६६॥

किंवा
तू संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी ।
की निराळी बोल देखसी । सनागर ॥५. १४१॥

थोडक्यात पाल्हाळिकपणाचा दोष ज्ञानेश्वरांनाही लागू होतो तेथे कुशाग्राची काय कथा? यावर कोणी म्हणेल अहो ते ज्ञानेश्वर आहेत त्यांची तुमची काय तुलना यावर ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवले आहे,
राजहंसाचे चालणें । भूतळीं जालिया शाहाणे ।
आणिकें काय कोणें । चालावेंचिना ॥१८. १७१२॥

याच थाटात
ज्ञानदेवांचे पाल्हाळ लावणे । वाटते गोड अमृताप्रमाणे ।
म्हणून काय कुशाग्राने । पाल्हाळ लावूच नये?
असे का म्हणू नये, असो! एवढ्या प्रस्तावनेनंतर वारीचा पुढचा भाग.

माझे शिक्षण

MBA करत असताना मी जे काही शिकलो त्याचा मला कधी फायदा होईल तेव्हा होईल पण सध्या तरी त्या आठ्वणी आहेत आणि त्या आठवून मी नेहमी हसत असतो.

माझं कॉलेज ग्रामीण भागात आहे तिथे अपवादाने लेक्चर व्हायची शिकणारी फार थोडी होती आणि शिकवणारे तर असून नसल्यासार्खेच होते. एक प्रसंग आजहि माझ्या डोळ्यासमोर आला की मला हसू येते.

प्राचीन कोकण - एक अनोखे म्युझियम

"सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण,
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन"

कवी माधव यांच्या कवितेतील नंदनवनात वसलेले एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे! कोकण किनारपट्टीवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेले जागृत व स्वयंभू श्री गणेश मंदिर. कोकणातील ३००-४०० वर्षाची परंपरा असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. भारतातील अष्टद्वारदेवतांपैकी हि पश्चिमद्वार देवता. समोर क्षितीजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू, सभोवतीचा हिरवा निसर्ग आणि त्यावर कळस म्हणजे गुलाबी रंगातील सुंदर गणेश मंदिर. अशी रंगांची मुक्तहस्ते उधळण असलेला हा परिसर मला नेहमीच आकर्षित करत असे आणि त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट खुणावत असे ती म्हणजे "प्राचीन कोकण-५०० वर्षापूर्वीचे कोकण" अशी जाहिरात असलेला एक बोर्ड. त्यामुळे ह्या वेळेच्या  गणपतीपुळ्याच्या भेटीत प्राचीन कोकण करायचे असे ठरविले आणि तसा योग लवकरच जुळून आला.

गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत जाताच संस्थेच्या मार्गदर्शकाकडून कोकम सरबत किंवा गुळपाणी देऊन आपले स्वागत होते. प्रत्येकी १५ रुपये इतके नाममात्र शुल्क देऊन आपण गाव पहायला सज्ज होतो.

गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक गुहा लागते. हि गुहा म्हणजे काळाचे प्रतिक असून आपण वर्तमानकाळातून भुतकाळात प्रवेश करतो. प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याकरीता संस्थेचे मार्गदर्शक आपल्या सोबत असतात. गावात आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो.

गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ते "वाघजाई" या ग्रामदेवतेचे मंदिर. वाघजाई देवीबद्दल माहिती देतान सांगीतले कि, ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध मानला जातो. पूर्वीचा कोकण असाच समृद्ध होता. आपल्या पुर्वजांनी निसर्गाला देवत्व बहाल केल्याने ग्रामदेवतेचे नावही निसर्गाशी संबंधित आहे. ग्रामदेवतेचे मंदिराजवळच कोकणचे जनक श्री परशुराम यांची प्रतिकृती आहे. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपण गावात फेरफटका मारण्यासाठी निघतो. पूर्वीच्या बारा बलुतेदार पद्धतीवर आधारलेल्या या गावात आपल्याला प्रथम भेटतो तो एक बलुतेदार - नाभिक. या नाभिकाबद्दल लोकसाहित्यातील एक मजेशीर वर्णन आम्हाला सांगीतले ते असे कि गावातली प्रत्येक गोष्ट हि नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट हि गावभर होते तेव्हा  तुम्ही गाव बघायला आला हि गोष्ट ज्याअर्थी नाभिकाला समजली त्याअर्थी ती सगळ्या गावाला समजेल.

प्रथेप्रमाणे सर्वांत आधी आपण जातो ते खोताच्या घरात. अंगणातच सुपारी कातरत बसलेले खोत आपल्याला दिसतात. माजघरात खोताची बायको उभी आहे. कोकणी स्त्रिया शूर व सुंदर होत्या पन त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठा हि त्यांच्या साठी मर्यादा होती. पडवीत खोतांची दोन मुले परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. खोताच्या घराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. खोताच्या घरातून आपण जातो ते एका शेतकऱ्याच्या घराकडे. पूर्वी बारा बलुतेदार, राजे यांना धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करायचा. शेतकऱ्याच्या घराशेजारीच गोठा आहे. त्याची सर्व अवजारे जसे, नांगर, इरलं, मासे पकडायची खोयणी, कणगी आपल्याला येथे पहायला मिळतात.

अशा प्रकारे गावात फेरफटका मारताना आपल्याला एक एक बलुतेदार भेटत जातो. गणपती सणाला लाल मातीचे गणपती, मातीची भांडी बनविणारा कुंभार, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी बनविणारा सुतार, पाण्यात जाळे टाकून मासे पकडणारा कोळी व त्याची बायको, तेलाच्या घाण्यावरून तेल काढणारा तेली, चर्मकार यांच्या घरांना भेट देत देत आपण पोहचतो ते पाणवठयावर. उंचावरून पडणारे पाणी, मातीचा बांध, पाणी भरणाऱ्या कोकणी स्त्रिया हा सर्व देखावा सुंदर आहे. गावात सर्वात जो उंच पाणवठा असे तेथे बंधारे बांधून ते पाणी प्रत्येक घराकडे नेले जाते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव असे ठिकाण कि जेथे सगळेजण एकत्र येत असे.

प्रत्येक समाजाची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती असते. कोकणी खाद्यसंस्कृती चवीष्ट आहे. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. कोकणी माणसांच्या याच संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू तांदुळ काढण्याचे घिरटं, जातं, कोकणी कूकर म्हणजेच मोदकपात्र, परात येथे पाहवयास मिळतात.

यानंतर आपण पोहचतो ते सगळ्यात उंच भागात. येथे ३० ते ३५ फुट उंच मचाण बांधलेला आहे. त्यावरून आजुबाजुचे विहंगम दृष्य दिसते. निळाशार समुद्र, गावातील नारळीपोफळीच्या बागा, खारफुटीचे जंगल खुपच नयनरम्य दिसते. येथून जवळच जयगड किल्ल्यावर जाणाऱ्या भुयारी मार्गाची प्रतिकृती आहे. संपूर्ण अंधार असलेल्या या गुहेत फेरफटका मारताना आपल्याला जी "व्यक्ती" भेटते हे मी सांगण्यापेक्षा तेथे जाऊन पाहण्यातच खरी मजा आहे.

कोकणात आढळणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या सापांचे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आपणास बघावयास मिळते. गावात फेरफटका मारून तुम्ही दमलात आणि भुक लागली असेल तर इथले "आतिथ्य" रेस्टॉरंट तुमच्या स्वागताला तयार आहे. खास कोकणी पदार्थ म्हणजेच भाजणीचे गरमागरम थालिपीठ, उकडीचे मोदक, फणसाचे सांजण, कोकम/आवळा सरबत यावर यथेच्छ ताव मारता येतो. जर तुम्हाला येथे काही खरेदी करावयाची असेल तर कोकण टुरीझमच्या हस्तकला केंद्रात अनेक गोष्टी आपणास पहायला आणि खरेदी करायला मिळतात. या संस्थेने केवळ ५०० वर्षापूर्वीच्या कोकणसंस्कृतीचे दर्शन देणारे केवळ खेडेच नाही उभारले तर कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्नही चालवीला आहे.


अशा या प्राचीन कोकणीसंस्कृतीचे दर्शन घेत आपण गावच्या वेशीपर्यंत पोहचतो. गावच्या वेशीवर शेंदुर फासून देव ठेवला आहे आणि हाच देव गावचा राखणदार मानला जातो. कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहेत ती जेव्हा गावच्या बाहेर जातात तेव्हा या राखणदाराला नमस्कार करून जातात. या सर्व सफरीमध्ये आपणही या खेड्याचा एक भाग होऊन जातो आणि आपल्या नकळतच आपण या देवाला नमस्कार करून या गावाचा निरोप घेतो.

तो क्षण

सर्वत्र अंधुक प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशाचा रंग कुठला ते पट्कन सांगता आले नसते.

फार तर असे म्हणता आले असते, की निळा, करडा, पारवा आणि जांभळा यापैकी एक रंग श्वेतांबरा प्रेयसीच्या ओठांवर सांवरीच्या कापसाइतका हलका स्पर्श करून गेला असता, तर तिच्या मनात उमटणाऱ्या आनंदलहरींच्या क्षितिजावर जो रंग झळकला असता तो रंग स्फटिकशुभ्र हिम वितळवून केलेल्या पाण्यात बत्तीस वेळेला खळबळून काढला असता तर हा रंग उमटला असता.

ऐकावे ते नवलच - शाकाहारी मासे (!)

ऐकून नवल वाटले ना? पण जर्मनी आणि बऱ्याच युरोपीय, आशिया राष्ट्रात मासे शाकाहारी पदार्थात मोडतात.

याबाबत मी माझ्या एका शाकाहारी जर्मन मित्राबरोबर चर्चा ही केली. त्याचे म्हणणे होते आपण जशी भाताची शेती करतो तशी माशांचीही शेती (मत्स्यशेती) होते की.  त्याला म्हटले, तशी तर कोंबड्यांची, डुकरांचीही होते की.  मासे काही झाडावर येत नाहीत. त्यांना फुले, फळे नि पानेही लागत नाहीत. त्याला माझे म्हणणे पटले.

बाबा रिक्षेवाला

बाबा रिक्षेवाला

मुलीला शाळेत सोडण्याकरता येणाऱ्या बसची वाट बघत आम्ही उभे होतो.
"आई, माझ्याएवढी असताना तू कशी जायचीस शाळेत? माझ्यासारखीच बसने? " मुलीने उत्सुकतेने विचारले.
" आम्हाला रिक्षेवाला यायचा न्यायला. " तिला हे उत्तर देताना माझ्या डोळ्यासमोर बाबा रिक्षेवाल्याचा चेहरा आला.
"ओह, तुम्ही ऑटोरिक्षातून शाळेत जायचा" रिक्शाचे नाव ऐकताच मुलगी म्हणाली. तिने शाळेच्या गणवेशातील मुलांना पुण्यात असताना ऑटोरिक्षाने जाताना पाहिले होते.
''नाही तसे नाही, सायकलरिक्षा.... '. पण सायकलरिक्षा म्हणजे नक्की काय? ते सांगताना माझा आवाज खोल गेला होता.