काल मातृभू संस्कार तर्फे आयोजित श्री. मारुती चितमपल्ली ह्यांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. खूप मजेशीर, चकित करणारी, गमतीदार, रोचक अशी त्यांनी प्राण्यांबद्दलची माहिती सांगितली.
१. लंगूर कॅंम्प फायर( शेकोटी )करतात अगदी माणसे जशी लाकडे रचून करतात तशी पण न जळवता शेक घेतात. आदिवासींच्या म्हणण्या प्रमाणे ते आपल्या डोळ्यांनी लाकडांमधलं अग्नीतत्व शोषून घेतात म्हणून ती लाकडं जाळायचा प्रयत्न केला तर ती जळत नाही. ह्यावर संशोधन सुरू आहे.