वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आशाजी, पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.जीवनातल्या खूप मोठ्या आनंदाला तुम्ही जबाबदार आहात,आणि माझ्यासारखेच असे आणखी कित्येक जण असतील ज्यांचीही हीच भावना असेल.तुमच्या सुरेल आवाजाची साथ अशीच आम्हाबरोबर राहो आणि तुमचं हे 'मिलियन डॉलर स्माईल' असंच बघायला मिळो,कायम राहो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दीक्षितांचा बंब

भर रात्रीचे आठ वाजलेले. आमच्या इथे दोन दिवसांपासुन वीजपुरवठा नव्हता. चोहिकडे दाट अंधार. इतका अंधार की काजव्यांनाही समोरचे काही दिसत नव्हते. घरासमोरच्या गटारातील बेडकं जेवण आटोपुन शाळेतील प्रार्थना म्हणावी तशी एका सुरात राग शुद्ध सारंग गात होती. घरातली सगळी मंडळी बाहेर वाय्रावर(घरासमोरच्या कट्ट्यावर) बसलेली. आमचे शेजारी, दिक्षितही त्यांच्या घराच्या दारात सिगारेट तोंडात धरुन प्राणायाम करत बसले होते. शेजारी त्यांची सहा वर्षाची नुकतीच पहिलीत जावू लागलेली मुलगी न दिसणाय्रा अंधारात स्वतःशीच लपंडाव खेळत होती. माळरानात घर, चोरांची भीती म्हणून आणि बायकोचा राग कोणावरतरी काढता यावा म्हणून दिक्षितांनी शारु आणि सल्लु नावाची दोन भली मोट्ठी कुत्री पाळलेली. दिक्षित रोज सकाळी उठल्या उठल्या त्यांना एकतरी लाथ घालतच. लाइट गेल्याने टि.व्हि. बघायचे सोडुन दिक्षितांच्या दोन्ही कुत्र्यांनी खुशाल ताणुन दिलेली. तितक्यात काळाचा आघात झाला. अंधारात दिक्षितांना कसलीतरी धुसफुस ऐकू आली. दिक्षितांना त्यांच्या पाणी तापवण्याच्या बंबाशेजारी दोन काळ्या आकृत्या दिसल्या. तेवढ्यात दिक्षित ओरडले, शारु सल्लु, छु छु.... त्या आवाजाने शारु दचकुन जागा झाला. मोठ्या रागाने शारुने दिक्षितांकडे बघितले आणि "काय म्हातारं चळलंय" अशा आविर्भावात त्याने एक मोट्टी जांभई दिली आणि परत मान खाली टाकली. दिक्षितांनी पटकन बंबाकडे धाव घेतली. पण तेवढ्यात चोरट्यांनी बंब घेऊन पळ काढला. दिक्षितांनी "चोर चोर" अशी आराळी ठोकली. तोपर्यंत चोर अंधारात दिसेनासे झाले. संपुर्ण गाव तिथे गोळा झाला, पण व्यर्थ, चोरांनी आपला कार्यभाग आधीच उरकला होता. दिक्षितांच्या भार्या काहीतरी निमित्त काढुन माहेरी गेलेल्या. आता त्या परत आल्यावर त्यांना काय सांगावं या चिंतेने दिक्षितांना ग्रासले. दिक्षितांच्या सासय्रांनी मुलीसाठी तिच्या लग्नात भेट म्हणून दिलेला बंब चोरट्यांनी चक्क दिक्षितांच्या डोळ्यासमोर लंपास केला. दिक्षितांचा चेहरा जणु शाळेत वॉटरबॅग हरवून आलेल्या लहान मुलासारखा झाला... कसली कसली दु:खं असतात माणसाला नाही?

चित्रकार

प्रसन्न सकाळ उजाडली. चित्र रंगवण्यासाठी त्याने कागद आणि कुंचले जुळवले.

अनाघ्रात कागदावर पहिला फटकारा कुठल्या रंगाचा मारावा याचा त्याने विचार सुरू केला.

लाल रंगाकडे त्याचा कुंचला वळताच रक्ताचे पाट, बेधुंद आरोळ्या, हातात नंग्या तलवारी घेऊन चाललेल्या लुटारूंच्या टोळ्या, आयुष्याच्या कमाईची काही क्षणात झालेली राखरांगोळी नजरेसमोर भिरभिरू लागली. घाईघाईने त्याने हात मागे घेतला.

सूर्य

नजर पोचेल तोवेरी विस्तीर्ण माळ पसरला होता. त्यावर उंचसखलपणा दर्शवणारे काहीही नव्हते - एखादा खड्डा, ढेकूळ, खडा वा गवताचे पातेही. पिवळट राखाडी रंगाची अर्ध-मृदू माती त्यावर आपले वेष्टण घालून होती. त्या अखंड माळावर जागृतीचे वा उत्पत्ती-स्थिती-लय या चक्राचे काहीही लक्षण नव्हते.

अमेरिकायण! (भाग ६: नूतनवर्षाभिनंदन)

हा हा म्हणता म्हणता वसंत-ग्रीष्म-वर्षा ऋतू सरले आणि शरद ऋतूची चाहुल लागली(इथे आपल्या शरदाच्या वेळीच पानगळ होते त्यामुळे त्याला फ़ॉल म्हणतात, आपला शिशिर म्हणा हवतर). या दरम्यान मला काहि प्रोजेक्टमधील अडचणींमुळे भारतात परत जावं लागलं. त्यामुळे इथला सेंट्रल पार्क मधला फ़ॉल बघणं राहुनच गेलं  (ते अजूनही रहिलेलं आहे.) तेव्हा जाताना रुखरुख होती, अनेक पुस्तकांत वाचलेला परदेशातील नाताळ बघता येणार नाहि याचा. पण नशिबाने साथ दिली आणि माझं ऐन नाताळात पुनरागमन झालं.

''सर्प्राईझ केले'' म्हणजे काय होते?

अनेक सुशिक्षित घरातील माणसे कधी कधी गम्मत म्हणून संबधिताला न सांगता,त्याचेसाठी काही भेट वस्तू आणतात.त्याव्यक्तीकडे ती वस्तू आधीच असते.त्यामुळे भेट मिळाल्याचा आनंद त्या व्यक्तीला मिळू शकत नाही.काही वेळेला मुद्दाम न विचारता ,एखादी वस्तू आणतात,आणि मी सरप्राइज केले असे सांगतात.यामुळे वस्तू सगळ्यांच्या उपयोगाची असली तरी ती घरात आल्याचा आनंद सर्वाना मनापासून होऊ शकत नाही्. हे लक्षात घेऊन  घरात नवीन वस्तू आणण्यापूर्वी ,घरातील मोठ्या स्त्री-पुरुष माणसांशी चर्चा करावी.त्यामुळे जास्तीत-जास्त गरजेची वस्तू घरात येउन,सर्वाना आनंद होउ शकतो.तसेच आपलेही मत विचारात घेतल्याचा आनंद प्रत्येकाला मिळू शकतो.यात ही पैसे न मिळवणाऱ्या आई,सेवा-निवृत्त झालेल्या वडिल,आजोबांना खूप समाधान लाभते .असे करणाऱ्याबद्दल सर्वांच्याच मनांत प्रेम वाढीस लागते.

पळा पळा कोण पुढे पळे तो...

हिंदीत लघुकथा हा प्रकार चांगलाच रुजला आहे. या लघुकथा जास्तीत जास्त एका पानाच्या असतात. पण मोठा आशय त्यातून व्यक्त होतो. एके ठिकाणी वाचलेल्या या लघुकथेचा अनुवाद केल्यावाचून राहवले नाही. प्रयत्न केला आहे.

पळा पळा कोण पुढे पळे तो...

श्रावणातील उपवास

"महाराष्ट्र टाइम्स" मध्ये प्रसिद्ध झालेला लेख.मनोगत च्या वाचकांसाठी इथे जसाच्या तसा देत आहे.

उपवासाची गरज चातुर्मासातील श्रावणातच का, असा प्रश्न बरेचदा उपस्थित केला जातो. गरज आहे ती शरीराच्या स्वास्थ रक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. कारण या काळातील हवामानामुळे आहार-विहारात जो बदल होतो त्यामुळे आषाढ-श्रावण महिन्यात वायूचे अनंत दोष प्रकृतीत निर्माण होतात. मुख्यत: पचन संस्थेत फार मोठा फरक म्हणजे अरुची, भूक न लागणं, मल प्रवृतीची तक्रार आणि शरीराच्या विविध भागांमध्ये वेदनांचा उद्भव होणं इत्यादी प्रकार दिसून येतात. श्रावण महिन्यापूवीर्च्या आषाढ महिन्यात दोन एकादश्या, स्त्रियांचे गोपद्मव्रत, गुरुपौणिर्मा व्रत, गुरूपूजन यामुळे कृतज्ञता येते. हे सण, व्रत-वैकल्य उपवासाच्या मूळ अर्थाशी जोडूनच येतात. उपवासाच्या दिवशी दुपारी एकदा उपवासाचे पदार्थ आणि मध्ये एकदा पाणी पिऊन रात्री सूर्यास्तानंतर भोजन घ्यावं. यामुळे अग्नि प्रदीप होऊन उत्साह वाढतो असा उपवासाचा अर्थ अभिप्रेत आहे. श्रावणातील उपवास आणि व्रत-वैकल्य यांची सांगड घालण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ उपास करणं अभिप्रेत नसून त्याबरोबरीने पूजा-अर्चा, व्रत-वैकल्य करणंही गरजेचं आहे. कारण चातुर्मासातील उपवास हे याच सणावारांच्या निमित्ताने केले जातात. श्रावणातील प्रत्येक सणावारांमागे निश्चित असा उद्देश आहे. गणेशाचं दुर्वा, बेल, आघाडा, शमी, मंदार इत्यादी फुलांनी पूजन करावं असाही आध्यात्मिक ग्रंथात उल्लेख आढळतो. वनस्पती पूजनाच्या मागे आरोग्याचं रक्षण हा हेतू आहे. मांगल्यामुळे संयम निर्माण होतो हे पंचामहाभूत तत्त्व आहे. त्यापासूनच सर्वार्थ जीवन सुरू राहतं आणि म्हणूनच उपवासाचं महत्त्व आहे. इथेही हाच संयम आवश्यक आहे. खाण्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने करण्यात येणारा तो एक प्रयोग आहे. मात्र 'एकादशी आणि दुप्पट खाशी, तरी म्हणे मी उपाशी' असं होता कामा नये. तसं झाल्यास उपवासाचा काहीही फायदा होत नाही. बरेच वेळा उपवासाच्या दिवशी उपवासाच्या पदार्थांवर ताव मारला जातो पण असं केल्याने अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीत. उलट पोट बिघडण्याची शक्यता वाढते. पथ्य असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करण्यापूवीर् एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोलून आहार ठरवून घ्यावा. अजिबातच उपवास न करण्याने जसा पचन संस्कृतीवर ताण पडू शकतो. तसंच अति उपास केल्यानेही प्रकृतीस त्रास होऊ शकतो. आठवड्यातून दोन पेक्षा अधिक उपवास नसावेत. बऱ्याच जणी आठवड्यातून तीन-चार उपवास करतात त्याचाही त्रास होऊ शकतो. फार काळ उपाशी राहिल्याने आम्लपित्त उफाळू शकतं. उपवासाच्या काळातही फळांचा रस किंवा फळांचं सेवन करावं त्यामुळे पित्त भडकत नाही. श्रावण वद्य पक्षातील चतुथीर्ला संकष्ट चतुथीर्च्या उपासाला प्रारंभ करावा असं चातुर्मासात म्हटलं आहे. मात्र उपवासाच्या दिवशी खूप तेलकट पदार्थ खाऊ नयेत. पाप कर्माच्या निवृत्तीसाठी पूजा, प्रार्थना, ब्रह्माचर्य, संयम यांच्या गुणांच्या सहवासामुळे मिळणाऱ्या फायद्यासाठी केवळ शरीर शोषणासाठी नव्हे तर रोगी लोकांच्या रोग मुक्ततेसाठी ज्याच्या योगाने सिद्धित्वासाठी हे उपोषण हे संयम आवश्यक आहे. इष्ट देवतेच्या सान्निध्यात राहून जप-तप-पूजा सात्त्विक भावाने आणि अल्प आहार घेऊन करणं म्हणजे उपवास असं आयुवेर्दाच्या आद्य तपस्याने आपल्या चरक ग्रंथात लिहून ठेवलं आहे. म्हणूनच चातुर्मासात सण, व्रत-वैकल्य, उपवास पाळायचे असतात.

खवैयांचे उखाणे-इ-संमेलन

नमस्कार मंडळी, मागील २ लेखांच्या ("चाय गरम" आणि "पोटपुजेतील जोड्या")चटकदार प्रतिसादावरुन खवैय्येगिरी हा वाचकांचा आवडता विषय आहे हे सिद्ध झाले आहेच. सर्व वाचकांना मन:पुर्वक धन्यवाद.

पण नुसते पदार्थांची नावे वाचुन खवैय्येगिरीचे समाधान कसे होणार? तर निवडक असे मराठी उखाणे - अर्थात ज्यात खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे अश्या संकलीत करणे आणि निखळ मनोरंजन हाच या लेखाचा हेतू .त्या साठी खवैया आणि रसिक लेखक आणि कवी मंडळी ना पुन्हा एकदा नम्र विनंती...आपल्याला माहीत असलेल्या / विडंबन केलेल्या / बनवलेले विनोदी असे उखाणे (ज्यात थोडा तरी "खाउ" आहे ) कळवावेत ही नम्र विनंती.

स्वगत

हं..... चला झाला एकदाचा लेख पूर्ण. आता वाचून बघते....... सुपूर्त करण्याअअधी वाचून पहा वर एक टिचकी मारते. आता परत एकदा नीट वाचू. काहीकाही वेळेला उगाचच फालतू शुद्धलेखनाच्या चुका असतात. सुपूर्त करण्याआधी शुद्धीचिकीत्सक वापरावा का?.....   नको. एवढे काही कठीण शब्द नाहीत लेखामध्ये. साधाच तर लेख आहे.  सुपूर्त करू कारण रात्रीचे ११ वाजत आले. "सुपूर्त करा" वर टिचकी मारते.................