परंतु यासम हा

अभिनेत्यांचा कारकीर्दीतील प्रवास बरेचदा मनोरंजक असतो. अमिताभसारख्या उत्कृष्ट अभिनेत्यालाही चाकोरीतून बाहेर पडायला किती वेळ लागला. याउलट नसिरने एक दशकाहून अधिक काळ एकाहून एक अभिनयाचे आविष्कार दाखवल्यानंतर त्रिदेवमध्ये सुमार भूमिका स्वीकारली.

लहान मुलांची आकलन क्षमता/शक्ती - २

जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.

मर्ढेकरांच्या दोन कविता

कै. प्रा. म. वा. धोंड ह्यांनी ललितच्या २००७ च्या दिवाळी अंकात " 'कुठली सीता कुठला राघव' आणि कुठले रामराज्य" ह्या नावाचा एक प्रदीर्घ लेख लिहीला आहे. लेखात मुख्यत्वे करून मुंबईतील झोपडपट्ट्यांच्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत काय काय केले गेले (अथवा केले गेले नाही) ह्यावरचा आहे. त्यात मग  विविध योजना, बिल्डर्सची लॉबी अशा अनेक संबंधित तसेच कुठल्या कार्यालयाला आग लागून कागदपत्रे कशी भस्मसात झाली, वगैरे अनेकविध असंबधित विषयांचा भरणा आहे. लेख अत्यंत पसरट आहे. पण झोपडपटट्टीवासीयांच्या, कष्टकऱ्यांच्या हालअपेष्टा बघून प्रा. धोंडांना मर्ढेकरांच्या दोन कविता आठवल्या. त्या तर त्यांनी उर्धृत केल्या आहेतच, पण त्यांचे थोडेसे विश्लेषणही केलेले आहे. त्या कविता व प्रा. धोंडांच्या टिप्पण्या मी इथे थोडक्यात देत आहे.

एका महात्म्याची कहाणी ( भाग - १ )

                कोणे एके काळी एका तरुणाने एमएससी झाल्यावर अमेरिकेची पुढच्या शिक्षणासाठी वाट धरली. साधारण १९५२ चा काळ होता तो. श्रीनाथची शिकागोच्या युनिव्हर्सिटीत  पी. एच. डी ची सुरवात झाली. हुशार व मेहनती श्रीनाथ सगळ्यांचं मन जिंकू लागला. वेळ मिळेल तेव्हा आजूबाजूचा खेडेगावात भेट देऊ लागला. तेथील शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीने तो प्रभावित झाला. नुसत्या शेतीमध्येच नव्हेतर रोजच्या जीवनातही शास्त्रीय साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.  आपल्या देशातही असं का होऊ नये ? हा प्रश्न सतावत होता. रसायनशास्त्रात  पी. एच. डी. झाली.   श्रीनाथचा आता डॉक्टर श्रीनाथ झाला होता. अमेरिकेतल्या नोकऱ्या बऱ्याच सांगून आल्या. सात वर्षात बरंच काही घडलं होतं. पण आपल्याला देशासाठी व देशातच काहीतरी करायचे आहे असं ठरवून तो तरुण भारतात परत आला. परत आला तेव्हा तो पूर्णं झपाटलेला होता. आपली शिक्षण पद्धतीत खूप दोष आहेत. ते आपल्याला जगायला समर्थ बनवत नाही, हे याचं शल्य मनात घेऊन.

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत? या व अशासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाला चित्रपट पाहिल्यावर मिळतील.
"तारे जमिन पें" म्हणजे काही कल्पित, स्वप्नांच्या दुनयेची, झगमगाटाची कहाणी नाही तर ती आहे तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य नागरिकांपैकी काहीजणांच्या बालपणाची "अमिर खानच्या" नजरेतून पाहिलेली कहाणी. या यशाचे १००% गूण आमिरला. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा हा चित्रपट.
चित्रपटांपेक्षा नकी काय वेगळे आहे हे मी सांगणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करू, समजा हा चित्रपट आमिर ने बनवला नसता व त्या ऐवजी आजच्या एखाद्या प्रशितयश, प्रस्थपित अशा "बॉलिवूड" दिग्दर्शकाने बनवला असता तर तो कसा असता. मला वाटत ही तुलनाच फरक स्पष्ट करण्यास समर्थ आहे......
मग पाहू या एकामागून एक पेशकशी .........
.
.
*****************************************************
१. जर चित्रपट "करन जोहर " ने बनवला ...........
चित्रकलेचे मास्तर म्हणून शाहरूख खान.....
"डिसलेक्सीया" झालेले पोर म्हणून "आर्यन खान"..........
राणी मुखर्जी त्या पोराची आई [ काजोल उपलब्ध नसल्या कारणाने ] ..........
अभिशेक बच्चन पोराचे वडिल व त्यांचा मोठा "कारोबार".........
शक्य झाल्यास अमिताभ शाळेचे मुख्याध्यापक................ [पाहूणा कलाकार ]
चित्रपटाचे पूर्ण शूटिंग "न्यू योर्क, लंडन अथवा तत्सम शहरात ..................
आजच्या प्रथेप्रमाणे शाहरूखचा "६ ऍब्ज वाला डान्स नंबर"..........
कथा अशी काही आवर्जून ऊल्लेख करवा येवढी महतवाची नाही ..............
मुख्य म्हणजे चित्रपताचे नाव "कुछ तारे जमिन पें"................
*****************************************************
२. जर चित्रपट "संजय लिला भंसाळी " ने बनवला ...........
चित्रकलेचे मास्तर म्हणून सलमान खान.....
राणी मुखर्जी त्या पोराची आई ..........
पूर्ण शूटिंग एका भव्य्-दिव्य अशा डोळ्याचे पारणे फेदणार्‍या सेटवर...........
पोराची शाळा ही अगदी "ऑक्सफर्ड, हॉवर्ड" च्या लायकीची..............
काही झाले रे झाले की लगेच संगित, थोडक्यात पूर्ण चित्रपतात ऑर्केस्ट्रा चालूच...........
विचित्र लोकेशन, कॅमेरा ऍगल व स्लो मोशनचा वापर करून तयार केलेले काही अगम्य सीन...........
कथा:- फक्त भंसाळीलाच माहित...............
बजेट, कमीत-कमी ८० करोड ...........
*****************************************************
३. जर चित्रपट "फराह खान " ने बनवला ...........
चित्रकलेचे मास्तर म्हणून शाहरूख खान[काय करणार, याला पर्याय नाही ].....
शाहरूखची एंट्री पहिल्याच सीनला ...........
चित्रपटाचा मुख्य रोख, रोगाशी लढण्यासाठी मुलाला मदत करणार्‍या शिक्षकावर, पोराचा रोग दुय्यम ...........
त्या हिशोबाने पटकथेची पुनर्रचना ...........
चित्रपट रोमान्स, हाणामारी, इमोशन्स, मनोरंजन याने परिपूर्ण .... पोराचा आजार मगाशी सांगितल्याप्रमाणे दुय्यम...........
अख्खी चित्रपट सॄष्टी कुठल्याना कुठल्या कारणाने चित्रपटात हजर..............
******************************************************
४. जर चित्रपट "राकेश रोशन " ने बनवला ...........
ह्रिथिक रोशन हा शाळामास्तर ..........
पोराला "डिसलेक्सीया" च्या ऐवजी "इलियनोक्सीया" की जो प्रत्येक्ष स्वताच्या डोळ्याने "ईलियन" पाहिल्याने होतो .......
ह्रिथिक चित्रकलेचा मास्तर नसून विज्ञान-शिक्षक, त्याचे प्रयत्न म्हणजे पोराला वैज्ञानिक करण्याचे..........
पोराचे कलेच्या तासामध्ये "अंतराळयान" बनवणे [ मुळ कथेमध्ये मुलगा होडी बनवतो] ........
संगित साक्षात राजेश रोशनचे की जे काही प्रसिध्ध अशा आंतरराष्टीय संगितापासून प्रेरणा घेऊन बनवले आहे. [ कोण म्हणतो रे, चाली चोरल्या म्हणून ] ...............
ह्रिथिक विज्ञान शिक्षक असून सुध्धा व्यायाम व शरिरसौष्ठव्याचा भोक्ता, त्याचा डान्स च्या स्पर्थेत पहिला क्रमांक ......
चित्रपटाचे नाव " कुछ ईलियन्स तारोंसे जमिन पर ....."
******************************************************
५. जर चित्रपट "प्रियदर्शन " ने बनवला ...........
चित्रकलेचे मास्तर म्हणून अक्षय कूमार.....
परेश रावल पोराचे वडिल ...........
चित्रपटाचे अंग पूर्णपणे विनोदी, पोराचा आजार हा त्यातलाच एक भाग..........
चित्रपटात दिग्दर्शकालाच विनोदी वाटणारे पण आपल्या डोक्याला वात आणणारे काही सीन्स...........
भरपूर अश्लिल विनोदांचा मारा .............
चित्रपटाच्या शेवटी सगळ्या पात्रांचे एकमकांच्या मागे अकलनिय कारणामुळे धावणे, वस्तूंची फेकाफेकी करणे , रंग ऊडवणे......
*******************************************************
.
मी तरी रामू, डेव्हीड धवन, जे. पी. दत्ता, संजय गुप्ता यासारख्या महारथींची नावे घेत नाही...... कारण "सुज्ञास सांगणे न लगे !!!"

.
.
मला वाटत या गोष्टी पुरेश्या आहेत की नक्की "आमिर ने काय बनवले आहे?" ते सांगायला .............

२००८ शुभेच्छा

सर्व मनोगत सदस्य व प्रशासक यांना नवीन येणारे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्कर्षाचे, आनंदाचे, उत्साहाचे, चैतन्याचे जावो ही हार्दिक शुभेच्छा!

समज गैरसमज

 "अरे देवा, काय वेळ आणलीस रे! खरंच किती वाईट झालं रे!कुणावर काय प्रसंग ओढवेल काही सांगता येत नाही रे!"
 हे बघ आई, तुला एवढा पुळका यायची काही गरज नाहीये,कळलं का?"
 अरे मेल्या एवढा कसा रे पाषाणहृदयी तू? मला तर खूपच वाईट वाटलं रे!"
 कसला पाषाणहृदय़ी आई? अगं केलेल्या कर्माची फळं भोगावी लागली दुसरं काय?
 अरे नुकतीच तिच्या घरी ती परत आली होती रे! पण दैवाने तिच्यासमोर काय वाढून ठेवलंय हे तिला शेवटपर्यंत कळलं नाही रे! एकदा असं झाल्यावर तिने काहीतरी बोध घ्यायला पाहिजे होता रे!
 हे बघ आई,तू काय बोलतेस ते मला काहीही कळत नाहीये. कसला डोंबलाचा बोध? उलट बरं झालं देवाने न्याय केला.नातेवाईकही म्हणाले की बरं झालं आम्हाला न्याय मिळाला.
 अरे मुर्खा,काय बोलतोयस काही कळतंय का तुला? चारचौघात म्हणालास तर लोक चपलेने मारतील.मग कळेल चांगलं!
 अगं आई लोक कशाला चपलेने मारतील मला? तु उगाच या घटनेचं उदात्तीकरण करु नकोस! कळलं?
 अरे बावळ्या तिकडे पाकिस्तानात हिंसाचार,जाळपोळ,दगडफेक चाललीये.वातावरण तणावाचं आहे आणि परिस्थिती चिघळलीये याची तुला काही कल्पना आहे का?
 काय? काय सांगतेस तू आई? हे प्रकरण एवढ्या लांबवर जाईल असं मला वाटलं नव्हतं. आणि पाकिस्तानचा काय संबंध याच्यात? पण तिथपर्यंत हे लोण पसरलं म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय  टोळीला सामील होत्या की काय? बापरे! मग बरं झालं शिक्षा झाली ते!
 अरे पाषाणहृदया,अरे जरा अर्थ लागेल असं बोल रे! अरे तिला दोन मुलं आहेत रे! आता त्या मुलांचं कसं होईल रे?
 हे बघ आई, मुलांची एवढी काळजी होती तर असले उद्योग करायचे कशाला? शिवाय एक मुलगी तर तिच्या बरोबरच आहे. आणि अजून काही झालेलं नाही. वेळ पडली तर मुलांना तिला भेटता  येईल.तेवढी परवानगी असते आई!
 अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे आता त्यांची आई गेली रे त्यांना कायमचं सोडून. आता फक्त फोटोतून दिसणार रे ती!
[float=font:vijay;color:61AF38;place:top;] तू एवढी काळजी का करतेस? आणि असली स्त्रीमुक्ती छाप बडबड तू कधी पासून करायला लागलीस? फाशीची शिक्षा तर अजून व्हायची आहे.[/float]
 देवा देवा देवा! अरे आज तू काय झोकून आला आहेस काय? तुला हजारवेळा सांगितलं असली घाणेरडी व्यसनं सोडून दे म्हणून. अरे मेलेल्याला आता किती वेळा मारणार आहेस अजून?
 अगं आई आणि त्यांनी खून केला त्याचं काय? त्यांच्या घरच्यांना काहीच का वाटलं नसेल का? आता बसा म्हणावं खडी फोडत आणि आपले उरलेले दिवस मोजत!
 अरे कसली खडी आणि कुणाचे दिवस मोजायचे? तू काय बरळतोयस? अरे तिला गोळ्या घालून मारून पण टाकलं रे!

रमेश भाटकर कास्टिन्ग काउच प्रकरण

     रमेश भाटकर यांची बदनामी करण्यामागे नक्की काय षडयंत्र आहे? या प्रकरणामुळे मरठी कलावंतान्ना आणि मराठी सिनेस्रुष्टीला बदनाम करण्याचा कुणी कट तर रचला नसेल ना असा दाट सन्शय येतो. मुळात जी तक्रार दाखल झालेली आहे, त्यानुसार रमेश भाटकर हे आरोपी नाहीतच. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बलत्कार केल्याचा आरोप चित्रपट निर्माते रवि नायडू यांच्यावर आहे व इतर ज्या पाच जणान्विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखवून सह आरोपी करण्यात आले आहे त्यात भाटकरांचे नाव आहे. एकाच वेळी बलात्कार व विनयभंग कसा होउ शकतो याचा खुलासा कायदेपंडीतान्नीच करायला हवा. विनयभंगाची नक्की व्याख्या तरी काय? राजकीय बळी द्यायचा असेल तर नेत्यान्वर व राजकीय कार्यकर्त्यान्वर असे आरोप सर्रास केले जातात. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्जय जोशी यांची एक 'अश्लिल' सीडी प्रसिद्ध करून बरीच खळबळ उडवून दिली गेली होती. यामुळे सन्जय जोशी व भारतीय जनता पक्षाची मनसोक्त बदनामी झाली व आता पोलीसान्नी सांगितले कि ती सीडी बनावट आहे व त्यात सन्जय जोशी नाहीत. मग जोशींची जी बदनामी झाली ती कोणी भरून द्यायचि? जम्मूमधील एक सुंदरी अनारा गुप्ताची अशीच एक 'सीडी' बाजारात आली व ती बदनाम झाली. आता तज्ज्ञान्नी जाहीर केले की सीडीत दिसणारी ती मुलगी म्हणजे अनारा गुप्ता नव्हेच. मग तिची अशी बदनामी का व्हावी? वासनाकांड करणारे नेते सुटतात व विनयाने वागणारया रमेश भाटकरान्वर विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो व 'बलात्कार बलात्कार' म्हणून बदनामी होते. रमेश भाटकर हा माणुस तसा नाही हा विश्वास त्याच्या सहकलाकारान्ना व रसिकान्ना वाटतो यातच त्याचे निर्दोषत्व सिद्ध होत आहे. अब्रू हि झाकण्यासाठी व जपण्यासाठी असते. फिल्मी पार्ट्यांत नग्नतेचे प्रदर्शन करणारया मुलीन्ना व या मुलींचा बाजार मांडणारया त्यांच्या आयान्ना हे कोण समजावणार? की भाटकर हे कारस्थानाचे बळी आहेत.

जयपूर - गुलाबी थंडीत गुलाबी शहराचा प्रवास- भाग १

येशूच्या कृपेने ४ दिवस सुट्टी मिळाली आणि मग काय आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा ठरवला.झटक्यात ठरवले की जयपुराला जायचे. लहानपणी भूगोलात ऐकलेल्या आणि गुलाबी शहर म्हणून ख्याती मिळवलेल्या शहरात जायचे म्हणून मन आनंदले.

दिल्ली- जयपूर २१९ किमी आहे. जवळ जवळ साडे चार तास लागतात.मस्तपैकी काळाभोर डांबरी ४ लेन रस्ता.शनिवारी सकाळी ६.३० ला घरातून निघालो,दिल्लीची कडाक्याची थंडी- तापमान ८ डिग्री. सवाई जयसिंगाच्या जयपुरच्या स्वप्नात रमत प्रचंड उत्साहात गणपतीचे नाव घेऊन कारचा स्टार्टर मारला.असे वाटत होते की गाडीही खूप खूश होती.

ने मजसी ने दूर ऑनसाइटला...

१३ नोव्हेंबरची ती रम्य सकाळ. माझ्या दृष्टीने रम्य म्हणजे कुठलीच घाई-गडबड नसलेली, सकाळी उठल्यावर निवांत वर्तमानपत्र वाचू देणारी (अर्थात आरामात सोफ्यावर लोळत किंवा खुर्चीवर तंगड्या पसरून नव्हे; कुठे ते चाणाक्ष समानुभवी मंडळींच्या लक्षात आले असेलच) आणि आमच्या कंपनीची सकाळची पहिली बस आणि त्यात खिडकीजवळची जागा मिळवून देणारी...माझ्या 'रम्य सकाळ'च्या अजून कुठल्याच दुसऱ्या कल्पना नाहीत. कार्यालयात आल्यावर देखील कामाच्या फार किचकट ई-मेल्स नसणं, वेळेत सगळी कामे आटोपून घरी पोहोचता येईल अशी आणि एवढीच कामे असणं, कुठलीच मीटिंग किंवा ध्वनीबैठक (कॉल असेही म्हणतात याला संगणक प्रणाली विकास क्षेत्रात) नसणं वगैरे 'रम्य सकाळ' अधिक रम्य करणाऱ्या बाबी असतात. अशा रम्य सकाळी सगळ्या ई-मेल्स वाचून झाल्यावर आणि दिवसभराच्या कामाचे स्वरूप आणि लागणारा एकूण वेळ लक्षात आल्यावर मस्तपैकी एक 'सॉलिटेअर' चा खेळ टाकला की त्या रम्य सकाळीला चार चाँद लागतात. अशीच काहीशी १३ नोव्हेंबरची सकाळ होती. पहिली बस मिळाली, खिडकीजवळची जागा मिळाली, पुणे टाईम्समधल्या चटकदार बातम्या वाचता-वाचता आणि 'आकर्षक' छायाचित्रे बघता-बघता केव्हा हिंजवडीला (दुर्दैवाने याचे नाव आता हिंजेवाडी झाले आहे. तसेच बावधनचे बावधान आणि सांगवीचे संघवी! ) येऊन पोहोचलो ते कळलेच नाही. कार्यालयात माझ्या जागेवर येऊन बसलो आणि ई-मेल्स वाचू लागलो. हळू-हळू लोकं यायला सुरुवात झाली होती. ई-मेल्स वाचता-वाचता एका ई-मेलवर येऊन ठेचकाळलो. केवळ विषयओळीत एक छोटासा निरोप होता. शेवटी <इओएम> असे पण होते. इओएम म्हणजे 'एंड ऑफ मेसेज' चे संक्षिप्त रूप. फक्त विषयओळीत निरोप दिला असेल तर त्याच्या शेवटी एओएम> लिहिण्याचा प्रघात आहे जेणेकरून वाचणाऱ्याचे कष्ट आणि वेळ वाचावेत आणि पाठवणारा जर खूप कामात असेल तर त्याचा ही वेळ वाचावा. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांवरून असे वाटते की असल्या निरोपांमुळे वाचणाऱ्याचा गोंधळ वाढतो, त्याला मिळालेल्या निरोपाचा नीट अर्थबोध होत नाही, त्या निरोपाचं प्रयोजन कळत नाही. एकदा असाच एका व्यवस्थापकाचा निरोप मला आला. त्यात होते, 'व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ? इओएम>'. आता या गृहस्थाला माझी जन्मतारीख कशाला हवी आहे या प्रश्नाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. मी त्याला जन्मतारीख पाठवली खरी पण अजून एक प्रश्न जोडून पाठवली. त्याने अजून एक ई-मेल पाठवून जन्मतारीख का हवी आहे हे कळवलं. म्हणजे जे एकाच ई-मेलमध्ये होऊ शकलं असतं त्यासाठी २-३ ई-मेल्स ची देवाण-घेवाण झाली. असो.