गणितात भारतीयांचा 'पाय' न्यूटनच्या आधी??

Newtonहे मी सांगत नाहीये; मँचेस्टर विद्यापीठाचे डॉ जॉर्ज घेवर्गीज, एक्झेटर विद्यापीठाचे श्री अलमेडा इत्यादी अभ्यासक सांगत आहेत.

'केरळ विचारसरणी' च्या गणितज्ञांना न्यूटनच्या आधी सुमारे अडीचशे वर्षे (इ‌. स. सुमारे १३५०) गणितातील अनंत मालिकेची माहिती होती. अनंत मालिका हा गणितातील 'कलना'चा महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला माहीत आहेच. अनंत मालिकेचा शोध सध्या (चुकीने) न्यूटन आणि लिबनिझ ह्या शास्त्रज्ञांचा म्हणून सांगितला जातो असे डॉक्टरमजकूर लिहितात.

स्वातंत्र्य

नुकतेच पंख फुटलेले ते पाखरू आभाळात विहरताना स्वतः:शीच म्हणाले,
स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,
त्याने मुलास विचारले,  स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

हसा पण लठ्ठ होऊ नका

गजाननराव आणि ठमाकाकू त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एका मोठ्या हॉटेलमधे गेले. अर्ध्या तासाने, काय मागवायचे याबद्दल त्यांचे एकमत झाले.

" वेटर, एक पिझ्झा. ' गजाननरावानी ऑर्डर दिली.

थोड्या वेळाने वेटरने पिझ्झा आणला आणि विचारले. " साहेब, किती तुकडे करू. १२ कीं १६. '

ह्याला जीवन ऐसे नांव...

कोल्हापूरीच्या जागी आले रे शूज, ओ..ओओओओऽऽऽऽ
नऊवारीच्या जागी ट्राऊझर लूऽऽऽऽऽज,
डबेवाले झालेऽऽऽ मॅनेजमेंट गुरू
सिनेमाची झाली आपल्या ऑस्कर वारी सुरूऽऽऽऽऽ
एक्मेकांचे पाय खेचू म्हण झाली जूनीऽऽ
नव्या महाराष्ट्राची नवी हीऽऽऽ कहाऽऽऽणी.....
मी माझ्याच नादात गुणगुणत आमच्या इमारतीच्या पायऱ्या चढत होतो. उद् वाहक (लिफ्ट.. हो!) बंद असल्यामुळे हा सक्तीचा व्यायाम करावा लागला. वरून खाली जाणारी एक मोलकरीण तोंडाला पदर लावून  हसत हसत का गेली मला कळेना. घरी आलो आणि मूडमध्येच दारावरची बेल दाबून वाट पहात उभा राहीलो....
एक्मेकांचे पाय खेचू म्हण झाली.... आयला दार का उघडत नाहीए बायको? पुन्हा बेल दाबली तर लक्षात आलं बेल वाजतच नाहीए. व्यायामामुळे म्हणे मेंदू तरतरीत होतो. काय डोंबलं तरतरीत होतो? इलेक्ट्रिसिटीची बोंब आहे हे ५ जीने चढूनही टाळक्यात टिकलं नाही. असो. कडी वाजवली......... शांतता..... पुन्हा कडी वाजवली.......आतून एक नाही की दोन नाही......पण कोणीतरी आतली कडी काढलेली ऐकू आली. दार ढकलल्यावर उघडले. बायको पाठमोऱी स्वयंपाक घरात जाताना दिसली. सगळेच नवीन मग मारी जूनी का? ...हात्तीच्या मारी...... मी बूट काढले. बाहेरचे कपडे बदलून घरातले घातले. बाहेर येऊन सोफ्यावर अलगऽऽऽद् बसलो तरी पण सोफ्याने बोंबलून माझ्या वजनाची कुरकुर केलीच. हरामखोर स्साला...! आज घरात इतकी शांतता का बरेऽऽऽ? विचार करत करत टीव्हीचा रिमोट हाती घेतला पण....लाईट कुठे होता?  पंखाही लावणे शक्य नव्हते. सकाळचा पेपर हाती घेतला. पहिलं पान वाचून झालं. स्वयपाक घरात शांतता.....पण नाही... एक वाटी पडली जमिनीवर (पडली की?......) वाटी बराच काळ टणटणत राहीली. स्टीलची असावी. नाद बरा आहे. ......विलासरावांची आसनक्षमतेनुसार वाहनांना प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देण्याची घोषणा.....पण शांतता का?
तेवढ्यात बायकोने बिनसाखरेचा सुंदर चहा आणून समोरच्या टीपॉय वर ठेवला. जरा प्रेमाने हळूच ठेवला असता तर बरे झाले असते. उगीचच आणून आपटल्यासारखा वाटतो. बिनसाखरेचा चहा आपण प्रथम पितो (डॉक्टरांनी सांगितले म्हणून नाहीतर कोण पितो म्हणा...) तेंव्हा आपला चेहरा पाहण्यासारखा होतो. आपल्याच कुटुंबातील विविध वयाचे, नात्याचे, आकाराचे सदस्य मनमुराद हसून घेतात. आपण मनापासून न आवडलेला चहा मनापासून आवडल्याचे नाटक करतो त्याने आपला चेहरा अजून विनोदी दिसू लागतो. (असे 'इतर' सदस्यांच्या हास्याच्या दुसऱ्या 'त्सुनामी'ने आपल्याला जाणवते.) पण पुढे पुढे ती चव आपल्या जीभेवर रूळते. आपला चेहरा विनोदी दिसत नाही. इतर सदस्यांचा 'चहा'टळपणा मावळतो. (म्हणजे त्यांना आपल्या बद्दल सहानुभूती वाटते अशातला भाग नाही. उलट रोजची फुकटची 'करमणूक' गेली ह्याची त्यांना खंत वाटते. असो.) सांगण्याचा मुद्दा असा की बिनसाखरेच्या चहाची जशी आपल्याला सवय होते तशीच ह्या कर्णरम्य 'तंग' वातावरणाचीही सवय होऊन, तेही 'एन्जॉय' करता येऊ लागतं. तर चहा संपला तरी गुंता सुटलेला नाही. ही अशी फक्त '२ मिनिटे' पाळण्याची वस्तू घरातल्या चराचरावर का बरे पसरून राहीली आहे? असो. असेल काहीतरी. एव्हाना बायको स्वतःसाठी बनविलेला साखरेचा चहा घेऊन दिवाणखान्यात सोफ्यावर येऊन बसते. चेहरा बिनसाखरेचा. मी वर्तमानपत्र  मन लावून वाचत बसतो.
'काय म्हणत होती ती?'
ह्याला इंग्रजीत 'मांजर पोतडीतून बाहेर येणे' असे म्हणतात. पण ह्यावर लगेच 'कोण काय म्हणत होती?' असा बावळट प्रतीप्रश्न मी करीत नाही. उलट, 'काय म्हणत होती ती?' ह्या बायकोच्या प्रश्नाला मी उत्तर देतो...
'हॅपीबड्डेला कंपासपेटी हवी म्हणत होती.'
'कोण?' इती बायको.
'सावनी' मी.
सावनी आमच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या करमरकरांची मुलगी. वय वर्षे ४. तिचा येत्या शनिवारी 'हॅपी बड्डे' आहे. ती तिच्या वडीलांबरोबर समोरून येताना दिसल्यावर मी तिला विचारलं होतं, 'काय सावनी, हॅपी बड्डेला काय हवंऽऽऽऽ?'
'मी सावनी बद्दल विचारत नाहिए.....' मी वर्तमानपत्रात खोलवर शिरतो. 'ती तिसऱ्या मजल्यावरची कामतीण काय म्हणत होती विचारतेय. ती भेटली होती न अगदी सक्काळी - सक्काळी बिल्ड्डींगच्या ग्गेट्टवर?'
ही अनाहूत जोडाक्षरे धुमसणाऱ्या रागाची तिव्रता दर्शवण्यासाठी. पण मी थंड. सकाळी मी कामावर जायला निघालो तेंव्हा आमच्या इमारतीच्या गेटवरच कामतबाईची आणि माझी भेट झाली. कामतबाई मॉर्निंगवॉक करून आली होती. घामेजलेल्या गोऱ्या कपाळावर काही बटा चिकटल्या होत्या. ट्रॅक सूटवर कमरेला बांधलेली ओढणी 'इतर' प्रदेशाला उठाव देत होती..... असो... इतकेच वर्णन पुरे झाले. ती आमच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते. श्री. कामत मवाळ आहेत. (खरं पाहता 'शेवाळं' आहेत.) बाजारातून रोजच्या रोज ताजी मासळी आणणं आणि सौ. कामतांकडून त्याच्या वेगवेगळ्या पाककृती करून घेऊन हादडणं हा त्यांचा एकमेव छंद आहे. कामतबाई म्हणजे मध्यमवयीन संसारी पुरूषांच्या सौंदर्य विषयक आदर्श कल्पनांच्या साच्यात अगदी फ्फिट्ट बसणाऱ्या आहेत. (हे जोडाक्षर अनाहूत नाही, हे, कामतबाईंना पाहिलेल्या कुणालाही पटेल.)
'हं ती होय.' मी उगाच 'आपल्याला त्यात काही 'इंटरेस्ट' नाही भाव चेहऱ्यावर आणण्याचा दुबळा प्रयत्न करतो. 'त्यांच्या घरात आज कॉर्पोरेशनचं पाणी आलं नाही. आपल्याकडे आलं का विचारत होती.'
'का? तुम्ही काय सेक्रेटरी आहात बिल्डींगचे? आणि तो मेला सेक्रेटरी त्यांच्या मजल्यावरच राहतो नं?'

तो फार सज्जन माणूस होता.

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

... तो मरण पावला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

आझाद हिंद सेना ७ - जर्मन अध्याय: सेना, ध्वजवंदन, राष्ट्रगीत

नेताजींनी निवेदन सादर केले पण त्याला प्रतिसाद? प्रतिसादाला विलंब अत्यंत साहजिकच होता. एकतर आधी उल्लेख केल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे अत्यंत अविश्वासाचे वातावरण जगभर निर्माण झाले होते. हिटलर व जर्मनीच्या दृष्टीने निर्णय घेणे सोपे नव्हते. पहिले कारण म्हणजे नेताजी हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय पक्षातून, कॉग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते होते व त्यांना हिंदुस्थानी जनता आपला नेता मानेल किंवा नाही याबाबतीत जर्मनीकडे खात्रीलायक माहिती नव्हती. दुसरे कारण म्हणजे हिटलरच्या युद्धकार्यक्रमात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पाठिंबा देणे हे याआधी ठरलेले नव्हते. तिसरे कारण म्हणजे माईन काम्फ मध्ये हिटलरने हिंदुस्थानच्या तत्कालीन नेतृत्वाची व स्वातंत्र्य आंदोलनाची नकारात्मक प्रतिमा रंगवली होती. चौथे कारण म्हणजे इंग्लंडला आज ना उद्या आपण तह करायला भाग पाडणार असा आत्मविश्वास हिटलरला होता, मग अशा परिस्थितीत हिंदुस्थानच्या संग्रामाला सहाय्यभूत ठरून त्यात खोंडा येऊ द्यायचा का? पाचवे कारण म्हणजे रशिया विषयी धोरण अजून निश्चित होत नव्हते तेव्हा बहुविध संघर्षात आणखी एक आघाडी उघडाची का यावर विचार करणं आवश्यक होते. सहावे कारण इटली - जर्मनी युती असताना या विषयक इटलीचे मत अजमावणे अगत्याचे होते. या आधी इटली भेटीत मुसोलिनीने नेताजींची गाठ तिथे अनेक वर्षे स्थायिक असून स्वातंत्र्यचळवळ चालवणाऱ्या व इटलीतून स्वातंत्र्यप्रचारासाठी रेडिओ हिमालय हे प्रक्षेपण केंद्र चालवणाऱ्या इक्बाल शिदेईशी घालून दिली होती. इक्बाल नेताजींच्या भेटीने भारावून गेला होता, किंबहुना त्यासाठी अत्युत्सुक होता. नेताजी निसटल्याची बातमी समजताच त्याच्या नभोवाणी केंद्रावरून  अनेकदा त्याने ’नेताजी, तुम्ही कुठे आहात, आम्ही वाट पाहतोय’ अशी सादही घातली होती. मात्र प्रत्यक्ष भेटीत नेताजी समजून चुकले की या युवकाचा संघर्ष पाकिस्तानासाठी आहे आणि नेताजींचा लढा हिंदुस्थानासाठी असून केवळ आपण स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकमेकांना साहाय्य करायचे आहे व त्यानंतर विभक्त व्हायचे आहे असे त्याचे उद्दिष्ट आहे. अखंड व जाती-धर्म अशा बंधांपासून मुक्त असा सशक्त हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या नेताजींना या तरुणाची साथ देणे वा घेणे कदापि मान्य नव्हते आणि मान्य होणे शक्यही नव्हते.

चोर येता घरा

       चोर घरी यावेत असे कुणाला वाटत असेल असे नाही पण चोराना मात्र सगळ्यांकडे जावेसे वाटते. चोर कोणाच्या घरी जावे हे कसे ठरवतात हा मला नेहमी प्रश्न पडतो. एकाद्या ठिकाणी डबोल मिळणार अशी कुणकुण लागल्यावर तेथे चोरांनी जाणे हे समजू शकते म्हणजे खूप परिश्रमपूर्वक बँका किंवा सोन्याचांदीच्या दुकानावर ते धाड घालतात यात काही आश्चर्य नाही पण आमच्यासारख्या कफल्लकांवरही मेहेरनजर करून आमची दारिद्र्यरेषेतून बढती केल्याचे पुण्य त्यांना लाभले तरी त्यांच्या गाठी मात्र काहीच पडत नाही हे त्यांना कसे समजत नाही कुणास ठाऊक, कदाचित कोणे एके काळी चारुदत्तासारख्या निष्कांचन माणसाकडे दागिन्यांचे घबाड सापडल्याचा दाखला शर्विलकांनी म्ह.चोरांच्या पूर्वजानी त्यांना दिल्यामुळे असाही एकादा प्रयत्न फुरसतीच्या काळात करायला हरकत नाही  हाच आमच्या घराच्या भेटीमागे त्यांचा विचार असावा.

कन्नड भाषा वर्ग.

कन्नड साहित्य परिषत्तु, बेंगळूरु, तर्फे कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग चालू होणार आहेत.एकूण सर्व माहिती खालील प्रमाणे.

वर्ग सुरू होणार.----------------------------------------------१९ ऑगष्ट २००७.

वर्ग परीक्षा----------------------------------------------------डिसेंबर २००७ शेवटचा आठवडा

वेळ---------------------------------------------------------सायंकाळी ४ ते ६

'राब' - मराठी साहित्यातील एक उपेक्षित मानदंड

'राब' ही अनंत मनोहर यांची कादंबरी. मराठी साहित्याचा एक मानदंड ठरावा अशी. पण दुर्दैवाने आतापर्यंत उपेक्षित राहिलेली. "मराठी साहित्य तोकडे / थिटे / कमअस्सल आहे का?" या सदाबहार विषयावर इरेसरीने चर्चा करताना जे 'अपवाद' झळाळून डोळे दिपवतात त्यापैकी एक.

शाब्दिक खोड्या

आपण भावगीतांच्या वा लोकप्रिय गाण्यांच्या ओळी गुणगुणत असता एक किंवा अनेक शब्द, गाण्याची गेयता न बिघडवता, बदलले तर अर्थाच्या काय गमती होतात त्याचे काही नमुने. (नवीन शब्द जाड अक्षरांत आहेत. गाण्यांतील मूळ शब्द देण्याची गरज नाही असे वाटते.)