एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ११ सारांश

ह्या संपूर्ण अनुभवातले काही महत्त्वाचे मुद्दे एका वेगळ्या भागात लिहावेत असे वाटले.... म्हणून हा सारांश लिहिण्याचा खटाटोप.

१. विविध कारणे देवून आमचे टुर २ वेळा एकंदर ५ दिवस पुढे ढकलली.... ह्याने आम्हाला दोघांनाही सुट्टी वाढवून घ्यावी लागली.... आणि ५ दिवसांचा लॉस ऑफ पे भोगावा लागला..... ह्याबद्दल तक्रार केली असता खुद्द मॅनेजर उद्धटपणाने बोलत होता..... क्ष कंपनीचे लोक इतके निगरगट्ट आहेत की त्यांना अशा प्रकारे बोलल्याची आणि आपल्यामुळे इतरांना (ग्राहकाला) त्रास झाल्याबद्दल खेद व्यक्त करावा असेही वाटले नाही....

त्याने मिशा पुसल्या...

त्याने मिशा पुसल्या...

नेहमीप्रमाणे आजही त्याचा डावा सॉक पिंगट होता

झाडाची पानं तशीच सळसळा वाजत होती

फ्रुट सॅलडमध्ये घालायला आजही कवठ मिळालं नाही म्हणून

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग १०

आजचा दिवस आमच्या टुर चा शेवटचा दिवस होता..... आज सकाळीच आम्ही शॉपिंग साठी बाहेर पडलो. सगळं सामान घेउन चेक आउट करा आणि मग जा असे सांगितले होते.... आम्ही चेक आउट केले आणि शॉपिंग साठी बाहेर पडलो. दुपारी त्याच ठरलेल्या जेवणच्या रेस्टॉरंट मध्ये जमायच होतं. १२ वाजता.... ४ च्या विमानाने परत यायच होतं....

संवादाची ऐशी तैशी

तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...!

1. हा...कोन बोल्तय?
- अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू.
---
2. कुठे आहेस?
- मसणात! तुला काय करायचंय? तुझं काम काय आहे, ते बोल ना!
---
3. काय म्हणतोस?

- वयाच्या साधारणपणे वर्षापासून, म्हणजे बोलता यायला लागल्यापासून मी बरंच कायकाय म्हणतोय. त्यापैकी काय काय सांगू?
---
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
- तुझा मुडदा बशिवला! मसण्या, भेटायला वेळ आहे का तुला? कामाशिवाय तोंड उचकटतं का तुझं? समोर दिसलो, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
---
5. काय विशेष?
- डोंबल! आमच्यासारख्या यःकश्‍चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त!
---
6. बाकी काय?
- शून्य. भाज्य आणि भाजक यांचा भागाकार पूर्ण होतोय. बाकी काहीच उरत नाही.
---
7. या की एकदा घरी!
- हो, येतो हां "एकदा' घरी! अरे कंजूषनारायणा, "कधीपण या' म्हण की! "एकदा' या म्हणजे काय? तुझ्या समोरच तर राहतो मी! घरात जोरात शिंकलास, तरी आम्हाला अभिषेक होतो. मग कधीही आलो, तर तुझी इस्टेट कमी होणारेय काय?
---
8. ठेवू का मग?
- प्लीज! अजून किती वेळ पिडशील?
----

भाटमळ वाडी- भाग ३ ( आठवणी आणि मंदिराचा जीर्णोद्धार)

भाटमळ वाडी- भाग ३  ( आठवणी आणि मंदिराचा जीर्णोद्धार)
माझा वाडा .. आता भग्नावस्थेत पडलेल्या शिला पाहिल्या तरी मनातल्या स्मृती जाग्या होतात, मन हळूच मागच्या काळात जातं अन या निर्जीव वस्तूंनाही पुन्हा मनामध्ये संजीवनी मिळते.

मी आणखीन थोडी पावले पुढे टाकली.. जिथे उभी होते तेथेच आमचे अंगण होते.. मी इथेच माझ्या बालपणीतील भातकुलीचे डाव मांडलेले होते, याच अंगणाच्या मध्यभागी तुळशीवृंदावन होते, भराभर सगळी चित्रे डोळ्या समोर फेर धरून तरळत होती आणि तेव्हड्यात सरकण या सगळ्या आठवणींनी डोळ्यात पाणी दाटले अन टचकन डोळ्यात पाण्याच साम्राज्य वाढलं.

आणखी एक मापाचा कूटप्रश्न

अमिबारावांचा "गवळ्याचे माप" हा कूटप्रश्न वाचून पूर्वी वाचलेला एक वेगळा कूटप्रश्न आठवला, तो असा :

१९, १३ व ७ लिटर मापाची प्रत्येकी एक अशा ३ बरण्या आहेत.  पैकी, १३ व ७ लिटरच्या बरण्या पाण्याने पूर्ण भरल्या आहेत व १९ लिटरची बरणी पूर्ण रिकामी आहे. या तीन बरण्यांशिवाय इतर कोणतेही माप न वापरता १९ व १३ लिटरच्या बरण्यांत प्रत्येकी १०, १० लिटर पाणी ठेवायचे आहे. हे कसे करता येईल?

अशी रंगली पाडवा पूर्वसंध्या...."रंग स्वरांचे"च्या माध्यमातून अहमदनगर ला.

परवा ५ एप्रिल रोजी क्रिडासंकुल,अहमदनगर येथे पाडवा पूर्वसंध्येच्या निमित्ताने "स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्" प्रस्तुत् "थर्ड बेल एंटरटेनमेंट" निर्मित "रंग स्वरांचे" ह्या मेगा व्हरायटी एंटरटेनमेंट शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सीमा देशमुख,मधुराणी गोखले - प्रभुलकर हे गायक अभिनेते, महाराष्ट्र संगीत रत्न फेम प्रसेनजीत कोसंबी, ईंडियन आयडॉल फेम सागर सावरकर, सारेगमप फेम आनंदी जोशी,सारेगमप फेम चैतन्य कुलकर्णी,सारेगमप फेम मंगेश बोरगावकर,सारेगमप फेम विजय गटलेवार हे गायक हास्यसम्राट फेम जॉनी रावत, कलाकार पुष्कर श्रोत्री हे हास्यकलाकार, सगळ्या वहिनींचे आवडते भाउजी "आदेश बांदेकर" सतार वादक समीप कुलकर्णी ह्यांच्यासोबत तबला वादक विवेक कोडिलकर आणि निवेदक स्वप्नील रास्ते सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन स्वप्नील रास्ते ह्यांचे होते....

स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग: ५) [सेमीफायनल]

सुनील: तू मला सांगीतले होतेस पीटर की स्टीवन स्पीलबर्ग मला एखादा चांगला रोल देईल, पण तो मला फोनवर म्हणाला की तो आता 'डायनोसोर-मॅन' सिनेमा काढतोय आणि त्यात तो मला घ्यायचे म्हणतोय. म्हणजे मी डायनोसोर मध्ये रुपांतरीत झाल्यावर खरा हिरो डायनोसोर असेल, मी नाहीच... आणि हे तुला सांगायला आलो तर हा काय प्रकार चालू आहे? चावाचावी? हे बरोबर नाही. मी 'बलवान' आहे. या 'पृथ्वी' वर मी तुझी अशी 'हेरा फेरी' खपवून घेणार नाही.

जंगल मे मंगल - २

पूर्वसूत्र : - पहा, " जंगल मे मंगल.

माकडांना पिटाळून लावल्यावर कांही दिवस हत्तींमध्ये साठमारी चालली. पण कुठल्याही परिस्थितीत, जंगलाची सत्ता गमवायची नसल्यामुळे, त्यांनी अखेर आपापसात जुळवून घेतले. माकडे परत सत्तेवर दावा सांगतील या भीतिने त्यांना कोल्ह्यांची व लांडग्यांची मदत घ्यावी लागली.
                 थोड्याच दिवसांत जंगलवासीयांना आपण काय चूक करून ठेवली आहे याचा बोध झाला. पण आता फार उशीर झाला होता. कोल्हे हे मांसाहारीच असल्यामुळे त्यांना शाकाहारी प्राण्यांपेक्षा वखवखलेल्या हिंस्र पशूबद्दल जास्त कळवळा होताच, कारण त्यांचे आस्तित्वच त्यावर अवलंबून होते. हत्तींना मात्र त्यांच्याबद्दल जवळीक वाटण्याचे काहीच कारण नव्हते. पण माणसांनी सोडून जाताना, शाकाहारी व मांसाहारी यांच्यात जी भांडणे लावून दिली होती ती त्यांच्या पथ्यावर पडली होती. ही भांडणे कधीही मिटू न देण्यातच त्यांचे सत्तेवर टिकून राहण्याचे रहस्य दडलेले होते. तशात त्यांना हत्तेरु, हत्तीरा यांच्या परंपरेत अगदी शोभून दिसेल अशी नवी हत्तीण - 'हत्तीया' मिळाली होती. ती जरी दुसऱ्या जंगलातून आली असली तरी  हत्तीराच्या सहवासांत तिने हत्तेरू कळपाच्या एकूणएक चाली व युक्त्या आत्मसात केल्या होत्या. हत्तीसमाजात घराणेशाही ही एक अत्यंत आवडती प्रथा होती व या सगळ्या निकषांवर हत्तीया, ही त्यांना अगदी तारणहार वाटत होती. त्यामुळे हत्तीयाला त्यांनी उस्फूर्तपणे, एक सोंडेने, आपली 'राणी' घोषित केले. नाही म्हणायला काही तुरळक 'महत्वाकांक्षी' हत्तींनी तिला विरोध केला पण बहुमत तिच्या बाजूला आहे हे लक्षांत येताच बंडखोरांचा नेता 'हत्तार' याने लगेच तिच्याशी जुळवून घेतले आणि तिच्याच दरबारात तो मानाच्या जागी झुलू लागला!
               हत्तीया अत्यंत धूर्त व हुशार होती. तिने सर्वांचेच पाणी चांगले जोखले होते. तसेच जंगलातल्या भोळ्याभाबड्या प्राण्यांना कसे मुठीत ठेवायचे यांत ती निष्णात झाली होती. 'हत्तार' व्यतिरिक्त प्रत्येक प्राणीसमूहाचे प्रमुख, सत्तेची लालूच दाखवून तिने आपलेसे केले होते. त्यामुळे अत्यंत लबाड, अस्वले, गेंडे, पाणघोडे व काही जिराफ, झेब्र्यांना तिने मंत्रीपद दिले होते. चारा खाऊन माजलेल्या एका 'वळू'ला सुद्धा या पंगतीत मानाचे स्थान मिळाले होते. स्वतः मात्र, जबाबदारी न घेता, तिने काही सिंहांना उच्चपद देऊ केले होते. 'हत्तुल' या आपल्या लाडक्या बछड्याला पुढे आणण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता. जुन्या परंपरेप्रमाणे सर्व हत्ती या हत्तुलबाळाचे कौतुक करण्यात एकमेकांची स्पर्धा करत होते. हत्तुलला या जंगलाची काहीच माहिती नव्हती, अनुभव तर नव्हताच. तो कुठेही बेतालपणे बडबडत फिरत असे. मग त्यातून होणारा गोंधळ निस्तरण्यासाठी हत्तीसमाजाची तारांबळ उडायची. हत्तीयाने धोरणीपणे हत्तुलला पुढे केले असले तरी तिच्याकडे आणखी एक राखीव पर्याय होताच. पण त्याची एवढ्यात वाच्यता न करण्याइतकी ती हुशार होती.
                 एकंदरीतच, इतक्या वर्षांच्या गैरकारभाराला सरावलेल्या हत्तीसमाजाकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा कशी ठेवणार ? त्यातून काही दाखवण्यापुरते चांगले काम करायचा प्रयत्न केला की कोल्हे त्यांत लगेच कोलदांडा घालायचे. या कोल्ह्यांच्या निष्ठा 'बाहेर' असल्यामुळे त्यांना या जंगलाच्या भवितव्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. किंबहुना एक दिवस बाहेरून कुमक मिळवून या जंगलावर कोल्ह्यांचेच राज्य आणण्याचे त्यांचे मनसुबे होते. समान ध्येय असल्यामुळे कोल्हे व लांडगे एकमेकांना धरून होते तर समान ध्येय असूनही काही वाघांमध्ये 'सवतासुभा' निर्माण झाला होता. "आपणच काय ते खरे व दुसरे ते कागदी" असे दोन्ही गटांना मनापासून वाटत असल्याने निरपराध बोकडांवर हल्ले होत होते. सिंहसंप्रदाय अलीकडे तसा शांत होता. त्यांचाच एक ज्ञातिबांधव उच्चपदी बसल्याने स्वतःचे वेगळे जंगल स्थापण्याच्या त्यांच्या  चळवळी थंडावल्या होत्या.
                माकडे झालेल्या पराभवापासून काहीच शिकली नव्हती. संधीची वाट पाहून व्यूहरचना करण्याऐवजी ती एकमेकांनाच दात विचकून ओचकारत होती. वयोवृद्ध 'कपिराज' तर अगदीच निस्तेज झाले होते. त्यांचा प्रतिस्पर्धी 'हुप्प्या' परत सत्तेची स्वप्ने पाहत बसला होता. अतिनिराशेमुळे काही माकडे हिंसक बनली होती तर काही चक्क मांसाहारी झाली होती.  सामान्य प्राणी भयभीत झाले होते तर हिंस्र प्राणी, रानटी कुत्रे व तरसे खूष होती. दिवसेंदिवस जंगलातले गवत व घनदाट झाडी कमी होऊ लागली होती. लांबच्या वस्तीतल्या माणसांचे लक्ष परत एकदा जंगलाकडे गेले होते. जंगलाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता.पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नव्हते. मूठभर शहाणे प्राणी, याकडे, जंगलवासीयांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचाऱ्या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. अगतिकपणे त्यांनी आपली सर्व भिस्त त्या सर्व शक्तिमान परमेश्वरावर ठेवली होती. आणि म्हणूनच ते आजपर्यंत जिवंत होते!