सरदारजीचे पत्र

एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने  To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे  नाव  आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं .. सकाळी पत्र पाठवलं आणि दुपारी उत्तर पण आलं "

समर्थ रामदास - झाडाच्यां नावाचा इनसायक्लोपेडिया

सदंर्भ - समग्र समर्थ साहीत्य

प्रकाशन - कालनिर्णय

संपादक - डॉ. मधुकर रामदास जोशी

  वाचकाला पुर्ण समाधान देणारा अप्रतिम ग्रंथ आहे. वेळेअभावी ग्रंथाबद्दल फार लिहीत नाही पण खाली दिलेल्या सारखे सदंर्भ ग्रंथाबद्दल बरेच काही सागुंन जातिल.

डुकराचा हिरवटपणा आता पुढच्या पिढीत

हल्लीची मुले जशी मुंगी हत्तीची गमतीशीर कोडी घालतात तसेच एक कोडे मी लहानपणी ऐकलेले होते, ते असे-

प्रश्न :  कुठल्या टांग्याला हिरवा घोडा असतो?

उत्तर : सगळ्याच टांग्यांना हिरवे घोडे असतात. ... ... भाजलेला घोडा कुठल्याच टांग्याला नसतो!

शून्य : मराठी सस्पेन्स थ्रिलर कादंबरी

प्रकरण पहिले -हॅपी गो अनलकी (कादंबरी-शून्य)
हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते.

गणपती पुळे सहल

मी मध्ये गणपती पुळे येथे जाऊन आलो त्यावेळी काढलेले फोटो पिकासा वर टाकले आहेत.

ते पाहा खालील लिंक वर

दुवा क्र. १

इथे एखादा फोटो टाकायचा असेल पिकासावर उपलोड केलेला तर त्यासाठी काय करावे लागेल????

विष्णुगुप्त-भाग १

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णू झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या निळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.

चित्रपटांची गमतीदार शिर्षके

आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक इंग्रजी शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे. तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:

विचार "पांढरपेशी'...

सकाळची गडबड सुरू. रोजचीच आवरसावर. दुसऱ्या मजल्यावरच्या मला अचानक एक आवाज येतो. मी कान टवकारतो...
आता स्पष्ट आवाज, "" भंग्याऽऽरवालेऽऽय्य,...रद्दी पेपऽर.... भऽऽयंग्यारवालेऽऽय्य''..
"रद्दी देऊ या का बऱ्याच महिन्यांची?', माझा विचार. मी बायकोला विचारतो.
सकाळच्या गडबडीत कश्‍श्‍याला उगाच, या अर्थानं तिचा त्रासिक चेहरा. मी दुर्लक्ष करतो.
"रद्दीचे ओझे तर जाईल' या विचाराने मी खिडकीत जातो.
दरम्यान पुन्हा तो आवाज... जोडीला चेहराही... विटलेला लाल शर्ट आणि मळकट चेहरा; खिडकीखाली उभा असलेला...!
"शुक... शुऽक', वरच्या खिडकीतून मी.
खालून त्याची नजर माझ्याकडे...
"काय द्यायचंय?' त्याचा प्रश्न.
"रद्दी आहे, दुसऱ्या मजल्यावर ये', दोन बोटं दाखवून मी खुणावतो.
तो यायला तयार. अन् मी रद्दी शोधण्याच्या कामाला..

दारावर टक टक.
मी सावध.माझ्या डोक्यात विचारचक्र, जोडीला संशयही..
माझा डोळा "सेफ्टी होल'वर. बाहेर तो.
मी पुन्हा सावध..
"आत जा तू' बायकोला माझे फर्मान. वैतागून ती आतल्या खोलीत.
मी दार उघडतो. समोर तो. पंचविशीचा; दाढी वाढलेला; काळ्या-मळकट चेहऱ्याचा; अंगावर लाल शर्ट- काळी विजार; हातात तराजू...
माझ्या नकळत डोक्याची शीर तडकलेली...
"याला घ्यायचा का आत?, चांगली नसतात अशी माणसं; चोऱ्याही करतात; घरात बायको आहे आपल्या...' , एका क्षणात असंख्य विचार.
मी दार उघडतो. तो रेटून आत. माझा पारा चढलेला. शांत राहण्याचा माझा प्रयत्न..
मी विचारतो," काय भाव देणार?'
"किलोला पाच रुपये', त्याचे "प्रोफेशनल' उत्तर.
"... रद्दी न देता हाकलून द्यावा का याला, असाच?...' माझ्या मनात पुन्हा विचार.
पण मी तसं करत नाही....

मग मी त्याच्याशी "उच्च लेव्हलचं' बोलतो..."खरं तर, तुझ्या सारख्याला मी रद्दी देतच नसतो; दुकानात देतो... पण ओझं वाहायचा कंटाळा आला म्हणून तुला बोलावलं..'
त्याची शून्य प्रतिक्रिया, पण नजर भिरभिरती.
मी त्याला "ऑब्जर्व्ह करतो.
"झोपडपट्टीछाप..; .... साले, चोर असतात हे...' माझं विचारचक्र सुरू तरीही त्याच्या पुढ्यात रद्दी टाकतो.
"आणखी काही आहे? भंगार सामान... जुनी भांडी...?' त्याचा धंदेवाईक प्रश्न.
त्याचा प्रश्न मला आवडत नाही. मी अस्वस्थ.
"नाही... एवढंच आहे,' माझं तुटक उत्तर.
तो पेपर मोजायला वळतो.
" आता हा वजनात मारणार.. हे.... लोक असेच फसवतात.. इथं दहा किलोचे पाच किलो वजन भरवतील अन् बाहेर पंधरा किलो करून विकतील.. शेवटी चोराचीच वृत्ती,' माझे सावध विचार....

"जुने कुकर घेता का तुम्ही?' आतून बायकोचा आवाज. मग तिचं बाहेर येणं
तो रद्दी मोजायचा थांबतो.
"वस्तू बघून सांगतो,' त्याचे आगाऊ उत्तर.
आता मात्र माझ्या डोक्याची शीर तडकलेली.
"" या "थर्डक्‍लास' माणसासमोर बाहेर येण्याची हिला गरज काय?.. स्साली, ही माणसं चांगली नसतात,' मी मनातून भडकलेला. तरीही मी संयम बाळगतो.
" किती रुपये देणार, मोडीचे?' माझा त्रासिक प्रश्न.
" वीस रुपये किलोप्रमाणे...' त्याचं अनपेक्षित उत्तर.
... आता मात्र मला राहवत नाही. "काहीतरी सांगू नको; राहू दे ती मोड; द्यायची नाही मला', मी डाफरतो.
तो अस्वस्थ होतो, चुळबुळतो...
"तेवढी रद्दी घे अन् जा.. बाकी, पुन्हा कधीतरी..' माझा आवाज थोडा चढलेला..
".. आणखी आहे का काही?' त्याचा चिवटपणा.
" न्नाही रे बाऽबा ! कश्‍श्‍याला माझा वेळ घेतोस..? माझे चिडके उत्तर.
तो मुकाट रद्दी मोजतो.
माझ्या डोक्यात राग गेलेला... "झक मारली अन् ह्या टीनपॉट माणसाला बोलावलं,' मी स्वतः:लाच शिव्या देतो.

"रद्दी नीट बघ, काही वस्तू - फाईल वगैरे असतील तर, त्या बाजूला काढ' माझी दरडावून सूचना.
दरम्यान त्याचं काम संपतं.
"चाळीस रुपये होतात रद्दीचे' माझ्या चेहऱ्याचा वेध घेऊन तो बोलतो.
"काऽऽय? फक्त चाळीऽस? शंभर व्हायला पाहिजे एवढी रद्दी आहे ती.. लुटतोय स्साला..' माझ्या डोक्यात विचार सुरू.
"जाऊ देत... देऊन टाकू तेवढ्याला रद्दी.. ही ब्याद तर जाईल इथून..' माझा सुजाण विचार.
"ठिकाय ! दे चाळीस, अन् लवकर आवर ते' माझं निर्वाणीचं बोलणं
"धा रुपये सुट्टे आहेत?' त्याचा प्रतिप्रश्न.
"आहे', त्रासिक मी.
माझी लगबग. त्याच्याकडून पन्नासची नोट घेऊन व त्याला दहा रुपयाची नोट देऊन, मी त्याला कटवतो.
मी दार आदळून बंद करतो. माझा सुटकेचा निःश्वास...
"त्याला बोलवायलाच नको होता...; हे लोक चोऱ्याही करतात..; इथून पुढे सावध राहिले पाहिजे..: दरवाजे वगैरे व्यवस्थित बंद केले पाहिजे...' माझ्या डोक्यात विचारांचे थैमान.
पंधरा मिनिटे मी विचारात..

दारावर पुन्हा टक टक. मी सावध. डोळा "सेफ्टीहोल'वर.
दारात पुन्हा तोच,.. कळकट...थर्डक्‍लास..!
मी धडधडत दार उघडतो...
"काय आहेऽऽ?', सेफ्टीडोअरच्या आडून मी सुरक्षितपणे डाफरतो.
तो विचकट हसतो. खिशात हात घालून दहाची नोट काढतो... माझ्या पुढे सरकवतो.
माझा हात नकळत पुढे...
"मघाशी तुम्ही धा रुपायची नोट दिली नाऽऽ, तिला चिकटून एक नोट जास्त आली', त्याचे चाचरत उत्तर.
माझा शून्य प्रतिसाद...
माझ्या हातात नोट कोंबून तो सर्रकन जीना उतरलेला...सेफ्टी डोअरला लागून मी तसाच उभा. सुन्न...

आता मला विचार करायलाही सुचत नाही...!

अमेरिकायण! (भाग १८ : मध्य-न्यूयॉर्क-१)

"न्यूयॉर्कच्या मॅडम तुसाँमध्ये सध्या ऐश्वर्या आणली आहे" अशी खबर आमच्या कळपाला कुठुनशी लागली आणि ऐश्वर्या ही आमच्यापैकी कोणाचीही सगळ्यात आवडती नटी नसताना पुन्हा एकदा त्या तुसाँबाईंच्या मेणाच्या प्रदर्शनाला भेट द्यायचं ठरवलं. माझा एक मित्रही न्यूयॉर्कमध्ये आला असल्याने न्यूयॉर्क दाखवणं माझं कर्तव्यच होतं. मलाही न्यूयॉर्क दाखवायला आवडतं. त्यातही मिडटाऊन ही माझी खास आवडती जागा. टाईमस्वेअरचा गजबजाट, एम्पायर स्टेटची उत्तुंगता, क्रायस्लर्स टॉवरची नजाकत, ब्रायंट पार्कमधल्या जत्रा, रॉकफेलर सेंटरवरील वेगवेगळे खेळ, ब्रॉडवे शोजची न उतरणारी धुंदी, यूनोचं सगळे राष्ट्रध्वज असलेले मुख्यालय, व्हीटी ची आठवण करून देणारं ग्रँड सेंट्रल स्टेशन, अविश्रांत लगबग आणि उत्सवी वातावरण यामुळे मिडटाऊनला जायला मी कधीही तयार असतो.

वारी १२

       अमेरिकेला आल्यावर इथली महत्त्वाची स्थळे बघणे हा कार्यक्रम ओघानेच आला.अमेरिकेला गेलो असे न्हणताच प्रथम मग तेथे काय पाहिले हा प्रश्न विचारला जाणार हे उघड होते.पूर्वी तिकडून काय आणले याविषयी पण उत्सुकता असे आता तिकडे मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे मिळत असल्यामुळे ती बाब एवढी महत्त्वाची राहिली नाही म्हणा ! तरीही आम्ही परत जाताना भारतातील तपासणी अधिकाऱ्याला मात्र आम्ही काहीतरी आणले असलेच पाहिजे असा कसा काय पण संशय आला होता.आणि त्याने आम्हाला बॅगा उघडायला लावल्या होत्या. माझ्या मागून आलेल्या प्रवाशाने मला नंतर सांगितल्याप्रमाणे मी गुपचुप दहा डॉलरची नोट त्याच्या हातात न ठेवल्यामुळे आमच्यावर हा प्रसंग आला होता.त्यामुळे एकवेळ आम्ही काहीच आणले नाही हे कबूल केल्यावर आम्हाला काही फार नावे ठेवली गेली नसती, पण  आम्ही काहीच न पाहता फक्त मुलाकडे राहून परत आलो असे सांगितल्यावर मात्र आमची वेड्यात गणना झाली असती.(अजूनपर्यंत काहीच न पाहता इथले रस्ते आणि इतर बाबींचेच वर्णन करीत बसल्याबद्दल काहीजणांनी आम्हास वेड्यात काढलेच आहे.)