गुरुविण कोण दाखविल वाट ?

गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करू शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ती जागृत होते. श्रद्धा बसते. श्रद्धेमध्ये जबरदस्त शक्ती असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करून घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत होत. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदनुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो. शिष्याचे व्यक्तिमत्व बहरले जाते आणि मग नकळत जिज्ञासूंमध्ये चर्चा सुरू होते की,  श्री रामकृष्ण परमहंस मोठे की स्वामी विवेकानंद..................
जनार्दनस्वामी श्रेष्ठ की संत एकनाथ गुरु निवृत्तीनाथाची महती मोठी की संत ज्ञानेश्वर माउलीची ?
 खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आधी बी का आधी झाड... एवढे अवघड आहे.  गुरु आणि शिष्य यांचा मोठे पणा मोजायला कोणतेही व्यावहारिक परिमाण उपयोगी पडत नाही. पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा एकच गुरुशिवाय ध्येयवादी व्यक्तिमत्वाला पर्याय नाही. मग असा गुरु भेटतो तेव्हा? कोठे? कसा? वगैरे वगैरे.
याचे उत्तर अगदी सोपे आहे. तुमच्या घरातही तुम्हांस आईच्या रूपाने, भाऊ अगर वडिलांच्या ज्ञानाने, शिक्षकांच्या ममतेने गुरुछत्र  लाभू शकते. क्रीडांगणावरील अगर रंगभूमीवरील अनुभवी कलाकार, हेही त्या क्षेत्रातील गुरुच होत.  लो. टिळक, म. गांधी, स्वा. सावरकर हे आजच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांचे गुरुच होते. म्हणजे गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो.
यासाठी संवेदनाशील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची, श्रद्धेची आणि भक्ती व प्रेमाची आवश्यकता आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाची. या गुणांसह  डोळस व अभ्यासू दृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लाभू शकेल. आणि मग ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल. आज समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात र्कीर्तिशिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तीचा इतिहास पडताळून पाहता त्याच्या यशाचे रहस्य हे, हे त्याच्या अचूक गुरुप्राप्तीत असल्याचे आढळून येईल. आणि म्हणूनच हे सत्य आहे की ...........
गुरुविण कोण दाखविल वाट ?
आपला संजिव

भाषा इंदूरी

इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे.

म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्‍या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे. इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं.

ते दोन क्षण - भाग २

कॉलेजमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने "आऊटस्टँडिंग" विद्यार्थी होतो. आरटीओ, सुदर्शन केमिकल्स, पुणे स्टेशनची मागली बाजू आणि कैलास स्मशानभूमी असा शेजार असल्यावर (आणि कुठल्याही टिपिकल अभियांत्रिकी कॉलेजचा 'रखरखाट' असताना) पोरांकडून अजून काय अपेक्षा असणार? तरीपण आमच्या कंपूमध्ये संगीताचे (म्हणजे गाणं किंवा ज्याला आपण "मुझिक" म्हणतो) जबरदस्त चाहते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून भाग घेताना अन्य कॉलेजेसचे समान शील आणि व्यसनं असलेले दोस्त मिळाले आणि आमची संगीताशी (टिप पुन्हा लागू) दोस्ती जमली. म्हणता म्हणता कॉलेजचे ते मंतरलेले दिवस संपले आणि बेकारीचे "तंतरलेले" दिवस सुरू झाली. कामंधंदा नसलेली पोरं एरवीच आपला भरपूर वेळ सत्कारणी लावू लागली. त्यातच हणम्या (ह्याला कधी कोणी अनमोल हाक मारलीच नाही) च्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघाली. आम्ही २५-३० रेहमानी किडा असलेले (ए आर रेहमान चे भक्त) एकत्र येऊन "रेहमानिया" हा केवळ रेहमानच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा घाट घालायला लागलो. अस्मादिक कार्यक्रमाचं निवेदन करणार होते.

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ७

क्षमस्व!!! भाग ६ मध्ये मी संध्याकाळी मॉल मध्ये गेल्याचा उल्लेख केला आहे.... ते आम्ही संध्याकाळी नाही तर दुसय्रा दिवशी गेलेलो.... त्या दिवशी संध्याकाळी आम्ही "मिनी सियाम" ला जाणार होतो..... मिनी सियाम मध्ये जगातल्या महत्त्वाच्या इमारतींच्या लहान स्वरुपातल्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत....पिसा चा मनोरा, पिरॅमिड, लंडन चा ब्रिज, ओपेरा हाऊस अशा लहान प्रतिकृती तिकडे बनवल्या आहेत.... आम्ही साधारण ६ वाजता तिकडे पोहोचलो.... प ने सांगायला सुरुवात केली..... आपण बरोबर ७ वाजत इथेच जमणार आहोत.... आम्ही ओके म्हणालो.... आणि आत गेलो..... आत प्रत्येकच प्रतिकृती इतकी सुंदर बनवली होती कि पाहता पाहता ६.४५ केव्हा वाजले कळलंच नाही. जवळजवळ अर्धा भाग राहीला होता.....इथे पन आम्ही फसलो होतो... इतकी चांगली जागा ह्यांच्या वेळेसाठी अर्धवट पाहावी लागत होती... वेळेत पोहोचायचं म्हणून उरलेला भाग भरभर पाहून बाहेर आलो.... ७.१५ झाले होते.....टाळ्या वाजवण्याचा प्रकार आता रोजचा झाला होता.... आम्ही ६ जण वगळता सगळे आईतखाऊ होते हे आम्हाला कळून चुकलं होतं पण तरी आम्ही बोलून घेतलं की ह्या ठिकाणी फिरायला किती वेळ लागेल हे आम्हाला आधीपासून कसं माहीत असणार??? तुम्ही जास्त वेळ द्यायला हवा होता....

ते दोन क्षण - भाग १

पु. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'दोन वस्ताद' नावाचा लेख आहे. त्यातल्या टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामांच्या आयुष्यात एकेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले. अविस्मरणीय म्हणजे इतके की तो क्षणच ते दोघे खऱ्या अर्थानी 'जगले'. फार कमी जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात की ज्या वेळी आपण To be one with God; देवाशी (का देवत्त्वाशी?) एकरूप होण्याची अनुभूती घेतो. माझ्या नशीबानी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंतच असे क्षण दोनदा आले आहेत. त्यातला हा पहिला.

बुद्धिमत्ता

आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.

स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग : ३ )

किडा रागारागाने बघू लागला. किड्याने बाहेर बोलावताच चटकन घाबरून पीटर बेडवरून उठला आणि खिडकीबाहेर बघू लागला.

किडा : मित्रा, काय चालवलयंस काय हे? एक तर, मी तुला चावल्यानंतर तू मला एकदाही भेटला नाहीस? विसरलास का तू माझे 'उपकार चाव्याचे'? आणि आता पळून आलास अमेरिकेतून हां? आणि काय करतो आहेस या देशात?

आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक आणि एण्डेव्हर अवकाशयान पाहण्याची संधी

सध्या अमेरिकेने एंडेव्हर हे यान (स्पेस शटल) अवकाशात सोडले आहे आणि ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास (ISS) जोडलेल्या (Docked) अवस्थेत आहे. खाली दिलेल्या वेळी अवकाशयानांची ही जोडी मुंबईच्या आकाशात २६ मार्च पर्यंत पाहता येईल.
स्थिरपणे चमकणाऱ्या एका तेजस्वी ठिपक्याच्या रूपात ही याने दिसतील व हा चमकदार ठिपका सावकाशपणे आकाशाच्या एका टोकाकडून दुस-या टोकाकडे जाताना दिसेल.(तक्त्यात दिलेल्या दिशेकडे) 

यिन, यँग आणि साताळकर-५

शनिवारी साडेनऊ वाजताच, द्रुतगति महामार्गावरुन भयंकर द्रुतगतीने येऊन पेडणेकर राजूच्या स्टुडिओत पोचला. सातळकरांनी दिलेली रीसीट, त्यांचे दिवसागणिक केलेले रिपोर्टस्. हे सगळं एक नजरटाकून त्यानं बॅगेत कोंबलं.
"धिस् ऑल स्टफ इज ऑल राईट, राजू. उघडच आहे, की ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे.
पण मला ते साताळकरांकडून ऑफिशियली ऐकायचंय. पण ते म्हणाले, तेही बरोबरच आहे. ह्या सगळ्या कसोटय़ांचा, घटकांचा एकमेकांशी मेळ बसला पाहिजे. आय थिंक, ही इज् जस्टीफाईड. तरी भेंडी, अकरा कधी वाजतायत असं झालंय."
अकरा वाजतांना, साताळकरांच्या आधी एक वेगळाच चौदा पंधरा वर्षांचा मुलगा स्टुडिओत येऊन उभा राहिला. पेडणेकर आणि राजू, दोघे ही आपापल्या परीने पण एकाच विषयाच्या विचारात मग्न होते, त्यामुळे तो काय म्हणतोय, हे त्यांना कळायला काही सेकंद लागले.
"राजू देशपांडे साहेबांसाठी साताळकर सरांनी दिलंय." असं एक ब-यापैकी मोठं फुलसाईझ् पाकीट समोर ठेवत तो म्हणाला," पोचल्याची या कागदावर सही द्याल?" त्यानं निरागसपणं विचारलं.
राजू चांगलाच भांबावला होता. साताळकरांचं प्रत्यक्ष न येणं, त्याच्या अंतर्मनाला अभद्र वाटलं होतं. काहीतरी जबरदस्त घोटाळा होत होता. आजारी वगैरे नसतील ना ते ? त्याला एकदा, आणि एकदाच वाटून गेलं. "सर.. कुठायत पण ?" त्यानं कसंबसं विचारलं. मुलाचे 'माहित नाही' हे शब्द त्याला फार लांबवरून आल्यासारखे वाटले.
त्यातल्या त्यात भानावर होता, तो चारूहास पेडणेकर. भांबावून वगैरे न जाता, त्याच्या हालचालीत धोका जाणवलेल्या एखाद्या मांजराची अस्वस्थ सहजताच आली होती. सही करुन, त्या मुलाला वाटेला लावून, पहिलं त्यानं ते पाकीट उघडलं. त्याच्या आत एक पत्र, आणि आणखी एक बंद पाकीट होतं.
"कम ऑन राजू... फेस इट. वाच तरी त्यांनी काय लिहीलंय. घाबरतो काय?" पेडणेकर करवादला.
अत्यंत सुवाच्च अक्षरात, रेघा असणा-या ए फोर लेटरहेडवर पत्र होतं. राजू आणि पेडणेकर ,दोघांनाही उद्देशून.