२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम "सारे तुझ्यात आहे" हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झाला. ह्याचे संगीतकार आहेत आभिजीत राणे आणि गायक आहेत सुप्रसिद्ध देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर.
मला आलेला एक विपत्र-पुढावा (email-forward) ... हा इतिहास मजेदार वाटला म्हणून मनोगतींसाठी खास .. लेखकाचे नाव ठाऊक नाही ......
एप्रिल फूल ही फ्रेंचांची देणगी. फ्रान्समध्ये सुरू झालेली ही मूर्ख बनवण्याची परंपरा पुढे सर्व युरोपमध्ये आणि त्यानंतर जगभरात रुजली. परंतु काही ऐतिहासिक कागदपत्रातून खळबळजनक माहिती उघड झाल्यामुळे फ्रान्समध्येच या परंपरेला आता हादरा बसलाय. पॅरिसला खेटून असलेल्या लिंत्स खेड्यात एक एप्रिल अर्थात एप्रिल फूलचं सेलिब्रेशन दोन एप्रिलला व्हावं, यासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. ते यशस्वी होणार असल्याची चिन्हं असून भारतातही त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
आता तुम्ही मिडीयाविकि मुक्त संगणक प्रणाली विकि पॅकेज सॉफ्टवेअर स्वतःचे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता. त्याच्या मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या (इतर भाषांत)/ भाषांतराचे काम ट्रांस्लेट विकित(बीटाविकि ) होते .मराठीकरणाचे काम बीटाविकित होत आले आहे. सदस्य कौस्तुभ यांनी या सॉफ्टवेअरच्या मराठीकरणात मोठा हातभार लावला आहे, तत्पूर्वी श्री अभय नातू , कोल्हापुरी व माहीतगार या सदस्यांच्या योगदानाचाही लाभ झाला.
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धी गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर अस्तित्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने अस्तित्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहिताना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवयीमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असावेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे. खास करून टवाळ जनांचा. पण म्हणून तर रुक्ष आयुष्यात रंग भरतात आणि ताजेपणा येतो.
आता आपण म्हणाल, हे काय शीर्षक आहे नेमके? पण 'त्या'नंतर माझी मती अशी काही कुंठीत झाली की मला काय शीर्षक द्यावे हे सुचेना. (पुढे कसं आणि काय लिहिले असेल याचा विचार न करता वाचून टाका). 'त्या'नंतर हे वाचून 'कशानंतर' हा प्रश्न पडला असेलच. तर, "१-२-३" हा हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर... ही सुरुवात जर अगदीच सोसो (बकवास!) वाटल्यास तो देखील चित्रपटाचाच परिणाम समजावा
दुसय्रा दिवशी आम्ही बँकॉक ला जाणार होतो..... त्या आधी मॉल ला जायचं होतो....आम्हाला खरेदी साठी एका मॉल मध्ये सोडलं खरेदी साठी.... तिकडे सगळं स्वस्त आहे असं प चं म्हणण होतं..... आणि आम्ही कोरल आयलंड ला ज्या वस्तू घेतल्या होत्या त्याहून ३ पट जास्त किमती होत्या.... परत मॉल ... म्हणजे काहीही बारगेन करता येणार नाही.... तरीही इतर लोकांनी काही वस्तू घेतल्या होत्या...आमचे अंदाज बरोबर होते आणि आम्ही आधीच काही वस्तू घेतल्या होत्या.... ह्या मॉल मधली सकाळ फुकट होती.....
गुरुजींनी टेबलावर ५ टोप्या ठेवल्या होत्या. दोन निळ्या आणि तीन लाल.
मग गुरुजींनी ३ मुलांना पुढे बोलावले. विजय, विलास आणि विनय. त्या तिघांना एका रांगेत एकामागे एक उभे रहायला सांगितले. विजय सर्वात मागे, त्याच्याकडे पाठ करून विलास, आणि विलासकडे पाठ करून विनय. विजयला विनय आणि विलास दिसत होते, विलासला विनय दिसत होता, आणि विनयला कोणीच दिसत नव्हते. मग गुरुजींनी तिघांना डोळे मिटायला सांगितले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक टोपी ठेवली. उरलेल्या दोन टोप्या गुरुजींनी लपवून ठेवल्या. गुरुजींना तिघांना डोळे उघडायला सांगितले. मग गुरुजींनी विचारले: "विजय, तुला ओळखता येईल का तुझ्या डोक्यावर कोणती टोपी आहे?". विजय म्हणाला, "नाही". मग गुरुजींनी विलासला विचारले, "विलास तुला ओळखता येइल का तुझ्या डोक्यावर कोणती टोपी आहे ते?". विलासही "नाही" म्हणाला. पण त्याबरोबर गुरुजींनी विचारायच्या आधीच विनयने त्याच्या डोक्यावर कोणत्या रंगाची टोपी आहे ते बरोबर सांगितले. हे कसे?
गोजिरी...काल केबल वर लागल होता. मन सुन्न करणारा पिक्चर आहे....पिक्चरचा शेवट पाहू शकलो नाही...पण जे काही पाहिल ते मन सुन्न करण्यसाठी पुरेस होत. काही क्शण तर मला विशसच बसला नाही की असाही आजर असू शकतो.....रोज नवीन दिवस.... कालची एकही आठवण नाही..... रोज लहान बहिणिचा वाढदिवस साजरा करायचा..... जणुकाही वर्षातून एकदाच आलाय.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.