पहिल्या भागात मिडियाविकि सॉफ्टवेअर आणि बीटाविकिचा थोडक्यात परिचय दिला. जरी विकिपीडिया संकेतस्थळही मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालते तरी तो उल्लेख मुद्दाम टाळला कारण विकिपीडिया शब्दाची एक विशिष्ट प्रतिमा आहे ती सर्वांना भावतेच असे नाही. आणि मिडियाविकि सॉफ्टवेअर व त्याचे विस्तार, विकिपीडियापेक्षा वेगळ्या तऱ्हेने संकेतस्थळांची रचना करण्याकरिता देखील वापरता येऊ शकते.