महात्मा संजय दत्त.....

श्री. संजय सुनील दत्त ह्यांच्या वरील शस्त्रास्त्र नियम उल्लंघन खटल्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी फार मोलाचे योगदान दिले आहे. नोकरी-व्यवसायाच्या फुटकळ कार्यात ज्यांचा वेळ खर्च झाला आणि काही बातम्या मिळायच्या राहिल्या असतील तर त्यांच्यासाठी एकूण बातम्यांचे संकलन करून एक भरीव समाजकार्य आपल्या हातून घडावे ह्या प्रेरणेने हे लेखन प्रभावित आहे....

*  *  *  *  *

आज संजय दाताचे भवितव्य ठरणार....
कोर्टात जाण्यासाठी संजय दत्त घरातून निघाले....
त्यांनी निळा शर्ट घातला आहे....
काय आज संजयला प्रोबेशन काळासाठी सोडण्यात येणार?....
संजय दत्त ह्यांनी जामिन कार्यकाळात चांगले वर्तन केले आहे....
संजय दत्त एका चांगल्या सुसंस्कृत घराण्यात जन्मलेले आहेत....
संजय दत्त ह्यांची सुटका होणार का?....
संजय दत्त ह्यांना ६ वर्षाच्या कारावासाच शिक्षा....
संजय दत्त ह्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले....
मुन्नाभाई चालले आर्थर रोड कारागृहात....
संजय दत्त रात्री जेवले नाहीत. फक्त थोडा फलाहार केला....
संजय दत्त ह्यांची आर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात रवानगी....
संजूबाबा...‌.संजूबाबा....संजूबाबा....
प्रसार माध्यमांचा पोलीस व्हॅनला गराडा....
'I love my country'
संजूबाबाच्या दोस्तांनी मुंबईहून पुण्यापर्यंत त्यांची साथ केली....
संजय दत्तची प्रेमिका 'मान्यता' नेही मुंबईपासून पुण्यापर्यंत त्याची साथ केली....
येरवडा कारागृहा बाहेर संजय दत्तच्या चाहत्यांची सकाळपासून झुंबड....
सकाळी चार वाजल्या पासून प्रसारमाध्यमांचे बातमीदार कारागृहाबाहेर....
संजय दत्त येरवड्याला पोहोचले....
संजय दत्त पोलीस व्हॅनमधून उतरले....
संजूबाबाच्या तब्येतीत बिघाड....
डॉक्टरांच्या मते संजय दत्त ह्यांची तब्येत ठणठणीत आहे. वैद्यकीय तपासणीची गरज नाही....
जेल मध्ये संजय दत्त केनच्या खुर्च्या बनवणार....
संजय दत्त इतर कैद्यांप्रमाणेच कारागृहाचे कपडे वापरणार, काम करणार....
संजय दत्तना इतर कैद्यांप्रमाणे सकाळी ६ वाजता उठावे लागते.... 
सकाळी ७ वाजता नाश्ता मिळतो....
दुपारी १ तास सुट्टी असते....
संध्याकाळी ५ वाजता जेवण मिळते आणि ७ वाजता झोपावे लागते....
संजय दत्त सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार....
खासदार प्रिया दत्त सोनिया गांधींना भेटल्या...‌
संजय दत्त ह्यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला....
संजय दत्त ह्यांच्या अर्जावर २० तारखेस निकाल होणार....
सुप्रीम कोर्टाने संजय दत्त ह्यांचा जामिन अर्ज मंजूर केला....
संजूबाबाने सुटकेचा निःश्वास सोडला....
टाडा कोर्टाची निकालाची प्रत मिळाल्या बरोबर पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार....
कोर्टाच्या परवानगीशिवाय देशा बाहेर जाता येणार नाही....
संजूबाबांचे पारपत्र कोर्टात जमा....
संजय दत्त ह्यांची आज जामिनावर सुटका....
संजू बाबाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला....
संजय दत्त ह्यांच्या जामिन मंजुरीचे कागदपत्र येरवडा कारागृहात न पोहोचल्यामुळे, संजय दत्त ह्यांना, आजची रात्र कारागृहातच काढावी लागणार....
संजय दत्त ह्यांनी कारागृहात खुर्च्यांच्या केनचे काम केले....
एका चित्रपटासाठी दीड करोड रुपये घेणाऱ्या संजय दत्त ह्यांना आजपर्यंतच्या कामाचे २४० रुपये मिळणार....
संजय दत्त रोजच्या जेवणात कोंबडी खातात....
कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे त्यांना सिगरेटही विकत घेता येते....
आज संजय दत्त ह्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता....
बॉलीवूड मध्ये उत्साहाचे वातावरण....
मिठाई वाटण्यात आली....
संजय एक अच्छा लडका है। - महेश भट्ट....
संजय एक नेक इन्सान है। - दिलीप कुमार....
सुप्रीम कोर्टाची आज्ञा टाडा कोर्टात पोहोचली....
आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कागदपत्र कारागृहात पोहोचणे आवश्यक....
आज संजूबाबा कारागृहातून सुटणार?....
आम्ही संजूबाबाच्या 'दर्शना'साठी जमलेलो आहोत - कारागृहाबाहेर एक चाहता....
संजय दत्तच्या सुटकेवरील 'विशेष अहवाल' रात्री ८.३० वाजता पाहा....
संजय दाताचे वकील ५ वाजेपर्यंत कारागृहात पोहोचू शकले नाहीत....
संजू बाबा आजची रात्रसुद्धा कारागृहातच व्यतीत करणार....
शेवटी सकाळ झाली....
३ दिवसांच्या विलंबानंतर आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी संजूबाबांची सुटका....
 संजू बाबाला घेण्यासाठी त्यांचे मेहुणे कुमार गौरव येरवड्यास पोहोचले....
संजय दत्तला 'कव्हर' करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भयंकर गर्दी....
संजय दत्तने जीन्स आणि पांढरा शर्ट घातला आहे....
संजय दत्त सरळ विमानतळावर जाणार की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाणार?....
पुण्याहून मुंबईस खास खाजगी विमानाने जाणार....
पुणे विमानतळावर हॅलीकॉप्टर तयार....
पुणे - मुंबई हवाई प्रवास १० मिनिटांचा....
संजय दत्त ह्यांची दाढी वाढलेली आहे....
हवाई रहदारीच्या बंधनांमुळे संजय दत्त ह्यांच्या विमानाचे उड्डाण सकाळी ८च्या आत किंवा १०च्या नंतर करणे गरजेचे....
हॅलीकॉप्टर संजय दत्त ह्यांच्या मित्राचे खाजगी मालकीचे आहे....
संजय दत मुंबईत कुठे उतरणार? अंतरराष्ट्रीय विमानतळावर की पवन हंसच्या जुहू विमानतळावर?....
मुंबईला उतरल्यावर संजय दत्त कदाचित सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जातील. ते गणपतीचे उपासक आहेत....
संजय दत्त ह्यांच्या घरा बाहेर त्यांच्या मित्रांची आणि नातेवाईकांची गर्दी जमली आहे....
संजूबाबा मुंबईला पोहोचले....
संजूबाबा आपल्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मित्रांची गळाभेट घेतली....
संजय दत्त ह्यांनी आपल्या भाचीचा पापा घेतला....
संजय दत्त घरी पोहोचल्यावर त्यांच्यावर ओवाळून नारळ फोडण्यात आला....
संजय दत्त आपल्या दोन्ही बहिणींना भेटले....
प्रिया दत्त ७ महिन्यांची गरोदर आहे....
संजय दत्त लवकरच प्रसारमाध्यमांना भेटणार....
संजय दत्तच्या घरात नातेवाईकांची गर्दी....
संजय दत्त भावुक झाले....
बहीण प्रियास मिळाली राखी पौर्णिमेची भेट....
संजय दत्तवर बॉलीवूडच्या १०० करोड रुपयांची गुंतवणूक आहे.... 
संजय दत्त लवकरंच पुढील रणनिती ठरविणार....

*  *  *  *  *

ब्रेकिंग न्यूज......

सलमान खानने केलेल्या हरिणाच्या शिकारीच्या खटल्याची सुनावणी आज......
खालच्या कोर्टाने आधीच ५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.....

*  *  *  *  *