महात्मा संजय दत्त.....

श्री. संजय सुनील दत्त ह्यांच्या वरील शस्त्रास्त्र नियम उल्लंघन खटल्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी फार मोलाचे योगदान दिले आहे. नोकरी-व्यवसायाच्या फुटकळ कार्यात ज्यांचा वेळ खर्च झाला आणि काही बातम्या मिळायच्या राहिल्या असतील तर त्यांच्यासाठी एकूण बातम्यांचे संकलन करून एक भरीव समाजकार्य आपल्या हातून घडावे ह्या प्रेरणेने हे लेखन प्रभावित आहे....

प्रेम लाभे प्रेमळाला : मानसशास्त्रज्ञ सांगताहेत!

पूर्वी एक कविता वाचली होती "प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी"

आता नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या आणि एमआयटीच्या सामाजिक मानसाशास्त्रज्ञांनी नेमके हेच सांगितले आहे असे वाटते. ते म्हणतात. सगळ्यांवर सारखेच प्रेम करण्याने, सर्वजण सारखेच आवडण्याने इतरांना आपण आवडू असे वाटणे तितकेसे बरोबर नाही. नेमक्या एका व्यक्तीविषयीच इतरांहून जास्त ओढ वाटण्याने त्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल तशी ओढ वाटण्याची संभाव्यता अधिक आहे.

‘आई’

लोकल गाडी मिनिटभरासाठी त्या स्टेशनावर थांबली आणि ती दोघं लगबगीनं गाडीत चढली.

हातातल्या ऊबदार दुलईतलं तान्हुलं सांभाळत गर्दीतून वाट काढत ती आत आली आणि भराभरा सीटवरच्या प्रवाशांना सरकायला सांगत स्वतःसाठी जागा करून घेत हातातलं तान्हुलं तिनं अलगद मांडीवर घेतलं...

चतुरा

वनविहारासाठी गेलेल्या एका तरुणीला वनात, जाळ्यात अडकलेला एक बेडूक दिसला.
तिला त्याची दया आली व तिने त्याला मुक्त केले.
मुक्त होताच तो मनुष्य वाणीने बोलू लागला.
"हे स्त्रिये ! मी केवळ एक बेडूक नसून एक शापित गंधर्व आहे.
 आज तू माझी मुक्तता केलीस. कृतज्ञता स्वरूप मी तुझ्या तीन इच्छा पूर्ण करू शकतो.
 काय हवे ते माग. मात्र एक लक्षात असूं दे, तुला जे कांही मिळेल ते तुझ्या पतीला दसपट मिळेल."

अमेरिकायण! (भाग ४: खाद्यपंढरी)

"एकटा राहणार का? मग जेवणाचं काय? फक्त पिझ्झा, बर्गर का मग?"
"तुझाही सबवे एके सबवे होणार"
"तू काय त्यांच्या सारखं काहीही खाणार नाहीस तेव्हा घरीच बनवायला लागणार"

हि आणि अशी अनेक भाकितं मी निघे पर्यंत सगळे जण करत होते. तसं एक होतं की मला चांगलं जेवण बनवता येत असल्याने (चांगलं म्हणजे मला रुचेल आणि पचेल असं  ) घरच्या जेवणावर भागू शकणार होतं. पण मलाच स्वतःचं जेवण सतत खाण्याची सवय नव्हती  . त्यामुळे पिझ्झा तर पिझ्झा... पण मी रोज काही घरी जेवण बनवणार नाही असं मी ठरवलंच होतं. पण न्यूयॉर्क आणि जर्सी सिटीने मला पूर्ण खोटं ठरवलं.

प्रकाश नारायण संत

      प्रकाश नारायण संत. यांचं खरं नाव भालचंद्र गोपाळ दिक्षित. तंतोतंत ! पण मला तरी प्रनासं हेच बेष्टं वाटलं. तर आता यांच्याबद्दल सांगावयाचं कारण हेच की, दोन आठवड्यांपूर्वी यांचं 'वनवास' हे पुस्तक वाचावयास घेतलं. हे पुस्तक म्हणजे पुस्तकच आहे. नावावर जायचं कामच नाही. म्हणजे नाव वनवास असलं तरी हे पुस्तक वाचलं ना की आपण अगदी लहान बनून, मस्त हिरव्यागार बागेतून फेर्फटका मारतोय, भोवताली झोपाळे, घसरगुंड्या मस्तपैकी हसताहेत, आपल्याला आवडणारी लालपांढरया चाफ्याची फुलं छानपैकी फुलून आलीत, असं सगळं गार गार, झकास वाटू लागतं. आणि आपण हरवूनच जातो. कुठे विचारायचं कामच नाही! वनवास वाचलं आणि प्रनासंची आणखी तीन पुस्तक म्याडसारखी फटाफट वाचून काढली. 'शारदासंगीत', 'पंखा' आणि 'झुंबर'. तिन्ही वनवासचेच पुढचे भाग, सीक्वेल्स की काय म्हणतात तसे आणि सगळे एकदम बेष्टंच. सणसणीत! मला अगदी महाभयंकर आवडले. महाभयंकर!

पर्यावरण

पर्यावरण
साला एक झाड नाही या रस्त्यावर! लाजिरवाणी गोष्ट आहे', भरधाव सुटलेल्या बसचा ड्रायव्हर स्टीअरिंग व्हीलवर मूठ आदळत ओरडला.

भाबडे बाई डोळे मोठ्ठे करून पापण्यांची पिट पिट पिट पिट करीत म्हणाल्या, 'कौतुकच आहे हो तुमचं. पर्यावरणाचा, सामाजिक हिताचा इतका विचार कोण करतं आजकाल!'

गूगर्लशी लग्न

असं वाटायला लागलेय की गूगर्लशी माझे लग्न झालेय. जबरदस्ती नाही पण राजी खुशीने पण नाही. बालविवाह म्हणावा तर तसे पण नाही कारण आजकाल लहान लहान कार्टीपण मला अंकल म्हणायला लागली आहेत. पुनर्विवाह म्हणावा तर तोही नाही कारण माझ्या बायकोची काहीच हरकत नाहीये - गूगर्लला; पुनर्विवाहाला नाही. तसे म्हटले तर तिचेही झालेय. आणि वाचकांपैकी अनेक मंडळीपण, बोटातल्या अंगठीशी खेळत होकारार्थी माना डोलावत असतील.

लग्न झाल्यावर जी पहिली गोष्ट जाते ती म्हणजे प्रायव्हसी. दोन जीव जेव्हा पावणे दोन, दीड, सव्वा असे हळू हळू तन मन धनाने एक होत असतात तेव्हा प्रवास सोपाच असेल असे नाही. डोक्याला डोके भिडते जिथे,... तिथे टेंगुळ पण येऊ शकते. प्रेमविवाहात कदाचित जास्त सोपे असेल कारण त्यात सुई टोचण्या आधी प्रेमाचे स्पिरिट लावलेले असते, पण स्पिरिट किती पटकन उडून जाईल हे कुणी सांगा. पण या लग्नात हा प्रवास अगदीच अलगद होतो.

गूगर्ल शोधावर सर्वात आधी आम्ही फिदा होतो. ०.००२ सेकंदात ३४५२३ शोध. वा वा.. ! जे टाइप करायला आम्ही १० सेकंद घेतले त्याचा शोध एवढ्या लवकर. भलतीच कामसू हो! मग आम्ही भिका मागून मागून गूगर्ल मेल वर खाते उघडतो. खाजगी, सामाजिक, आर्थिक अशी आमची सगळी पत्रे तिला देतो. ती लाडिकपणे म्हणते - "मी ना... तुमची सगळी येणारी जाणारी पत्रे वाचेन पण त्यांचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करेन... मग देता ना परवानगी". आम्ही बेधडकपणे हो म्हणतो आणि पत्रांबरोबर तिने फुकट आणलेल्या आमच्या आवडत्या (म्हणजे तिच्याच आवडत्या हो...) जाहिराती बघतो. गूगर्लला मराठी कळत नाही पण तरी ती पत्रे वाचते आणि बिनधास्त काहीच्या काही जहिराती माथी मारते. एरवी, असले नसते उद्योग करणारीने चांगल्या शिव्या खाल्ल्या असत्या पण आम्ही म्हणतो वा काय हुशार आहे ही. "प्रेम असते आंधळे, बहिरे मुके, वेडे पिसे" याचाच प्रत्यय आम्ही घेत असतो पण तोही नकळत.

प्रत्यक्ष भेटण्याचा आम्हाला भारी कंटाळा म्हणून गूगर्ल आमचे निरोप पोहोचवते आणि आणते. गूगर्ल म्हणते "तुम्ही किनई, विसराळूच आहात" आणि आमच्या दिनदर्शिकेचा ताबा घेते. आमची कागदपत्रे हरवतील या भीतीने सांभाळते. आमच्या मनातले वदवून घेऊन ब्लॉगरवर प्रकाशित करते. आमची छान छान छायाचित्रे, चलचित्रे इ. पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचवते. मित्रांना शोधते, भेटवते. रस्ते शोधते. गुंतवणुकीची माहिती सांगते. बातम्या सांगते. वस्तू शोधून विकत घेऊन घरी पोहोचवते. आम्ही शास्त्रज्ञ झालो तर पेपर्स पेटंट्स हुडकते, डॉक्टर झालो की पेशंट्स हुडकते. थोडक्यात म्हणजे आमच्यासाठी काय वाट्टेल ते करते. तेही विनातक्रार आणि फुकट. आम्ही तिला राब राब राबवतो आणि मग एके दिवशी शोध लागतो की आम्ही तिच्यावर पार अवलंबून झालो आहोत.

अशा लग्नाला काय म्हणायचे. आमचे चालणे, बोलणे, वागणे सगळेच तिला माहित आहे पण तिच्या अस्तित्वाचा शोध आम्हाला आता लागतोय. तसा आमचा तिच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाही पण आहे म्हणायला आम्ही तिला फारसे ओळखतच नाही. आम्हाला वाटते की ती आमच्या तालावर नाचते पण खरेतर आमच्या तालाचा एकन् एक ठोका तिला माहित झालाय. आजकाल ती आम्ही न सांगताच नाचते पण आणि आम्ही कौतुकही करतोय.जगभरच्या असंख्य लोकांचे ताल हिला माहित आहेत आणि त्यावर नाचण्याची किमया हिला जमतेय; आणि हीच बाब तर खटकतिये. ही जगवधू बनतिये उगीचच पूर्वीच्या काळी असलेल्या विषकन्या वगैरेंची आठवण झाली. राजांना मोहवून त्यांच्याकडून गुप्त माहिती उकळणे आणि मग 'खल्लास'. बाप रे!!!

चला, आता मी रजा घेतो. या सुविधेला किती उपभोगायचे आणि मग किती भोगायचे ते तुम्हीच ठरवा. बाकी माझा लेख पाहा माझ्या गूगल ब्लॉग वर http://omkarkarhade.blogspot.com/

'पहिली कमाई'

'पहिली कमाई'

अजूनही स्पष्ट आठवतात ते दिवस. नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती अन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मी सुट्टीत पुढची स्पप्ने रंगवत होतो. चांगले गुण पडले की संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा ते. त्यावेळेस (१९९७) मधे संगणकामुळे होणाऱ्या प्रगतीमुळे सवजण भारावूण जात होते. मीही त्यातून सुटलो नाही. मला लहानपणापासूनच संगणकाबद्दल प्रचंड जिज्ञासा होती. त्यातच मला एका प्राथमिक संगणकाच्या अभ्यासक्रमाबद्दल 'सकाळ'मधे जाहिरात पाहायला मिळाली. मी ती जहिरात पाहताच हा अभ्यासक्रम या सुट्टीत पूण करायचा असे ठरविले. पण मुख्य अडचण होती ती म्हणजे फीची. त्यावेळेस संगणक अभ्यासक्रमाची फी जास्त वाटत होती. त्यातून मध्यमवर्गातील असल्याने बाबांवरती या फीचा बोजा टाकणे बरोबर वाटेना. वाटायचे माझ्या आवडीसाठी त्यांना कशाला वेठीस धरायचे. पण माझे मन मला स्वस्थ बसू देईना. मग खूप विचारांती एकच उपाय सापडला - की हे पैसे स्वतः कमावायचे नि संगणक अभ्यासक्रम पूर्ण करायचा. कारण मी असे एकले होते की परदेशात शालेय विद्यार्थी, कालेजकुमार सुट्टीत तात्पुरते काम करून आपला वरखर्च भागवतात. आता अडचण होती ती - तात्पुरत्या नोकरीची !