मी कुणबी पाटील नाही, मी लेवा पाटील नाही, मी मराठा पाटील नाही, अरे हो, मी ९६ कुळीही नाही..... नाही, नाही, मी तिरोळे पाटील ही नाही.
मी पलंगावर बसून गरम गरम चहाचे झुरके घेत होतो. तोच, सणसणीत कानफडात मारावी, तसा आवाज माझ्या कानांवर पडला.
"तुमचं कूळ काय आहे हो?" मावशी.